Posts

Showing posts from November, 2023

शीर्षकाला डावलून उगवलेली एक कविता

*शीर्षकाला डावलून उगवलेली एक कविता* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ दबा धरून बसलेले अनाघ्रात मौन  डोळ्यांनी बोलत राहिले अनाकलनीय काही  अंतरिक्षातील निर्वात पोकळीत  विखंडित होत राहिले ते मौन शब्दांशिवायही. विखंडित ते मौन झाले मग अगम्य  शब्दांना पेलवेनासे झाले मौन सारे अनाठायी  अर्थ सारे गेले सोडून शब्दांना  अर्थशून्य शब्द सारे अर्थाविना झाले त्राहीत्राही. नृत्यसम्राट बृहन्नडा रथी झाल्यावर  उत्तरांना सापडेना अहिल्येचा तो गौतम कुठेही  महाभारतातील कथने थकली आणि  रामायणातील कथने पांघरती अनाहूत बेपर्वाई.  नवोन्मेषी कथनांच्या अंतरंगात  रचता न आले शब्दार्थ नवनवे अंतर्निहित काही परंपरागत सारे आगंतुक परंतुक  चिकटून बसले परंपरेला जणू अभेद्य ऋण काही. भेदता न आले ते अभेद्य ऋण  चक्रव्याढीने वाढू लागले व्याजही सारे चक्रव्यूही  भेदता न आला तो चक्रव्यूह आणि  कळला न फरक दोन महाकाव्यांतील तो प्रवाही.  क्षितिजाची उघडझाप होत जाता  आवरले गेले अन्यमनस्कतेने अनावर सारे काही  हळूच झाला मग शाश्वत उषोदय  जिंकलेला कल्पनेतील डाव ड...