Posts

Showing posts from March, 2025

फिनिक्स माॅल ऑफ द मिलेनियल्स..... (जय हो...!)

*जय हो......!* ~~~~~~~~           फिनिक्स माॅल ऑफ द मिलेनियल्स, वाकड, पुणे या सुमारे 10-12 एकरात विस्तारित असलेल्या, सध्या सहा मजली असलेल्या अवाढव्य-अवाढव्यतम अशा अत्याधुनिक "परिसरा"तील आयनॉक्स मध्ये काल दि.16 मार्च 2024 ला 'सैतान' (की शैतान?) नावाचा तद्दन फालतू व कल्पनादारिद्र्याचा उत्कृष्ट उदाहरण/नमुना(?) असलेला सिनेमा "देखला". (आणि सारीडाॅनच्या टेबलेट्सची विक्री वाढवण्यात थोडासा हातभार लावला.)      या अवाढव्यतम माॅल मधील अवर्णनीय(?) गर्दी 'देखून' मला कैदेतून सुटलेल्या बंदीवानांचे वर्तन कसे असू शकेल याचा, 'याचि देही याचि डोळा' स्वानुभव घेता आला.        मी तीस वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात वरीष्ठ राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत असताना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद(?), नाशिक, नागपूर सारख्या महा ते महत्तम नागरी भागातही राहण्या/असण्याचा थोडाफार अनुभव घेतला आहे. या अशा अनुभवाच्या असहनीय मनस्तापाला मी पेलू शकण्यास स्वतःला असमर्थ जाणून, माझ्या निवृत्तीनंतर, सध्या गेली अकरा वर्ष...