Posts

Showing posts from July, 2022

...तो एक मुर्ख : दासबोध/रामदास स्वामी // ...मी एक मुर्ख : आत्मबोध/लखनसिंह कटरे.

*...तो एक मुर्ख : दासबोध/रामदास स्वामी* *...मी एक मुर्ख : आत्मबोध/लखनसिंह कटरे* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> 03/2003 ते 05/2006 पर्यंत मी चंद्रपूर येथे डीडीआर म्हणून कार्यरत होतो. (याच कालावधीत 07/2004 ते 05/2006 पर्यंत माझ्याकडे गडचिरोली येथील डीडीआर पदाचा अतिरिक्त प्रभार सुद्धा सोपविण्यात आलेला होता.) चंद्रपूर येथील कार्यकाळादरम्यान परिस्थितीनुरूप जिल्ह्यातील सर्व (15 ही) कृउबास बरखास्त करून मी तिथे त्या त्या तालुक्यातील सहायक निबंधक/सहकार अधिकारी श्रेणी-1 यांना प्रशासक नेमले होते. आणि सुमारे 40-50% अधिकारी/कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असली तरी, पणन मंडळाची शेतमाल तारण योजना मोठ्या प्रमाणावर राबवून 2004-05-06 या दोन हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हंगाम सुमारे रु.2.00-2.50 कोटी चा अतिरिक्त लाभ मिळवून देण्यात सर्व/उपलब्ध कार्यालयीन व फील्डवरील अधीनस्थांसोबत सफल होऊ शकलो होतो. ही सक्सेस स्टोरी अभ्यासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक डीडीआर व काही कृउबासचे पदाधिकारी/अधिकारी सुद्धा चंद्रपूरला येऊन गेले होते. याच कालावधीत केंद्र शासन पुरस्कृत व नाबार्ड द्वारा राबविण्यात आलेल्या ग्रा...

जैन परंपरा आणि मी : एक मंथन

*जैन परंपरा आणि मी : एक मंथन* ~~~~~~~~~~~~~~~~~~ >> जैन परंपरा, विचार, धर्म याबाबत माझ्या मनात माझ्या कुमार वयापासूनच एक अजीब असे गूढ आकर्षण-वजा-कुतुहल होते/आहे. त्यातच मला वाचनाचा भयंकर(?) नाद (जणू वेडच) असल्याने जैन परंपरेबद्दल काहीही वाचायला मिळाले तर ती माझी मेजवानीच असे. माझ्या याच वेडा(?)पायी मी "तीर्थंकर" (इंदोर, संपादक-नेमीचंद जैन) आणि "युवादृष्टि" (लाडनूं, राजस्थान येथील आचार्य तुलसी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालित अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद चे मुखपत्र : संपादकद्वय : कमलेश चतुर्वेदी व विजयसिंह कोठारी) या दोन हिंदी मासिक पत्रिकांचा नियमित वर्गणीदार-वाचक झालो. सोबतच "JAIN JOURNAL" या कलकत्ता(कोलकाता)हून प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी त्रैमासिकाचाही नियमित वर्गणीदार-वाचक झालो. (त्यावेळेस माझे वय जेमतेम 21-22 वर्षाचे होते. या तिन्ही नियतकालिकांचे बांधीव खंड मी अजूनही जपून ठेवले असून अधूनमधून त्यांच्यावरील धूळही झटकत असतो.) याशिवाय सुद्धा इतर काही जैन नियतकालिके, पुस्तके, ग्रंथ यांचेही सामयिक वाचन केले. मी रामटेकला असताना तेथील वर्षावासातील जैन मु...

मला सांगायचंय्! : संपादक - माधव कानिटकर

*मला सांगायचंय्! : संपादक - माधव कानिटकर* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> जगातील कोणत्याही भाषेत न झालेला एक प्रयोग(!) आपल्या मराठी भाषेत मात्र करण्यात आलेला असून तो अजूनही एकमेवच आहे/असावा, अशी माझी माहिती आहे. (मी चुकत असल्यास जाणकारांनी यथावश्यक दुरुस्ती करावी अशी विनंती आहे.)  >> जगातील कोणत्याही भाषेत केवळ वाचकांच्या पत्रव्यवहाराला वाहिलेले पाक्षिक/नियतकालिक होण्याचा प्रथम मान प्रपंच प्रकाशन, पुणे यांच्याद्वारे जानेवारी 1981 पासून प्रकाशित व माधव कानिटकर द्वारा संपादित 'मला सांगायचंय्!' या मराठी भाषेतील पाक्षिकालाच जातो/जावा असे मला वाटते.  >> परंतु वाचकांचा अपेक्षित/पुरेसा प्रतिसाद मिळू न शकल्याने सुमारे दीड-दोन वर्षातच हे पाक्षिक/नियतकालिक बंद करावे लागले असले तरी जागतिक नियतकालिकांच्या इतिहासात या पाक्षिकाचे नाव अजरामर झाले असेच म्हणावे लागेल.  >> अशा या नाविण्यपूर्ण व अद्वितीय ठरलेल्या तथा अजरामर झालेल्या पाक्षिकाचा प्रथमांकापासून/जानेवारी 1981 पासून शेवटच्या अंकापर्यंत मी वर्गणीदार-वाचक होतो, याचा मला स्वाभाविकच अभिमान आहे. असे नाविण्यपूर्ण प्...

उथळ व्यक्तिमत्त्व : एक संक्षिप्त आकलन

*उथळ व्यक्तिमत्त्व : एक संक्षिप्त आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मानवी प्रतिभा आणि तत्संबंधित मानवी व्यक्तिमत्त्व याचे ढोबळमानाने/सर्वसाधारणपणे दोन प्रमुख प्रकार तद्विषयक अभ्यासकांकडून मांडले/अभ्यासले जातात. ते दोन प्रकार म्हणजे, गंभीर व्यक्तिमत्त्व आणि उथळ व्यक्तिमत्त्व.  >> यापैकी उथळ व्यक्तिमत्त्वाचा उदोउदो लवकरच जिथेतिथे प्रसारित होत असतो. कारण असे उथळ व्यक्तिमत्त्व सतत/वारंवार स्वतःच स्वतःच्या असलेल्या/नसलेल्या प्रातिभ गुणां(?)चे गुणगान(?) करण्यात पटाईतच नव्हे तर सराईतही असते. शिवाय अशा उथळ व्यक्तिमत्त्वाला तसाच उथळ शिष्य(?)परिवार सुद्धा सहजच लाभत असतो, कारण बहुतांश/सर्वसाधारण व्यक्ति हे Thinkophobia ने (विचार करण्याच्या भयगंडाने) भयग्रस्त असतात, हे योगी अरविंद यांनी सुद्धा मांडले आहेच. अशा स्वनामधन्य स्वयंप्रशंषित उथळ व्यक्तिमत्त्वासाठी रामदास स्वामी यांनी त्यांच्या 'दासबोध' या ग्रंथात "...तो एक मुर्ख" अशी संभावना सुद्धा केली आहे.  >> अशा उथळ व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ति त्यांच्या तथाकथित प्रातिभ(?) शक्तीच्या मोहजालात भल्याभल्यांनाही सहज प...