काही गोड, काही कटू वास्तव
*काही गोड, काही कटू वास्तव* ************************* तसा तर माझ्या आईच्या संस्कारामुळे मी वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासूनच अवांतर वाचण्यासाठी लालायित असायचो. 1970-71च्या दरम्यान माझ्या वर्गशिक्षिका डाॅ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने माझी ही सवय आणखी दुणावली/तिनावली, वगैरे. 1972-73 पासून मी वाचलेल्या व मला आवडलेल्या पुस्तकाच्या/लेखाच्या/कवितेच्या रचनाकाराचा संपर्क सूत्र मिळवून त्यांना प्रतिसाद पत्रे लिहू लागलो. काही वर्षांनंतर दूरध्वनी ची सोय उपलब्ध झाल्यावर त्याचाही "त्या" साठी वापर करू लागलो. आता चलभाष यंत्र आणि FB/WA/TWITER/TELEGRAM/INSTAGRAM, etc च्या युगात त्या/त्या साधनांचाही "त्या"साठी वापर करू लागलो. माझी मातृभाषा हिंदी(पोवारी) असणे, मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण (गणित वगळता) मराठी माध्यमातून होणे, पुढील सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे, त्यामुळे मला तिन्ही माध्यमातील रचनाकार समरसून वाचता/अभ्यासता आले/येतात. (असे मला वाटते!) या रचनाकारांशी मी वरील साधनांच्या माध्यमातून, माझ्या अल्पबुद्धीच्या प्रतिक्रियेसह, एकतर्फी संपर्कात...