Posts

Showing posts from May, 2020

पोवारी बोली अना मी : एक पुनरावलोकन

*पोवारी बोली अना मी : एक पुनरावलोकन* -------------------------------------------------------- >> मी फरवरी 2013 मा रिटायर भयेव् अना कोनतोच शहर मा स्थायी नही होयस्यार आपलो जन्मगाव/खेडेगाव बोरकन्हार मा पुनर्स्थायी होन् साठी मार्च 2013 पासना आमरो गावमा रव्हन् ला आयेव् सपरिवार।  >> च्यालीस-पैंतालीस साल शिक्षण अना नवकरी को कारन लका बाहेर-बाहेर रव्हेव् होतो मुनस्यारी बचपनकी पोवारी बोली ठीक लका बोलता आवत् नोहोती। अटक-अटकस्यारी बोलत होतो. >> पर आमरो घर् गावमा एक नवकर होतो, वोको नाव देवाजी रहांगडाले। येन् देवाजीला पोवारी को सिवाय दुसरी कोनतीच भास्या बोलता आवतच् नोहोती। वोकोसंग् पोवारी मा बोलता बोलता मी धीरू धीरू पहलेवानीच धाराप्रवाह पोवारी बोलन् लगेव्।  >> मी झाडीबोली को चळवळ मा 1979-80 पासना कार्यरत सेव्. झाडीबोली साहित्य मंडळ को संस्थापक/आजीव सभासद भी सेव्. तसोच महाराष्ट्र मा बोली जानेवाली सप्पाई बोलीईनको एक अखिल महाराष्ट्र बोली साहित्य महामंडळ को भी मी संस्थापक/आजीव सभासद सेव्.  >> येको कारणलका मी पोवारी बोली की एक लहानशी पोस्ट 2013 -14 को दरम्यान फ...

नशा : कवितेची आणि दारूची(?) : (कटूतेला आवतन?)

◇नशा : कवितेची आणि दारूची(?) : कटूतेला आवतन◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~          एक वस्तुस्थिती प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मी प्रामुख्याने, प्राधान्याने, बेसिकली वगैरे वगैरे एक (उत्तम?) वाचक मात्र आहे. तरी माझ्या हायस्कूलच्या शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने मी 1970-72 पासूनच अनुकरण, अनुसरण, प्रतिक्रिया स्वरूप तथाकथित कविता लिहू लागलो होतो. माझा जीवश्चकंठश्च मित्र प्रभाकर पोचलवार याच्यासोबत संयुक्त कवितेचा (म्हणजे कवितेच्या ओळी आलटून पालटून मी व प्रभाकरने लिहिणे) प्रयत्न व प्रयोग सुद्धा आम्ही त्याकाळी केलेला! तर अशी कवितेची ओळख होत गेलेली. याचा पाया मात्र माझ्या बालपणी माझ्या आईने व तिस-या व चौथ्या वर्गात त्यावेळचे माझे वर्गशिक्षक श्री.सिताराम भूराजी चूटे या एकाक्ष सत्य-शिक्षकांनीच रोवला होता.         हळूहळू "ललित", "युगवाणी", "तरुण भारत", ची विविध विषय विभाग ही रविवार पुरवणी व "रविवारचा महाराष्ट्र टाईम्स" यांच्या नियमित वाचनाने वसंत आबाजी डहाके व ग्रेस यांनी माझ्यावर गारूड केलं. गोतावळा-आनंद यादव, ठणठणपाळ-जयवंत दळवी, मा...

नाद हरवलेल्या वाद्यांसोबत एक दिवस व एक रात्र ... (लघुकथा)

*नाद हरवलेल्या वाद्यांसोबत एक दिवस व एक रात्र ...* (लघुकथा) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> आज सकाळी झोप उघडली ती डोकेदुखी घेऊनच. तशी माझी आणि डोकेदुखी ची खूप खूप जूनी अभंग अशी मैत्री आहे. पण आज अचानक तिचे सकाळी-सकाळीच उद्भवणे जरा आश्चर्याचेच म्हणावे लागेल. कारण सध्याच्या कोरोना-भारित कालावधीत खाणे-पिणे, उठणे-जागणे, व्यायाम-औषधी आदि सर्व बाबी नियमित, सुरळीत व यथायोग्यपणे सुरू असूनही डोकेदुखीचे कारण अनाकलनीयच ठरते. >> विज्ञान असो की सनातन धर्माच्या आदि शंकराचार्यांचे सत्कार्यवाद हे तत्त्वज्ञान असो, 'कारणा'शिवाय 'कार्य' घडत नसते असे मानले जाते. (अतिअद्यावत भौतिकशास्त्रात आजकाल कार्यकारण संबंधावर साधार शंका उपस्थित करण्यात येत असल्या तरी अजूनही त्यासंदर्भात काही ठोस व ठाम विधाने विज्ञान करू शकला नसल्याने आपण सध्या तो विचार बाजूला ठेवू या.) पर्यायाने 'कारण' जेव्हा आपले अस्तित्व-अंतरण करून 'कार्या'त रुपांतरित होते, तेव्हा 'कारण' मावळून 'कार्य' दृग्गोचर होते असे म्हणतात. पण असे असले तरी कारण मात्र अस्तित्व-शून्य झाले असेही म्हणता ये...

