Posts

Showing posts from August, 2022

विचारप्रणाली (--वाद, --सरणी आणि --धारा) : एक संक्षिप्त आकलन

*विचारप्रणाली (--वाद, --सरणी आणि --धारा) : एक संक्षिप्त आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> कोणत्याही परिस्थितीचे/वस्तुस्थितीचे प्रांजळपणे केलेले संतुलित व सम्यक मूल्यमापन तथा विश्लेषण हे कोणत्याही एकाच विशिष्ट विचारवाद वा विचारसरणीने प्रभावित झालेले नसते/नसावे. तसे असल्यास/झाल्यास त्याचा मथितार्थ हा आईसबर्गच्या/हिमनगाच्या फक्त दृश्य पृष्ठभागाइतकाच तथ्यांश धारण करणारा असतो, उर्वरित 5/6 भाग अनिर्णयित/अकथित/अस्पर्शितच राहून जातो. पर्यायस्वरूप परिस्थितीचे/वस्तुस्थितीचे सम्यक व समग्र आकलन शक्य होऊ शकत नाही व अशा अवस्थेत घेतले गेलेले/जाणारे निर्णय अर्थभ्रष्ट तथा अप्रस्तुत ठरणे क्रमप्राप्तच असते.  >> व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा राष्ट्राच्या नैतिक हिताला धक्का देणारा व/वा बाधक ठरणारा विचारवाद व/वा अशी विचारसरणी, परिस्थिती/वस्तुस्थितीचे मूल्यभान व त्यावरील जननिष्ठा डावलून सरसकट अवलंबिली गेल्यास तो --वाद व/वा ती --सरणी पर्यायस्वरूप अनैतिक व म्हणून पातकी असते, असे महात्मा गांधींच्या विधानात थोडा फरक करून मांडता येईल.  >> म्हणूनच कोणत्याही --वाद व/वा --सरणीचा विचार...

मी : एक उत्तरार्थी

          *मी : एक उत्तरार्थी*        ~~~~~~~~~~~~~ >> मी 1966-67 या शैक्षणिक वर्षात सहाव्या वर्गात शिकत असताना आमच्याकडे रेडिओ आला. आमच्या गावातील लोक अक्षरशः रेडिओ बघायला(!) आमच्या वाड्यात गर्दी करत असत, असा तो काळ होता. मला लवकरच तत्कालीन रेडिओ सिलोन आणि विविधभारती ऐकण्याची जणू लतच लागली होती. रेडिओ सिलोन वरील अमीन सयानी सादर करीत असलेला बुधवार रात्रीचा बिनाका गीतमाला हा कार्यक्रम ऐकणे जणू काही मला अनिवार्यच झाले होते. मी माझ्या स्मरणवहीत प्रत्येक आठवड्यातील बिनाका गीतमाला मध्ये वाजलेल्या गीतांची नोंद करू लागलो. माझी ही सवय इतकी वाढली की मी रेडिओ सिलोन, विविधभारती व ऑल इंडिया रेडिओ वर वाजलेल्या प्रत्येकच सिनेगीताची, फिल्म/गीतकार/संगीतकार/गायक/गायिका अशी नोंद करू लागलो. यासाठी माझ्या सुमारे 10-12 वह्या कामी आल्या व अनायासेच माझ्याकडे हजारो सिनेगीतांची नोंद झाली. (आजही मी त्या वह्या सांभाळून ठेवल्या आहेत.)  >> त्याकाळी आमच्या गावातच नव्हे तर जवळचे शहर(?) आमगांव येथे सुद्धा एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध नसल्याने तत्कालीन आरएमपी, आय...

कारणे > परिणाम > तोडगा की फक्त परिणामच?

