Posts

Showing posts from February, 2020

स्मरण : 1980 : दोन प्रसंग

□*1980 : दोन प्रसंग : आठवणीत रूतलेले.*□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       1978-79 शैक्षणिक वर्षात मी शहीद जान्या-तिम्या  जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगांव (तत्कालीन जिल्हा भंडारा) या शाळेत 3B1 नियमांतर्गत गणित-विज्ञान शिक्षक म्हणून प्रथमच रूजू झालो. उन्हाळ्याच्या सुटीत आम्हाला कार्यमुक्त (terminate?) केले जायचे. जून मध्ये शाळा सुरू झाल्यावर पुन्हा नियुक्त केले जायचे. आमची नियुक्ती फक्त पाच-पाच महिन्यांकरिताच असायची. दरम्यान चार-पाच दिवसांची गॅप देऊन पुन्हा नियुक्ती केली जायची. उन्हाळ्याच्या सुटीत दोन महिने आम्हाला नियुक्ती नसायची.       1979-80 करिता माझी फेरनियुक्ती जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, देवरी (तत्कालीन जिल्हा भंडारा) येथे केली गेली. तिथे श्री.ज्ञानेश्वर झा हे प्राचार्य होते. त्यांच्यासोबत माझी एवढी गाढ गट्टी व भक्ती जुळली की मी देवरी सारख्या तत्कालीन आदिवासी गावात,// पिण्याच्या पाण्याची, वीजेची आणि शौचालयाचीही भयंकर किल्लत असलेल्या गावात,// बाहुल्याने असलेल्या आदिवासी विद्यार्थांच्या सहवासात अक्षरशः रमलो.        जून 1980 मध्...

आय लव्ह यू.......?

□आय लव्ह यू...□ ~~~~~~~~~~~~       1966च्या दिवाळीच्या सुटीनंतर आमच्या बोरकन्हार या गावातील वर्ग 06 ची मान्यता शिक्षण विभागाने काढून घेतली. त्यामुळे दिवाळीनंतर आम्ही 03 किमी वरील जवळच्याच अंजोरा या गावातील माध्यमिक शाळेत सहाव्या वर्गात प्रवेश घेतला. दररोज तीन किमी पायी (Bare footed) जाणे-येणे करीत आमची शाळा सुरू झाली. तिथे मला हरिदयाल धरमदास डोंगरे, गेंदलाल रूधाजी वालदे, रामेश्वर परसरामजी बहेकार, महादेव अंताराम  चौधरी, असे काही अभिन्न मित्र लाभले. त्यापैकी रामेश्वर बहेकार आणि हरिदयाल डोंगरे यांच्यासोबतची मैत्री अजूनही जिवंत आहे.          सहाव्या वर्गात आमचे वर्गशिक्षक होते, रघुनाथ मनाजी दोनोडे गुरुजी. इंग्रजी आणि हिंदी शिकवायचे बाजपेयी गुरुजी. मराठी, गणित व इतर सर्व विषय दोनोडे गुरुजीच शिकवत असले तरी गणिताचा वर्ग पुष्कळदा मुख्याध्यापक गोमा दाजिबाजी फुंडे गुरुजी घेत असत. माझ्या आईच्या सुरुवातीपासूनच्या मार्गदर्शनामुळे माझा गणित हा विषय आवडीचा व मजबूत होता. गणिताच्या कोणत्याही परिक्षेत मला 100% गुण असायचे. पण इंग्रजी, इतिहास, भूगोल हे विषय...

