Posts

Showing posts from April, 2022

काही स्वप्नवत(?) आठवणी -2

काही स्वप्नवत(?) आठवणी-2 ~~~~~~~~~~~~~~~         जूलै 1966 मधील घटना आहे. मी माझ्या गावच्याच जि.प. शाळेत सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होतो. अचानक एके दिवशी गुरूजींनी सांगितले की दिवाळीच्या सुट्टीनंतर आपल्या शाळेतील वर्ग 5 व 6 बंद होत असून सर्वांनी आपापली सोय पहावयाची आहे. माझे वडील काॅन्ग्रेसचे एक वरीष्ठ कार्यकर्ते(?) असल्याने त्यांची पंचायत समितीच्या सभापतीशी आणि जि.प. च्या अध्यक्षाशी चांगली ओळख व मैत्री सुद्धा होती. त्यांनी हा निर्णय बदलविण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. पण सर्व व्यर्थ. आमच्या गावाजवळील 3 किमी अंतरावरील जि.प. शाळा अंजोरा येथे आमची रवानगी झाली, काही विद्यार्थी 6 किमी वरील आमगांव या तत्कालीन ब्लाॅकस्तरीय मोठ्या गावातील शाळेत गेले. म्हणजे तत्कालीन तुकडी, वर्ग एक ते वर्ग साडेपाच पर्यंतचे माझे शिक्षण माझ्या गावातील जि.प.च्या शाळेतच झाले. इंग्रजी भाषेची व विषयाची पहिली ओळख पाचव्या वर्गात माझ्या गावातच झाली.                  मी गावापासून 3 किमी रोज पायी ये-जा करीत असे. तसा मी तथाकथित मोठ्या(?) शेतक-याचा लाडावलेला मुलग...

21व्या शतकातील ग्रंथव्यवहार कसा आहे आणि कसा असावा?

*अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांत, नागपूर*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       २३ एप्रिल हा दिवस *जागतिक ग्रंथ दिवस* म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने येत्या २३ एप्रिल 2022 रोजी अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांताच्या वतीने जागतिक ग्रंथ दिनानिमित्त सायंकाळी ६ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन शिक्षण संस्थेच्या माई मोतलग सभागृहात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. *२१व्या शतकातील ग्रंथ व्यवहार कसा आहे..? कसा असावा..?* या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक आणि अ.भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष *ॲड.लखनसिंह कटरे* हे होते. याप्रसंगि साहित्यिक व समिक्षक *रश्मी पदवाड मदनकर*, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रकाशक *विनोद लोकरे,* साहित्यिक चळवळीतील कार्यकर्ते *प्रकाश एदलाबादकर* आणि व्यासंगी वाचक *तुषार जोशी* ह्या मान्यवरांनी सुद्धा आपले विचार मांडले....        याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.लखनसिंह कटरे यांचे भाषण खालीलप्रमाणे.. 👇👇 *"२१व्या शतकातील ग्रंथव्यवहार कसा आहे आणि कसा असावा?* ~~~~~~~...

एक कन्फेशन........

एक कन्फेशन...... *****************          तसा तर माझ्या आईच्या संस्कारामुळे मी वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासूनच अवांतर वाचण्यासाठी लालायित असायचो. 1970-71च्या दरम्यान माझ्या वर्गशिक्षिका डाॅ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने माझी ही सवय आणखी दुणावली/तिनावली, वगैरे. 1972-73 पासून मी वाचलेल्या व मला आवडलेल्या पुस्तकाच्या/लेखाच्या/कवितेच्या रचनाकाराचा संपर्क सूत्र मिळवून त्यांना पत्रे लिहू लागलो. काही वर्षांनंतर दूरध्वनी ची सोय उपलब्ध झाल्यावर त्याचाही "त्या" साठी वापर करू लागलो. आता चलभाष यंत्र आणि FB/WA/TWITER/etc च्या युगात त्या/या साधनांचाही "त्या"साठी वापर करू लागलो. माझी मातृभाषा हिंदी(पोवारी) असणे, मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण (गणित वगळता) मराठी माध्यमातून होणे, पुढील सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे, त्यामुळे मला तिन्ही माध्यमातील रचनाकार समरसून वाचता/अभ्यासता आले/येतात. (असे मला वाटते!)       या रचनाकारांशी मी वरील साधनांच्या माध्यमातून, माझ्या अल्पबुद्धीच्या प्रतिक्रियेसह, एकतर्फी संपर्कात राहण्याचा यशस्वी/अयशस्वी प्रयत्न करीतच होतो/असतो/...

मी सुद्धा एक सामान्य माणूसच...

मी सुद्धा एक सामान्य माणूसच... ¤ >> मी स्पष्टवक्ता असलो तरी दुष्टवक्ता नाही.  ¤ >> माझी दौड मतभेदापर्यंतच असते, ती मनभेदाला स्पर्श करीत नाही. ¤ >> 'ताकाला जाऊन भांडे लपविणे' ह्या वृत्तीवर मी सडकून टीका सुद्धा करतो. कारण असे करणे म्हणजे दुटप्पीपणाचा अवलंब करणे होय, असे माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे. पण त्यामुळे मी टीका केलेली व्यक्ती माझा/माझी दुश्मन नसते. ¤ >> गौतम बुद्धाचा original text चा बुद्ध-धम्म डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या संशोधनात्मक ग्रंथात मांडताना restoration of (original) text साठी collations, interpolation, addendum, et corrigendum, apocryphal literature आदि पाठभेद-शोधक /सिद्धांतांचा/प्रक्रियांचा वापर करून मूळ रुपाच्या अगदी सन्निकट जाणारा बुद्ध धम्म त्यांच्या अनुयायांकरिता सिद्ध केला. तसा *"सर्वमान्य"* प्रयत्न अन्यधर्मीयांतील जाणकार-विद्वानांनी केल्याचे आढळून येत नसल्याने ; अशा अन्य धर्मांच्या धर्मग्रंथांतील collations, interpolation, addendum, et corrigendum, apocryphal literature आदिंची ...