*कारणे > परिणाम > तोडगा की फक्त परिणामच?* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> सध्याच्या उजाखा*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय युगातील वास्तविक *#कटूतम वस्तुस्थिती* चे (#BitterRealityचे) यथाविहित/यथोचित वर्णन करताना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्यिक, ऐतिहासिक, ...  इत्यादी कोणत्याही क्षेत्रातील जाणकार या बिघडलेल्या(?) वर्तमानाचे निकृष्टतम परिदृश्य अतिशय विद्वत्तापूर्ण भाषेत, विचारसमृद्ध तळमळीने व्यक्त करीत असतात. परंतु ह्या *#कटूतम वस्तुस्थिती* चे उगमस्थान व/वा त्यामागील कारणे/कारणमीमांसा, याबाबत मात्र ते पद्धतशीर मौन बाळगून असतात. शिवाय ह्या सध्याच्या *#कटूतम वस्तुस्थिती* चा यशस्वीरित्या, सक्षमतेने व परिणामकारकरित्या सामना करून त्यातून बिना तोडफोड, सुस्थितीत बाहेर कसे पडता येईल याचा कोणताही समाधानकारक तोडगा सुद्धा ते विचारवंत (अतिसूक्ष्म अपवाद वगळता) समोर ठेवत/मांडत नाहीत. अशाप्रकारे *आदि* आणि *अंता* चा कोणताही समाधानकारक उहापोह न करता फक्त *मध्य* चे रडगाणे गाणाऱ्यांचीच आजकाल जबरदस्त चलती असून संपूर्ण डिजिटल, छापील, आभासी, वेबिनारिय, ... वगैरे सर्वच माध्य...

एक अंग्रेजी कहावत और तथ्य : एक आकलन

*एक अंग्रेजी कहावत और तथ्य : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> First Impression is the last Impression, यह एक अंग्रेजी कहावत कई बार उद्घृत की जाती है। लेकिन मेरे अल्पबुद्धि-आकलन के अनुसार यह कहावत, मराठी संत तथा 'दासबोध' नामक सुप्रसिद्ध मराठी ग्रंथ के रचयिता रामदास स्वामी द्वारा उनके इसी ग्रंथ में वर्णित तथा व्याख्यायित किए गए मुर्खों का, मात्र दिवास्वप्न ही कहलाने योग्य है। क्योंकि मानवीय सभ्यता एवं संस्कृति के इतिहास में कहीं भी इस कहावत का सच्चा या कच्चा/पक्का भी उदाहरण नहीं मिलता। वर्तमान युग के LPG* के सायें में तो यह कतई संभव ही नहीं है, यह स्वयंस्पष्ट है।  >> यदि ऐसा होता तो, महमद घोरी कभी पृथ्वीराज को हरा नहीं पाता, छत्रपति शिवाजी महाराज कभी हिंदवी स्वराज्य की स्थापना नहीं कर पाते। हमारे स्वातंत्र्य सेनानी कभी भारतीय स्वतंत्रता हासिल नहीं कर पाते और राजीव गांधी की कभी हार नहीं होती। ऐसे कई उदाहरणों से मानव सभ्यता और संस्कृति का इतिहास भरा पड़ा है। इस अंग्रेजी कहावत का अर्थ किसी हिटलर द्वारा कुछ कालावधी के लिए अपना वर्चस्व बना और बचा पाने में अवश्य ढूंढा ज...

राजकारण आणि मराठी साहित्यिक...!

राजकारण आणि मराठी साहित्यिक...! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~          माझे स्व.वडील 1950 पासून काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते आणि सक्रीय राजकारणी. (25.01.2018 ला ते निसर्ग-शरण झाले.) अविभाजित भंडारा जिल्ह्यातील सा-याच राजकारणाचे डावपेच बहुतेकदा आमच्या घरीच/वाड्यातच ठरायचे. आमचे घर गावापासून जरा अलिप्त असून आमच्या गावातील लहान गल्ली आमच्या तथाकथित वाड्यातच संपत असल्यामुळे या घरात चाललेल्या जोरजोराच्याही चर्चा बाहेरच्या कोणालाही चोरून-लपून ऐकता येणे शक्य नव्हते/नसते. म्हणूनच कदाचित व माझे वडील (दारू वगळता अन्य) सरबराई करण्यात "पटाईत" असल्याने राजकारणाचे कुटिल वगैरे डावपेच ठरविण्या/खेळण्यासाठी आमचे घर अगदी "आदर्श" होते. ह्या चर्चा ऐकण्याची मला खूप आवड असायची, पण मला तशी परवानगी नसल्याने मी चापीच्या मागे लपून या चर्चा ऐकत असे. अशा बैठकीतून नुकताच उठून गेलेला मित्र तात्काळ कसा शत्रू होतो, याचे प्रात्यक्षिकच मी तेथे अनुभवत होतो.     या चर्चांदरम्यान गोंदियाचे मनोहरभाई पटेल, सोहनलाल मिश्रा, मेवालालजी,.... आमगांवचे गोपीकिसन अग्रवाल, गौरीशंकर असाटी, रामेश्वरकाका अग्...

