कवी आणि कविता, मी आणि......
*कवी आणि कविता, मी आणि ...* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> विदर्भ साहित्य संघ, शाखा भंडारा / युगसंवाद, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संस्था, भंडारा / मैफल, लाखनी द्वारा संयुक्तरित्या आयोजित *कवी आणि कविता* या विशेष उपक्रमाच्या श्रृंखलेत दि.30 एप्रिल 2016 (शनिवार) रोजी आयोजित दुसऱ्या कडीचा *निमंत्रित कवी* मी होतो. आयोजक डाॅ.अनिल नितनवरे, गझलकार श्री.प्रल्हाद सोनवणे, कवी-चित्रकार श्री.प्रमोदकुमार अणेराव, डाॅ.सुरेश खोब्रागडे, डाॅ.नरेश अंबिलकर आणि काही मोजक्याच रसिक स्नेही मंडळींच्या उपस्थितीत रामटेकचे डाॅ.गिरीश सपाटे यांनी माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. (या मुलाखतीचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध आहे.) >> त्या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात मी स्पष्टपणे व ठामपणे सांगितले होते की, "मी अजूनही कोणत्याही विचारवाद वा विचारसरणीच्या चक्रव्यूहाला शरण गेलेलो नाही." आजही माझे ते विचार कायमच आहेत. कारण विचारवाद व/वा विचारसरणी यांना मी अजूनही अंतिम मानू शकलेलो नाही. 'मते कालाच्या पोटात विलय पावतात', असे, ह.ना.आपटे यांचे एक विधान, मी माझ्या माध्यमिक शाळेत सारस्वत पाठमाला या क्रमिक प...