(BOSS) : आरोप, आक्षेप, सल्ला-सूचना आणि साधे विधान
(BOSS : Blame(Allegation), Objection, Suggestion, Simple Statement.) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ □आरोप, आक्षेप, सल्ला-सूचना आणि साधे विधान. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जेव्हा जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्ती-व्यक्तींमध्ये संवाद/communication होतो; तेव्हा तो संवाद संप्रेषणाच्या दृष्टीने प्रामुख्याने चार प्रकारात मोडतो. व्याख्यान, प्रवचन, कीर्तन, चर्चा, साधा संवाद, भांडण,... वगैरे कोणत्याही प्रकारे होणारा संवाद हा या चार प्रकारात व्याख्यायित करता येऊ शकतो. "बोलणारी" व्यक्ती या चार पैकी कोणत्या "प्रकारात" व्यक्त होत आहे, हे "ऐकणाऱ्याला" योग्यप्रकारे ओळखता न आल्यास "बोलणाऱ्याच्या" हेतूबद्दल विचित्र शंका व अपसमज/गैरसमज "उत्पन्न" केल्या(!) जातात. आणि अर्थाचा अनर्थ होऊन "शांती-भंगा"ची व "द्वेष-निर्मिती"ची परिस्थिती उद्भवते. "बोलणाऱ्याचा" हेतू ओळखता न आल्याने, बोलणारा व ऐकणारा यांच्यातील चांगले सुविद्य संबंध सुद्धा दुरावतात/ऋणावतात आणि हे दुरावलेले/दुरावण...