एक स्मरणरंजन असेही...!

*एक स्मरणरंजन असेही...!* ~~~~~~~~~~~~~~~~ >> ब्रिटिश आमदानीत इ.स.1930 साली डेप्युटी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, छत्तीसगढ रिजन या वरीष्ठतम पदावरून निवृत्त होऊन स्वातंत्र्योत्तर काळात इ.स.1960 साली निसर्गशरण झालेले व रायबहादूर पदवीने सन्मानित करण्यात आलेले टुंडीलाल पोवार (तुरकर) हे माझे आजेसासरे.  >> त्यांच्या दोन पुत्रांपैकी वडील पुत्राने नागपूर येथील तत्कालीन हिस्लाॅप काॅलेज येथे गणित व विज्ञानाचे पदवी-शिक्षण अर्धवट सोडून, वडीलांच्या इच्छेनुसार, वडीलांनी कमावलेली शेती करण्या/सांभाळण्यास सुरुवात केली. पायलट म्हणून प्रशिक्षणाची चालून आलेली संधी सोडून मध्यप्रदेशातील एका आडवळणावरील छोट्याशा खेडेगावात शेती करण्या/सांभाळून एक मोठी (सुमारे 20 एकरात) आमराई उभारण्यात यशस्वी ठरले.  >> कनिष्ठ पुत्राने वकीलीची परीक्षा उत्तीर्ण करून वकीली-कम-शेतीऔजार (ट्रॅक्टरादि) व्यवसायात आपला जम बसवत मध्यप्रदेशातीलच बालाघाट या जिल्हास्थळाला आपला स्थायी निवास बनवला. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्षपदही भूषविले. परंतु एका अपघाती श्वानदंशाने त्यांचा जीवनप्रवासच बदलून टाकला व त्यांना एकप...

काश्मीर प्रश्नाची सोडवणूक (!?!?)

□काश्मीर प्रश्नाची सोडवणूक (!?!?) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~       □आजचा, 05 ऑगस्ट 2019 चा दिवस माझ्या दृष्टीने भारताच्या इतिहासातील एक महानतम दिवसच मानावा लागेल.          पुण्याहून प्रकाशित होणा-या "साधना" साप्ताहिकाच्या दि.22.09.2018 च्या अंकात (सुमारे वर्षभरापूर्वी) प्रकाशित झालेल्या व आजवर कोणीही खोडून न काढलेल्या माझ्या, या काश्मीरविषयक वस्तुस्थितीचे विश्लेषण करणा-या, पत्राची (संपादित) प्रत मी येथे उद्घृत करीत आहे.  □           1947 पासून 2014 पर्यंत काश्मीर-प्रश्न(?) सोडविण्यासाठी जे "धोरण" अवलंबिले गेले, त्याचा निष्कर्ष काय? शुन्यच ना! एखादा तथाकथित राजकीय/सांस्कृतिक/सामाजिक प्रश्न सोडवायला जे "धोरण" गेली 67 वर्षे सपशेल असफलच नव्हे तर कुचकामी ठरले/ठरत आहे, तेच "धोरण" पुढे रेटण्यापेक्षा सरदार वल्लभभाई पटेलांनी हैद्राबाद संस्थानाच्या विलिनीकरणाकरिता यशस्वीरित्या राबवलेले(!) "धोरण" राबविण्याचा प्रयत्न केल्यास फक्त चारच वर्षात "पूर्ण परिणामा"ची अपेक्षा करणे, मला तरी सयुक्तिक वाटत नाही. (येथे मी स्पष्ट करू इच्छितो की, मी ...

