□"राजा कोमलादित्य ची कथा..." ••••••••••••••••••••••••••••••••• राजा ललितादित्य हा अतिशय प्रजाहितदक्ष असा लोकप्रिय राजा होता. त्याचा अमात्य मिरचूमल हा सुद्धा अतिशय प्रामाणिक, राजनिष्ठ असा चतुर राजनितीनिपुण व्यक्ती होता. दोघांनी मिळून आपल्या राज्याची त्यांनी चांगलीच भरभराटी केली होती. साहित्य, कला, संस्कृती या विषयांतही त्यांच्या राज्यात समृद्धी होती. राजा ललितादित्य स्वतः एक उत्कृष्ट कवी होता. संगीताचा तो जाणकार होता. त्याच्या दरबारात एकूण बारा संगीतकार होते, जे दिवसाच्या प्रत्येक प्रहराला पूरक-साजेशा संगीत-गायनासाठी सुप्रसिद्ध होते. मेघमल्हार गाणारे संगीतज्ज्ञ इतके प्रवीण होते की ललितादित्यच्या राज्यात कधीच दुष्काळ पडत नव्हता. आवश्यकतेनुसार पाऊस पाडण्यात मेघमल्हार गाणारे संगीतज्ज्ञ शतप्रतिशत सफल होत होते. अशा राजाला संतती नसल्याने तो कधीकधी उदास व्हायचा. राजा ललितादित्यला मुख्य चार राण्या होत्या. नविनादेवी, आईनादेवी, प्रवीणादेवी व कामुनादेवी ही त्या राण्यांची नावे. नविनादेवीचे चार गर्भपात झाले हो...