सहकार : एक परिपूर्ण पण दुर्लक्षित संकल्पना/काही (कु)विचार 😁😁
*सहकार : एक परिपूर्ण पण दुर्लक्षित संकल्पना* */काही (कु)विचार 😁😁)* (या लेखाचा अपरिस्कृत अंश प्रकाशित : ईये मराठीचिये नगरी : ई-पत्रिका : 23.06.2023) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बॅरिस्टर ए.आर.अंतुले हे महाराष्ट्राचे असे एक धडाकेबाज मुख्यमंत्री होऊन गेले की, ज्यांनी एका धाडसी निर्णयाद्वारे महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती स्तरावर तालुक्यांची 'निर्मिती" करून त्या प्रत्येक जुन्या-नव्या तालुक्यात शासनाचे महत्वाचे असे दोन विभाग, सहकार आणि राजस्व, तालुका स्तरीय कार्यालयाद्वारे, लोकाभिमुख करण्याचे ऐतिहासिक स्वरूपाचे असे महत्त्वाचे कार्य केले. (त्यांच्या काही 'कामां'चे समर्थन करणे आजही शक्य वाटत नसले तरी, हे काम मात्र विसरता येणार नाही.) महाराष्ट्राची वास्तविक अर्थसत्ता आणि महाराष्ट्राला अर्थकारणातील प्रमुखत्व प्रदान करणारी सुव्यवस्था म्हणजे सहकार-व्यवस्था होय, हे सत्य ओळखणाऱ्यांपैकी बॅरिस्टर अंतुले हे सुद्धा एक मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राची अर्थवत्ता, महाराष्ट्राचे पुरोगामीत्व, शैक्षणिक महात्म्य, सामाजिक ऐक्य,...