माझ्या मूर्खपणाचे आणखी एक लक्षण (!)
@कृपया, थोडीशी फुरसत काढून पूर्ण वाचण्याची तसदी घ्यावी, व नंतरच Like, Dislike, Comment etc. करावे ही विनंती. (01 जुलै 2020) ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ●माझ्या मूर्खपणाचे आणखी एक लक्षण (!) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ रामदास स्वामींनी "दासबोधा"त मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी एका लक्षणाचे अनुसरण करण्याची व स्वतःला मुर्ख सिद्ध करण्याची संधी मी सोडत नसतो. आजही मी त्या संधीचा "वापर" करीत आहे. क्षमस्व. पण त्यापूर्वी डाॅ.गणेश देवी यांच्या "वानप्रस्थ" या ग्रंथातील 'परंपरेच्या शोधात' या निबंधातील काही वाक्ये उद्घृत करू इच्छितो. ती वाक्ये अशी :- "...परंपरेच्या आंधळ्या भक्तीमध्ये विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची ताकदच नाहीशी करण्यात येते. आधुनिकतेच्या अति उत्साहात भावनांचा हकनाक बळी पडतो व परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण बनवण्याच्या हट्टामध्ये सांस्कृतिक स्मृती व कल्पनाशक्ती या दोन्ही खंडित होत राहतात. परंपरेकडे या तीन विचारपद्धतीपेक्षा वेगळ्या रीतीने पाहण्याची कोणतीच पद्धत नाही का? या प्रश्नाचे उत्तर...