Posts

Showing posts from January, 2020

डाॅ.किशोर सानप आणि "इतिहास आढळत नाही"

-डॉ.किशोर सानप दिविशा, 249/ए, मानेवाडा बेसा रोड, शाहू नगर, नागपूर-440 034 Email-  dr.kishorsanap@gmail.com Web-www.kishorsanap.com Phone-9326880523, 9518368976 नागपूर, दिनांक १२ मार्च २०१९  ~~~~~~~~~~~ □इतिहास आढळत नाही : सृष्टी रहस्याचा अमूर्त ध्यास□ डॉ. किशोर सानप ---------------------------------------------------------------------        पायव्याला वाळवी लागता, ज्ञातमार्गही भुलले काही, निर्णयाच्या खगोलात मात्र, इतिहास आढळत नाही...कवितेला चिंतनाची आणि अज्ञाताच्या शोधाची डूब देणारे कवी म्हणून लखनसिंह कटरे यांचा उल्लेख करावा लागतो. साठीच्या पुढे कवी अधिक आत्मसन्मुख झाला असे म्हणण्यापेक्षा आत्मसन्मुख होणे हा कवीच्या काव्याचाच गुण आहे. इतिहास आढळत नाही, या सहाव्या कविता संग्रहातून किंवा दीर्घकवितेतूनही त्याचा प्रत्यय येतो. नागपूरच्या मध्यमा प्रकाशनाने कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या प्रतीकात्मक मुखपृष्ठासह देखण्यारूपात सन् 2018 मध्ये कवीची दीर्घकविता प्रकाशित केली आहे. यापूर्वीच त्यांचे प्रमेय (1996), जाणिवेतले कर्कदंश (2000), शाश्वत मौ...

"महाराष्ट्र दर्शन" (समकालीन प्रकाशन) या ग्रंथाबद्दल..... (लेखक-प्रकाशकासोबतचा एक पत्रव्यवहार)

सप्रेम नमस्कार ,   आपले इमेल पत्र मिळाले तेंव्हा मी   बाहेरगावी होतो. तसे मी   आपल्याला कळवलेही होते.   ' महाराष्ट्र दर्शन ' या   आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकाबद्दलचा आपला प्रतिसाद वाचला. सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. आपल्याला याआधी कळवल्या   प्रमाणे मी   प्रतिकूल प्रतिसादाकडे दुर्लक्ष करणारा माणूस नाही. आपण एखादे काम केले तर   त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येणारच, त्याला नाकारायचे   कशाला , हा   माझा   दृष्टीकोन आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की   त्यामुळे प्रत्येक अभिप्रायावर प्रतिक्रिया दिली जाईलच. यापूर्वी आपण आम्ही प्रकाशित केलेल्या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया पाठवली होती. ती मी वाचलीही होती, पण   त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज मला वाटली नाही, कारण आपले आक्षेप लेखकाच्या दृष्टिकोना बद्दल होते आणि त्याची चर्चा आपण लेखकासोबत करणेच श्रेयस्कर होते. अर्थात, तशी ती   करायची   की   नाही हा   आपला प्रश्न होता. असो.   'महाराष्ट्र दर्शन' पुस्तकावरील   आपली प्रतिक्रिया मात्...

लोकान्त ते एकान्त : एक प्रवास (वाङ्मयीन लोकशाहीच्या दिशेने...)//प्रकाशित//साहित्य चपराक//