निसर्ग-नियम आणि संयम तथा अनिर्बंध उच्छृंखलता

*निसर्ग-नियम आणि संयम व अनिर्बंध उच्छृंखलता* ---------------------------------------------------------------       एका मराठी वर्तमान पत्राच्या युवा पुरवणीत नुकताच एक लेख वाचण्यात आला. त्या लेखातील पहिलेच काही परिच्छेद असे...       @@@..."व्हॅलेन्टाइन्स वीक सुरु झाला. बाजारपेठा सजतील, लालचुटूक फुगे, हाॅटेल्स, माध्यमातल्या बातम्या हे सारे सुरु होईल.      हे सारं आपल्या समाजात खरं आहे की नाही? तर आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणणारं तारुण्य आहे की नाही, तर आहे.      मात्र, प्यार के दुश्मन हजार हे आजही खरंच आहे. वाचतोच आपण बातम्या. प्रेमाची शिक्षा म्हणून भररस्त्यात आजही गळा कापला जातो. त्याच्या बातम्या वाचून, व्हायरल व्हिडिओ पाहून भीती वाटतेच. आजही खेड्यापाड्यातच कशाला, शहरातही जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरुप हे सारे प्रेमात आडवे येतं. ते सारं एका टप्प्यावर इतकं महत्वाचं ठरतं की त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत. आणि आपल्यामुळे नको घरच्यांना त्रास म्हणून यश चोप्रा फिल्म ...

VidLitFest Nagpur 8/9 February 2020

VLF : 8/9 FEBRUARY 2020 (नागपूर) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~     "INDIA's First Literature FESTIVAL dedicated Solely to NON-FICTION Books & Literature" या यथोचित शीर्षकाखाली आयोजित दोन दिवसीय VidLitFest मध्ये उपस्थित राहून त्याची "चव चाखता" आली, याचा खरोखरीच आनंद आहे. या FESTIVAL चे एकूण स्वरूप पाहता याच्या नावात VIDARBHA ऐवजी NAGPUR असायला पाहिजे होते, असे वाटून गेले. पण एकंदरीत हे FESTIVAL सफल झाले व उपस्थित वाचकांना खूप समृद्ध करून गेले, हे मात्र खास. त्यासाठी या FESTIVAL च्या सर्व आयोजकांना धन्यवाद व त्यांचे आभार सुद्धा.  माझ्या जुन्या ओळखीच्या डाॅ.नीलिमा कोटा (विख्यात इंग्रजी लेखिका, संशोधक, चित्रकार) यांच्या सुचनेनुसार मी या FESTIVAL ला उपस्थित राहू शकलो, नीलिमा मॅम यांची भेट होऊ शकली, हे सुद्धा महत्त्वाचे. 09.02 चे बोरिया मजूमदार यांचे INAUGURAL SPEECH म्हणजे उत्कृष्ट व्याख्यानाचे जणू प्रात्यक्षिकच!  शर्मिष्ठा गुप्तु या मुळच्या HISTORIAN आता FICTION WRITING कडे सुद्धा वळल्या असून त्यांचे यासंदर्भातील अनुभव-बोल खूप खूप महत्त्वपूर्ण ठरलेत. त्यांना बोलते करण...

कावळा हागता.... (एक टिपण)

■कावळा हागता.....!■ ~~~~~~~~~~~~~        पुण्याहून त्यावेळी प्रकाशित होत असलेल्या व डाॅ.आनंद यादव संपादक असलेल्या "विचार भारती" या नियतकालिकाच्या मार्च-एप्रिल-1988 च्या अंकात प्रकाशित माझ्या एका लघु-टिपणात मी व्यक्त केलेले विचार आज अचानक तीव्रतेने स्मरण-जागृत झाले. याला निमित्त ठरला प्रफुल्ल शिलेदार द्वारे संपादित "युगवाणी" च्या ऑनोडि-2018 अंकात प्रकाशित श्री.सुधीर रसाळ यांचा "गो.वि.करंदीकरांची समीक्षा" हा अतिशय महत्वपूर्ण लेख!       या संदर्भ-श्रीमंत लेखात रसाळ यांनी करंदीकरांचे साहित्य-समीक्षा विषयक मत/विचार (भाष्य) उद्घृत केलेले आहेत. एकंदरीत हा लेख माझ्या दृष्टीने एकूणच मराठी साहित्य व त्याची समीक्षा या संदर्भात अतिशय महत्वाचा तथा मैलाचा दगड ठरावा असा झाला आहे. या लेखाबद्दल मी शिलेदारजी व रसाळजी यांचा कृतज्ञ आहे/राहीन.         सदरील लेखात उद्घृत एक विधान मला माझ्या "त्या" प्रतिपादनाला पूरक वाटत असल्याने मी स्वाभाविकरित्या "प्रफुल्लि"त झालो. ते विधान असे -- "...ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी माणसाच्या वर्तनसंबं...