मी : पहिली ते आठवी : संक्षिप्त गोषवारा

*मी : पहिली ते आठवी : संक्षिप्त गोषवारा* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> माझे वर्ग 1 ते 4 दरम्यानचे शिक्षण प्राथमिक शाळा बोरकन्हार या आमच्या गावातील शाळेतच झाले. त्याकाळी  केजी वगैरेंचे खूळ आमच्या गावापर्यंत पोचले नसले तरी पहिली-पूर्व एक अनौपचारिक वर्ग असायचा. त्याला तुकडी असे म्हणायचे व वय 5 ते 6 वर्षे मधील मुलांना त्या वर्गात बाराखडी, अंकलेखन आदि शिकवले जाई. मी तुकडीत असताना आमच्या गावचेच नंदलाल शुक्ला हे मुख्याध्यापक असल्याचे पुसट आठवते. त्याचवर्षी ते निवृत्त झाले, असेही आठवते.  >> जून 1961 मध्ये मला पहिल्या वर्गात अधिकृत प्रवेश मिळाला. तेव्हा त्या शाळेतील गुरुजी म्हणजे, पटले गुरुजी, हरिणखेडे गुरुजी, रामेश्वर मंगरुजी हुकरे गुरुजी आणि माझे वर्ग 1 ते वर्ग 3 चे माझे आवडते वर्गशिक्षक सीताराम भुराजी चुटे गुरुजी. (हे एका डोळ्याने अंध होते.) माझ्या मराठी लेखन/हस्ताक्षर, वाचन व गणित या विषयांचा पाया मजबूत करण्यात या गुरुजींचा सिंहाचा वाटा आहे. या विषयातील माझी पहिली गुरु माझी आई स्व.सौ.कमलाबाई कटरे ही असली तरी माझी या विषयांतील रुची वृद्धिंगत करण्यात चुटे गुरुजींची भूमिका सुद...

एक बारिश : तब की और अब की...!

*एक बारिश : तब की और अब की...!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> 1979 या 1980 के बरसात की घटना है। तब आमगांव से कट्टीपार जाते वक्त किडंगीपार नालेपर कोई पुल नहीं था। मै कट्टीपार के जि.प. हायस्कूल में गणित शिक्षक के हैसियत से कार्यरत था। गाव/बोरकन्हार से ही सायकलसे आना-जाना करता था। इस नाले में पानी का बहाव जबरदस्त होने के बावजूद स्कूल में जाने हेतू मै कुछ व्यक्तियों के साथ सायकलसहित नाला पार कर रहा था। नाले का बहाव इतना जबरदस्त था कि मुझ जैसे नवसिखिया के लिए संभलना मुश्किल हो गया और मै सायकल सहित बहने लगा। साथके व्यक्तियों ने मुझे किसी तरह बाहर निकाल कर नाला पार करवा दिया।  >> मै भीगे कपड़ो मे ही स्कूल गया। तत्कालीन मुख्याध्यापक श्री.एस.टी.बहेकार सर ने मेरा ढाढस बढ़ाकर मुझे भजेपार (मेरी मौसी के गाव) भिजवा दिया था।  >> अब तो पुल भी हो गया और इस वर्ष की बारिश में नाले का पानी पुल पर भी चढ़ गया। बापरे, क्या बारिश है? ¤ @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902 (11.08.2022) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तथ्य आणि तर्क : एक आकलन (भाग-एक)

*तथ्य आणि तर्क : एक आकलन* (भाग-एक) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> काही वैयक्तिक, काही पारिवारिक व काही सामाजिक अशा अपरिहार्य कारणांमुळे तीन वर्षांत पूर्ण करावयाची B.Sc.(PCM) ची पदवी प्राप्त करण्यासाठी मला पाच वर्षे खर्ची घालावी लागली होती. जून-1977 मध्ये मी ही पदवी प्राप्त करून M.Sc.(Physics) मध्ये प्रवेश घेण्यासाठी मी नागपूर येथील PGTD, INSTITUTE OF SCIENCE व HISLOP COLLEGE येथे अर्ज केला असता मला पदवी परिक्षेत Physics या विषयात मिळालेल्या गुणांची टक्केवारी 0.5% ने कमी पडल्याने मला M.Sc.(Phy) ला प्रवेश नाकारण्यात येऊन द्वितीय Preference वरील M.Sc.(Maths) साठी प्रवेश स्वीकारण्यात आला. (पदवी परिक्षेत वर नमूद केल्याप्रमाणे 0.5% गुण कमी पडण्यासाठी आमच्या B.Sc.च्या अंतिम वर्षाच्या फिजिक्सच्या तत्कालीन द्वेषभारित प्राध्यापकाची प्रात्यक्षिक परिक्षेतील स्वार्थजनित व पक्षपाती अवकृपा कारणीभूत ठरली होती. ती एक वेगळीच स्टोरी आहे. असो.)  >> तथापि मला गणित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट करण्याची बिलकुल इच्छा नसल्याने माझ्या वडीलांच्या इच्छेखातर मी एन.एम.डी.काॅलेज गोंदिया येथे LL.B. मध्ये प्रव...