□लोकान्त ते एकान्त : एक प्रवास. (वाङ्मयीन लोकशाहीच्या दिशेने...) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       वस्तूतः, ही सर्वमान्य वस्तुस्थिती आहे की, नैसर्गिक वाढ झालेले अरण्य आणि लागवड केलेले वन यांच्यात एक अनाकलनीय असा मूलभूत फरक असतो. त्यातील विचरण परिभाषित करता येणार नाही अशा पध्दतीने वेगवेगळे अनुभव प्रदान करीत असते. एखाद्या अभ्यासकाला यासंदर्भात सखोल संशोधन करून ह्या 'फरका'चे नियम, निकष व तर्क-संदर्भ अवश्य शोधता/मांडता येतील. तरी आईन्स्टाईनचा सापेक्षवादाचा वैज्ञानिक सिद्धांत येथेही लागू होत असल्याने त्यावरही मतभिन्नता असण्याचे नाकारता येणार नाही.         याच संदर्भात जेव्हा एखाद्या खेडूत/ग्रामीण तरुणाचे शिक्षणासाठी किंवा जीवनयापनासाठी महानगरात स्थलांतर/विस्थापन(?) होते तेव्हा त्याच्या विचारविश्वात होणारी उलाढाल व उलघाल सुद्धा परिभाषित करणे दुरापास्तच ठरते. ग्रामसंस्कृतीने त्या तरुणावर त्याच्याही नकळत (त्याच्यावर) केलेले/झालेले ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक संस्कार त्याला सहजी पुसता येत नाहीत. आणि त्याचवेळी त्या महानगरीचे इतिहास, भूगोल, संस्कृती...

ओबीसी (चळवळ) आणि किसानोत्थान चळवळ : एक आकलन

ओबीसी (चळवळ) आणि किसानोत्थान चळवळ : एक आकलन  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      ओबीसी प्रवर्गामध्ये मोडणारी भारतीय जनसंख्या/लोकसंख्या मागील कित्येक(?) दशके मोजलीच जात नसली तरी ती एकूण भारतीय/इंडियन लोकसंख्येच्या साठ(60)% पेक्षा कमी नसावी, असा साधार कयास मांडला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकसंख्येच्या कोणत्याही विधीमान्य, सामाजिक-न्यायमान्य, न्यायोचित, ... मागण्या मात्र आजवरच्या कोणत्याही "इंडियन" शासन व्यवस्थेने अजूनतरी गंभीरपणे, सकारात्मक रित्या विचारात सुद्धा घेतलेल्या नाहीत, ही #कटू-वस्तुस्थिती (#BitterReality) आहे.          मात्र असे कां घडले/घडत असावे? हा महाभयंकर प्रश्न सुद्धा अनुत्तरितच आहे.         माझे अल्पबुद्धीचे आकलन असे आहे की, आम्हा ओबीसी चळवळीतील धुरीणांना शाहू, फुले, आंबेडकर, कांशीराम,... काही पेलवता/उलगडवता आले/येत नाहीत, आणि त्यामुळे विचारधारा, मार्गक्रमण, व्यूहरचना, ... या बाबी सुस्पष्ट असूनही आम्ही अजूनही फक्त चाचपडतच आहोत. या संदर्भात एक सत्य-घटना काहीशी आठवते ती अशी----     संप...

पोवारी बोली आणि लोकसाहित्य : एक दृष्टिक्षेप.

पोवारी बोली आणि लोकसाहित्य : एक दृष्टिक्षेप.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~ @लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902. ~~~~~~~~~~~~~~~~~~~        फ्लोरिडा (अमेरिका) येथील एक स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक न्याय व अधिकारांकरिता लढणारी एक्टीव्हिस्ट (कार्यकर्ती) एल.आर.नाॅस्ट यांच्या एका प्रसिद्ध कवितेतील काही ओळी अशा आहेत ---- आपलीच कहानी बोलावी  आपलीच कहानी सांगावी  स्पष्ट, बुलंद आवाजात  क्वचित अस्पष्ट बडबडीत सुद्धा ___ पण लिहावीच..., बोलावीच..., सांगावीच..., आपली कहानी.  काही स्वनामधन्य समजू शकणार नाहीत  आमची ही कहानी,  काही प्रतिष्ठित एखादेवेळी   करतील अस्वीकार सुद्धा. तरी काही लोक आहेत अजून  जे समजू शकतील आमची कहानी,   मानतील आमचे आभारही. आणि नंतर घडेल  एक जादू , एक चमत्कार... येऊ लागतील मग काही अगम्य आवाज स्वीकाराचे, काही कुजबुज सुद्धा स्वागताची. पसरेल आसमंतात मग स्वर  --- "मला सुद्धा सांगायचंय..., बोलायचंय..., लिहायचंय...," आणि मग संगठीत होईल  तुमचा समाज  तुमचे आप्तगण  तुमचा कुळ सुद्धा  ---- तेव्...

