18 जानेवारी 2009
*18 जानेवारी 2009* ~~~~~~~~~~~~~ 02 जून 2008 ला मी स्वेच्छेने यवतमाळ येथून बदली करून घेऊन गडचिरोली येथे जिल्हा उपनिबंधक(डीडीआर), सहकारी संस्था या महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या जिल्हा प्रमुख पदावर रुजू झालो. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलप्रभाव खरोखरच समाप्त करावयाचा/व्हावयाचा असेल तर त्यासाठी सहकार ही संकल्पना रामबाण उपाय ठरू शकते, हे मी यापूर्वीच अभ्यासले होते. त्या दृष्टीकोनातून मी माझ्या कामाची आखणी करून त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.गडचिरोलीचे मा.अध्यक्ष श्री प्रंचित पोरेड्डीवार, संचालक श्री पोरेड्डीवार, बँकेचे सरव्यवस्थापकद्वय श्री मुद्देशवार व श्री चौधरी आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी तथा तत्कालीन जिल्हाधिकारी श्री निरंजन कुमार सुधांशु यांच्या सक्रिय सहकार्याने कामकाजाला सुरुवात केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी भागात परंपरागत पद्धतीने कापूस पीक घेण्यात येत असले तरी तोवर महाराष्ट्र शासनप्रणित कापूस खरेदी योजनेचे एकही केंद्र गडचिरोली जिल्ह्यात सुरूच करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्...