झाडीपट्टीच्या लोकजीवनातील "वाघ" नदी.
*झाडीपट्टीच्या लोकजीवनातील "वाघ" नदी!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ पूर्वीच्या सी.पी.ॲण्ड बेरार मधील झाडीपट्टीच्या अगदी मध्यभागी असणा-या सध्याच्या गोंदिया जिल्ह्याची जीवनदायिनी वाघ नदीचे या भागातील लोकजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाघ नदीचा उगम सध्याच्या छत्तीसगढ़ राज्यातील असल्याची एक लोकमान्यता असून तिच्या उगमस्थानाजवळच्या एका गावाचे नावच बाघनदी आहे. (हिंदीत वाघ चा उच्चार सहसा बाघ असा केला जातो.)//(या नदीचा उगम गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिचगड परिसरातील वांढरा(डोंगरगाव) येथील टेकड्यांतून झाला असे सुद्धा/अधिकृतरित्या मानले जाते.) बाघनदी हे गाव आजच्या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण) च्या "जमान्या"त वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असले तरी वाघ नदीचे ग्रामसौंदर्य मात्र या गावाने अजूनही जरासे जपलेले आहे. मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव आपल्या "अजीबोगरीब" नावाने या महामार्गाने जाणा-या येणा-यांना मोहवून घेते व किमान चहा तरी घ्या म्हणून प्रवाशांना(!) खुणावते. अशी ही आमची...