आळंदी आणि योगिराज ज्ञानेश्वर : एक स्वानुभव

आळंदी आणि योगिराज ज्ञानेश्वर : एक स्वानुभव ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       माझी कन्या आणि जावई वाकड येथे वास्तव्याला असल्याने मी वर्ष-सहा महिन्यातून एकदा तरी वाकड(पुणे) येथे येत असतो. आळंदी हे वाकड वरून सुमारे 35-40 किमी वरच असूनही व वेळ उपलब्ध असूनही मी आजवर आळंदी ला जाऊ/भेट देऊ शकलो नव्हतो.      म्हणूनच आज दि.14 जानेवारी 2020 ला अगदी ठरवून व पूर्वनियोजन करून आळंदी ला जाऊन/भेट देऊन आलो. पण तेथे जाऊन/भेट देऊन मी चूक केली असे मला आता वाटत आहे. कारण ज्ञानेश्वर हे लोकोत्तर मानव आणि मानवी प्रज्ञा तथा कर्तुत्वाचा एक उदात्त आविष्कार असल्याची जाण आम्ही(बहुसंख्य) गमावून बसलो की काय, अशी शंका त्यामुळे माझ्या मनात उद्भवून मला अकारणच मनस्ताप घडला.     आम्हा(बहुसंख्य) भारतीयांना देव या संकल्पनेचा इतका सोस आहे की आम्ही कोणत्याही दगडाला सुद्धा देव करून टाकतो. येथे तर योगिराज, भगवद्गीतेचे यशस्वी भाष्यकार, अद्भूत प्रज्ञावान अशा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधीचे स्थळ ! अशा पवित्र स्थळाला आम्ही "देवस्थान" करून टाकल्याचे म्हणूनच आश्चर्...

गडचिरोली जिल्हा, आदिवासी आणि त्यांचे आभासी स्वातंत्र्य........

 □गडचिरोली जिल्हा, आदिवासी आणि त्यांचे आभासी-स्वातंत्र्य□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @लखनसिंह कटरे, बोरकन्हार-41902  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       नागपूर हून प्रकाशित होत असलेल्या एका मराठी वर्तमान पत्रातून मागे काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेला, 'आदिवासींचे आभासी स्वातंत्र्य' या शीर्षकाचा, माझ्या एका मित्राचा, एक वस्तुस्थिती निदर्शक असा #BitterReality (#कटू-वस्तुस्थिती) चा सडेतोड लेख  वाचला होता. तो लेख वाचून मला माझा अनुभव शेअर करावा असे वाटल्याने मी माझा तत्संबंधीचा अनुभव येथे देत आहे.        मी 2004 ते 2010 या कालावधीत दोन-दोन वर्षांच्या दोन टर्म गडचिरोली येथे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हा प्रमुख (DDR) म्हणून कार्य केले असल्याने मी या लेखातील आकलनाशी स्वानुभवाधारे माझी सहमती दर्शवीत आहे.          मला राजकीय व प्रशासनिक पातळीवरील हलगर्जीपणा, भ्रष्टाचार, अनागोंदी व लूट बद्दल येथे कोणतेही मत व्यक्त करावयाचे नाही, कारण कोळसा कितीही उगाळला तरी तो आपला काळा रंग कधीच सोडत नसतो. पण मी ए...