Posts

Showing posts from March, 2021

शब्दाशब्दांमधून जगण्याची बीजे पेरणारी कविता : माझ्यातल्या कवी मरत चाललाय (इरफान शेख)

*शब्दाशब्दांमधून जगण्याची बीजे पेरणारी कविता* (माझ्यातला कवी मरत चाललाय : इरफान शेख) ------------------------------------------------------------- (@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~    >> युवा मराठी कवी इरफान शेख यांचा "माझ्यातला कवी मरत चाललाय..." ह्या कवितासंग्रहातील कविता वाचल्यावर मला जे जाणवले ते हे की, या कवितासंग्रहाच्या कवीतील कवी "मरत" चालला नसून "पेरत" चाललाय. या संग्रहातील बहुतेक कवितांमधून कवीने एकेक बीज पेरले आहे. >> त्या कविता वाचल्या/अनुभवल्यावर वाचकाच्या मनोविश्वात ते "बीज" प्रस्फुटित होते, अंकुरित होते, वाढू लागते, विस्तारते, पारंब्यांनी समृद्ध होत जाते आणि त्या बीजातून प्रकट/प्रगट झालेल्या महाकाय वृक्षाचे स्वरूप आणि त्याचा आशयादि पाहून/अनुभवून वाचक अचंबित होतो, स्तंभित होतो, विचारप्रवृत्त होतो. त्या महाकाय महावृक्षाच्या "आवरणा''त वाचक स्वतःचा शोध घेऊ लागतो/आत्मावलोकन करू लागतो. आणि तेथे "कवी-वाचक" हे द्वंद्व लोप पावून "कवी-वाचक" एकाकार होतात, दोघांची "वृत...

फक्त सैल झालाय दोर : पद्मरेखा धनकर

*फक्त सैल झालाय दोर* : डाॅ.पद्मरेखा धनकर  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार) (प्रकाशित : अक्षर वैदर्भी : मार्च -2021) ---------------------------------------------------------- >> डाॅ.पद्मरेखा धनकर यांचा कवितासंग्रह "सैल झालाय दोर" हा माझ्या आवडत्या कवितासंग्रहांपैकी एक महत्त्वाचा संग्रह. या संग्रहातील कविता वाचल्यावर मला साकल्याने जे आकलन झाले, ते मी माझ्या अल्पस्वल्प अनुभवानुसार खालीलप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.  >> संग्रहातील कवितांवर कवितानिहाय माझी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा संपूर्ण संग्रह वाचल्यानंतर मला जे आकलन झाले ते मी संक्षिप्त रूपात/प्रतिक्रिया म्हणून व्यक्त करीत आहे.  >> या कविता संग्रहाचे शिर्षक जरी ''फक्त सैल झालाय दोर" असे असले तरी मला या कवितासंग्रहातून प्रवास केल्यावर असे जाणवले, की "ती" अजूनही "तो"च्या दोराला पूर्णपणे सोडू शकलेली नाही, किंवा सोडू इच्छित नाही, किंवा पूर्ण-मुक्त झालेली नाही, फक्त सैल झालाय दोर! या संग्रहात "तो"शी संबंधित व संदर्भित कवितांचे बाहुल्य आ...