होता होता पहाट (एक अपूर्ण दीर्घ कविता)

◇होता होता पहाट◇ --------------------------------- होता होता पहाट झाली अखेर  आणि मावळला सूर्य अचानक ऐशीतैशी झाली निसर्ग-नियमांची तर्काला भोवली विसंगती भयानक ||१|| लागला पाठीमागे भयानकाच्या अरण्यातील तो सर्वभक्षी वणवा शुष्क पापणीला फुटले पाझर आणि धरेवर तो सूर्य ओणवा ||२|| ओल, आटलेला हृदयाच्या कप्प्यातील संध्यासमयी मग पाझरू लागला "जल बिन जैसी तड़पे मछली" कोरड्यातून तसा कोंभ उगवला ||३|| Dissent : the voice of progress ज्योतिषी कुडमुड्या सांगून गेला पायव्यात गाडलेल्या काळ्या गोट्यांना शिखराचे मोल "समजावता" झाला ||४|| होता होता अखेर पहाट झाली आणि मर्त्य-मानव अमर झाला नचिकेताच्या अनंत प्रश्नांनी तेव्हा यम सुद्धा जरासा भांबावून गेला ||५|| शून्यातील ते अनादि-अनंत शून्य ऋण बाजूलाही धनावून गेले नव्हते अमृत जेव्हा मृतांसाठी तेव्हा प्रकाशालाही अंधारून आले ||६|| कोण तो जाणतो, न-जाणतो सत्य जणू बीजात दडलेला महावृक्ष पारंब्या अनाहूत पसरत जाताना लोपतो का तो मूळ जाणता वृक्ष? ||७|| होता होता होते मग पहाट आणि सूर्य भ्रमतो दिशाभ्रमात पश्चिमेला होते आगमन सूर्याचे द्वेष, ईर्ष्या साचे पूर्...

पाटोदा, जि.बीड : काही मधुरतम स्मरणचित्रे

◇पाटोदा, जि.बीड : काही मधुरतम स्मरणचित्रे◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~         08 मे 1986!!! माझा परिविक्षा कालावधी संपल्यानंतर मला तालुका सहाय्यक निबंधक (सहकार,पणन,...) म्हणून पाटोदा (जि.बीड) येथे पोस्टींग मिळाल्याने तेथे रूजू झालो. जवळच्या केजला अशोक भांडवलकर व थोड्याशा दूर असलेल्या गेवराई ला शेषराव चव्हाण असे दोन मित्र मिळाले. आंबेजोगाईला राठोड साहेब उप निबंधक होते, ते ही मित्र झाले. श्रीकांत जेधे सर हे इंग्रजीचे विद्वान, आमचे DDR-कम-पालक होते.          पाटोद्याला तेव्हा पाण्याची भयंकर टंचाई, पण संध्याकाळचा वारा मात्र अतिशय सुखद. ऑफीस जवळच किराणा दुकान होते, दुकानदार किसनराव राख सुद्धा सुंदर-मित्र म्हणून गवसले(?). किसनरावांचा त्यावेळी दीडेक वर्षाचा असलेला चिमुकला माझा सखाच झाला होता. ऑफिस इमारतीचे घरमालक गोरे गुरूजी व त्यांची आई माझ्यावर बंधू/पूत्रवत प्रेम करायचे. रेवलकर, झांजे, अण्णा, महाजन, मेहबूब, आणखी एक जीवाभावाचा मुस्लिम कर्मचारी (ज्याचे नाव मला आज आठवत नाही, साॅरी) असे जीव लावणारे कर्मचारी आणि बनीमिया, दगडूमिया, राजू क्षीरसागर सारखे ...