"व्यवस्थेत बदल नक्की होईल, आणि ते खालूनच शक्य आहे" : माझे एक अल्पबुद्धि-आकलन
*"व्यवस्थेत बदल नक्की होईल, आणि ते खालूनच शक्य आहे" : माझेही एक अल्पबुद्धि-आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मी 'सर्वंकष'चा प्रथमांकापासूनचा वर्गणीदार-वाचक आहे. 'सर्वंकष'च्या ए-मे-जू 2022 च्या अंकातील आदरणीय डाॅ.माधव गाडगीळ यांच्या वरील शीर्षकाच्या मुलाखतीतून व्यक्त विचार हे मानवाच्या पृथ्वीवरील आनंदमय शाश्वत अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व संतुलन साधणे कसे अनिवार्य आहे, ह्या संदर्भातील त्यांच्या तद्विषयक सघन व प्रत्यक्ष स्वानुभवीय अभ्यासाचे द्योतकच आहेत. त्यांनी अगदी सुस्पष्टपणे व सडेतोडपणे आपले तद्विषयक अध्ययन व तद्जनित विचार व्यक्त करून संवेदनशील वाचकांना विचारप्रवृत्त होण्यास भागच पाडले आहे, असे मला वाटते. या सद्यकालीन-परमावश्यक ठरत असलेल्या एका ज्वलंत विषयाला त्यांनी सजग व सुजाण वाचकांसमोर ठेवून वाचकांना त्यादृष्टीने कार्यप्रवण व्हायला जणू मजबूरच केले आहे. हा विषय शासनकर्त्यांना/धोरणकर्त्यांना त्यांच्या अजेंडावर प्राथमिकतेने घेऊन त्यावर तातडीने सकारात्मक व सक्षम, सुफल उपाययोजना करण्या/राबविण्यासाठी लोकजागराचे/सक्रिय लोकसहभागाचे दबावतं...