सोनेरी घोडा : एक सत्यकथा

*सोनेरी घोडा : एक सत्यकथा* ~~~~~~~~~~~~~~~~~ >> सन 1963 मधली घटना असावी ती. मी नुकताच तिसरीत (1963-1964) गेलो होतो. आमचे वर्गशिक्षक स्व.सीताराम भूराजी चुटे हे आमच्या वाड्याला लागूनच असलेल्या स्व.हरीभाऊ भांडारकर (तत्कालीन सरपंच, ग्राम पंचायत, बोरकन्हार) यांच्या घरी त्यांच्या काही अन्य शिक्षक मित्रांबरोबर रहायचे. (त्याकाळी आमच्या गावात तरी घर भाड्याने देण्याची प्रथा नव्हती.) त्यामुळे ते आमच्या कडील त्या सोनेरी घोड्याला रोजच पाहत असत आणि एखाद्या निमित्ताने वर्गात सुद्धा आमच्या त्या सोनेरी घोड्याचा कुतुहलपूर्वक उल्लेख करीत. म्हणून मला त्या घोड्याचा आमच्या कडील आगमन कालावधी लक्षात राहिलाय. >> तर झाले असे की, माझ्या आजोबांच्या कालावधीपासूनच आमच्याकडे प्रवासासाठी घोडागाडी व पर्यायाने घोडेपालन ही प्रथा होती. माझे वडील घोड्यांच्या लक्षण-परीक्षण विद्येत तज्ज्ञ होते व त्यांची घोड्याची निवड कधीच चुकली नाही. त्यांनी सुद्धा घोडागाडी व घोडेपालन ही प्रथा पाळली. आमच्या गावापासून सहा किमी वरील आमगांव या तत्कालीन जमीनदारीच्या गावात (सद्यकालीन तहसील-स्थळ असलेल्या निमशहरात) डिसेंबर महिन्यात चंप...

शब्दार्थांचे आधार निष्फळ : कवितासंग्रह (जून 2005), @लखनसिंह कटरे//प्रस्तावना--डाॅ.श्री.हरिश्चंद्र बोरकर.

*शब्दार्थांचे आधार निष्फळ*: कवितासंग्रह/जून-2005 : @लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902. प्रस्तावना--डाॅ.श्री.हरिश्चंद्र बोरकर (26 मार्च 2005) ------------------------------------------------------------------ *आधारशोध* ---------------- >> लखनसिंह कटरे यांचे हे सहावे पुस्तक. या सहा प्रकाशित ग्रंथांमध्ये केवळ एक कथासंग्रह असून उर्वरित पाचही काव्यसंग्रह आहेत. यावरून या कवीचा काव्यप्रांतातील प्रपंच लक्षात येऊ शकेल. 1996 साली त्यांचा 'प्रमेय' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. झाडीपट्टीतील रिवाजानुसार तो तसा उशिरानेच लोकांसमोर आला. तथापि त्या संग्रहाने आपल्या शीर्षकापासून तर विषयापर्यंत आणि प्रतिमांपासून तर रचनापद्धतीपर्यंत आपले वेगळेपण सुस्पष्ट केल्याचे जाणवते. वास्तविक 'प्रमेय' हा काव्याशी विळ्याभोपळ्याचे नाते असलेल्या गणितातील शब्द. पायथागोरसपासून तर अपोलोनियसपर्यंत अनेकांची प्रमेये हे शीर्षक कानावर पडताक्षणीच आपल्याला आठवतील. असे शीर्षक आपल्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला देऊन वेगळेपणाचा 'धागा' लखनसिंह कटरे यांनी 'शिवला' आहे असे म्हणता येईल.  >>...