Language, भाषा आणि बोली : एक पॅरेडाईम
*Language, भाषा आणि बोली : एक पॅरेडाईम* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ मुंबई, पुणे सारख्या नागरी/महानगरीय भागातील (सर्वच नसले तरी) बहुतेक मराठी साहित्याच्या व साहित्यिकांच्या "लघुवर्तुळ-Language"च्या परीघाबाहेरील आम्हा पूर्व विदर्भ-महाराष्ट्रीयन झाडीपट्टीवासीयांची "भाषा" मुंबई, पुण्यासारख्या भागातील बहुतेक साहित्यिकांना "विटाळ"णारी वाटत असल्याची #कटू जाणीव होऊ लागल्याने, सर्वप्रथम 1990 दरम्यान आम्ही पूर्व विदर्भातील झाडीपट्टीवासीयांनी झाडीबोली साहित्य मंडळाची स्थापना केली. .....आणि आजवर तिचे बत्तीस/32 साहित्य संमेलन, शासनाच्या कोणत्याही कुबड्यांशिवाय, अर्थसाह्याशिवाय यशस्वी रित्या पार पाडले आहेत. बत्तीसावे झाडीबोली साहित्य संमेलन 28, 29 डिसेंबर 2024 ला वरोरा(आनंदवन), जि.चंद्रपूर येथे यशस्वीरित्या पार पडले आहे. या बत्तीसाव्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध शाहीर, गझलकार, लोककलावंत श्री.लोकराम शेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे/होती. (मी स्वतः वरोरा(आनंदवन), जि.चंद्रपूर येथेच यापूर्वी जानेवारी-...