झाडीपट्टी/झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती.
04.07.2020 ================================== *झाडीपट्टी/झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती* ------------------------------------------------------------------ @ॲड.लखनसिंह कटरे ----------------------------- >> मी अगदी/सुमारे 1975 पासून झाडीबोली आणि झाडीसंस्कृतीचा पाठीराखा व प्रवाहक/पुरस्कर्ता असलो तरी मी या भागातील ग्रामीण बोलीला झाडीबोली असे नाव दिले नव्हते. मला अशी कल्पना सुद्धा सुचली नाही. 1968 पासून 'ललित' मासिकाचा वर्गणीदार-वाचक असल्याने त्यातूनच कधीतरी आनंद यादव यांच्या 'गोतावळा' बद्दल कळले/वाचले आणि माझा सखा मिळाला असेच वाटले. आमच्या विद्यालयाच्या तुटपुंज्या वाचनालयातून 'गोतावळा' आणून वाचून काढली. तेव्हा कुठे "आमचे आपले साहित्य" वाचल्याचे समाधान झाले. त्यापूर्वी 'माणूस मोठा जिद्दीचा' ही एकमेव कादंबरी वाचली होती, आणि तिच्यातील कथानक, वर्णनादि वाचून आपण एखादी परीकथाच वाचतोय असे वाटले होते. त्या कथानक व वर्णनाशी मी रिलेट/समरस होऊ शकलो नव्हतो. >> याच दरम्यान 1972च्या माझ्या माजी विद्यालयाच्या स्नेहसं...