तसं पाहिलं तर या टिपणाला काहीच महत्त्व नाही...!

◇तसं पाहिलं तर या टिपणाला काहीच महत्त्व नाही...!◇ ¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤▪▪▪¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤      1 )कोणताही ग्रंथ न वाचताच ऐकीव माहितीवरून त्या ग्रंथातील तथाकथित लिखाणावर बुद्धीभेद करणारी टीका-टिप्पणी करणे, हे instant विद्वत्तेचे प्रमुख लक्षण आहे.     2)आपली रेषा मोठी करण्यात बुद्धी व ज्ञानाचा उपयोग व वापर करण्याऐवजी दुस-याची मोठी रेषा पुसण्यासाठी आपल्या बुद्धी व ज्ञानाचा उपयोग व वापर केल्यास "विद्वत्ता आणि प्रसिद्धी" ह्या दोन्ही "पदव्या" तात्काळ हासिल करता येतात.     3)रावण व राम (किंवा कोणीही पौराणिक व/वा ऐतिहासिक व्यक्ती) यांच्या बद्दल बोलण्या/लिहिण्यासाठी कोणत्याही अभ्यासाची आवश्यकता नसते. कारण अभ्यास करून बोलले/लिहिले तर त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही, त्याला वाचक मिळत नाहीत. म्हणून आपल्या आवाक्यातील ऐकीव माहितीचा (ज्ञानाचा नव्हे!) उलट-सुलट "वापर" करून केलेल्या लिखाणाला भरपूर प्रसिद्धी व वाचक मिळणे अगदी सुलभ असते.     4)थोड्याशा सत्याने खूप सा-या असत्याला फोडणी देऊन तयार होणारी सत्त्योत्तर (post truth) रेसेपी ग्राहकांना वाढता आल्यास दुकानात ग्राह...

पोवाडा : महाराष्ट्र की लोक संस्कृति का एक अंग (झाडीपट्टी के संदर्भ में) प्रकाशित-मड़ई 2020

*पोवाडा : महाराष्ट्र की लोक संस्कृति का एक अंग* (झाडीपट्टी के संदर्भ में)/प्रकाशित : मड़ई 2020 ------------------------------------------------------------- *@ॲड.लखनसिंह कटरे*  ----------------------------------------------- >> अध्ययन-क्षेत्र के इतिहास तथा संस्कृति इन दो विषयों के दायरें में अक्सर अभिजनों के इतिहास और संस्कृति का ही प्रभाव नजर आता है। जबकि इन दोनों विषयों को सही मायने में समझने के लिए अभिजनों के साथ-साथ बहुजनों के इतिहास और संस्कृति का भी अध्ययन अनिवार्य होता है। इस सत्य को अब अध्ययन क्षेत्र में मान्यता और स्वीकृति भी मिल रही है, यह स्थिति संपूर्ण मानवेतिहास तथा मानव-संस्कृति को समझने/समझाने में सहायक ही साबित होगी/हो रही है। भूमंडलीकरण का यह वर्तमान दौर कुछ मायने में मानवजाति के लिए कठिनतम है तो कुछ मायने में बहुत ही सरलतम भी प्रतित होता है। इसी दृष्टि से देखा जाए तो हम मानव-संस्कृति के सर्वसमावेशक अध्ययन को, इसी संक्रमण काल में कठिनतम से सरलतम होने की प्रक्रिया और परिणाम, भी मान सकते हैं। अतः हम प्रथम संस्कृति के धाराओं को समझने का प्रयास करेंगे।  >...

प्राक्कथा : एक संक्षिप्त आकलन (प्रकाशित, तत्रैव)

*प्राक्कथा : एक संक्षिप्त आकलन* (प्रकाशित, तत्रैव) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे ---------------------------------------------------------- (1) प्राक्कथा : सामाजिक आणि सांस्कृतिक भूतकाळाच्या विश्लेषणाच्या संदर्भात ऐतिहासिक वाटणारी पण वाङ्मयाच्या कालातीत मूल्याच्या पुरस्काराच्या संदर्भात इतिहासनिष्ठ नसलेली कथा, अशी प्राक्कथेची एक सुटसुटीत संकल्पना व्यक्त केली जाते. (वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश : प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके व इतर) (2)प्राक्कथा आणि लोकसाहित्य : प्राक्कथा ही स्वयंभू नसते, तर मानवी मनाच्या गूढ गुहेत दडून बसलेल्या आदिम इच्छा-आकांक्षांचे ते धार्मिक कथा-कहाण्यांतील पात्रांवरील/घटनांवरील प्रतीकात्मक प्रत्यारोपण असते. हे प्रत्यारोपण सर्वप्रथम लोककथेतून अवतरते व अशाप्रकारे लोकसाहित्य या आदिम साहित्यप्रकाराची रचना-निर्मिती होत असते. अर्थात प्राक्कथेचे बीज सर्वप्रथम लोकसाहित्यातूनच उद्भवते असे आढळून येते. लोकसाहित्यात केवळ प्राक्कथेची बीजे आहेत असे नसून त्यात शक्यताच शक्यता बीजरूपाने अस्तित्वात आहेत. फरक इतकाच की लोकसाहित्य सहज आहे तर प्राक्कथेला आदिबंधात्मक असा ...