Posts

Showing posts from November, 2021

लाखांदूर एपिसोड : एक भयस्वप्न

*लाखांदूर एपिसोड* : एक भयस्वप्न  ~~~~~~~~~~~~~~~~~~~           ऑगस्ट 17 च्या दरम्यान एका वर्तमानपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती की, दोन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे एका विरोधी पक्षनेत्याकडे प्राप्त झाले आहेत. मला त्या विरोधी पक्षनेत्यांना सांगायचे आहे की, 'त्या पुराव्यांचा काही उपयोग होईल असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत नाही.'  ----->>>>>      माझा एक छोटासा अनुभव सांगतो... 1996-97 मधील सत्य घटना आहे ही. तत्कालीन भंडारा जिल्ह्यातील एक तालुका सहाय्यक निबंधक (सहकार,पणन,...) सेवानिवृत्त झाल्याने त्या तालुक्याचा प्रभार कोणाला द्यावा यासाठी जिऊनि कार्यालयात खूप मोठे(?) खलबत(!) झाल्यावर कोणीही तेथील प्रभार घ्यायला तयार(?) नसल्याने मला विश्वासातही न घेता तो अतिरिक्त प्रभार मला सोपविण्यात आला. तेथील एक कनिष्ठ कर्मचारी नागपूर, अमरावतीच नव्हे तर राज्यातील संपूर्ण सहकार, पणन, ... विभागात सु(?)विख्यात (कुप्रसिद्ध?) होता. स्वतःच्या भ्रष्टाचाराला आच लागू नये म्हणून सर्वच वरीष्ठांच्या खोट्यानाट्या पुराव्यां(?)सह खोट्यानाट्या तक्रार...

विचार केलाच तर !

□विचार केलाच तर ! ~~~~~~~~~~~          आज थोडेसे वेगळेच लिहावेसे वाटते. त्याला कारण झालेय, एका सुप्रसिद्ध व महत्वाच्या वर्तमानपत्राच्या मालक/चेअरमन यांच्या एक सोमवासरीय स्तंभातील लिखाणाचे! हा स्तंभ माझा अतिशय आवडता आहे. मी हा स्तंभ कधीही चुकवत नाही. या स्तंभातून मांडण्यात येणारे/आलेले विचार व त्यावरील उपाययोजनाही मननीय, विचारणीय व आचरणीयही असतात. आजच्या स्तंभात त्यांनी किशोरवयीन गुन्हेगारांच्या समस्येविषयी अतिशय मुलभूत चिंतन मांडले आहे. (प्रत्येकाने ते अवश्य वाचावे असे मला वाटते.) त्यावरील माझा प्रतिसाद मी कोणत्याही टिपणी किंवा भाष्याशिवाय व्यक्त करीत आहे. एक:-मी बालपणी कदाचित खूप सुंदर दिसत असावा(?). मी 4थी किंवा 5वीत असेन. गावांमध्ये आजही बहुतेक घरी लघवीसाठी जनावरांचा गोठाच राखीव असतो. आमच्या वाडीत बांधलेल्या गोठ्यात एका सकाळी मी लघवीला गेलो होतो. बसून लघवी करायची सवय होती. मी लघवी करीत असतांनाच कोणीतरी हळूच येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवले. अर्थातच मी दचकून मागे पाहिले. माझ्याच वयाची एका *****ची मुलगी होती ती! तिने केलेली "मागणी" ऐकूनच मी तेथून पळालो व थेट आईक...