ग्रामीण अर्थव्यवस्था : काही भ्रम (संक्षिप्त टिपण)
*ग्रामीण अर्थव्यवस्था : काही भ्रम (संक्षिप्त टिपण)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ग्रामस्वराज्य ही संकल्पना ज्या काही मूलभूत घटकांवर आधारित आहे, त्यापैकी एक अत्यधिक महत्त्वाचा घटक म्हणजे एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सुदृढीकरण/स्वावलंबन हे होय. अशा या ग्रामीण अर्थव्यवस्थेची कायम वाढ व तिचा चिरंजीवी विकास साधल्याशिवाय महात्मा गांधीप्रणित ग्रामस्वराज्याची कल्पना फक्त एक कपोलकल्पित बाबच ठरेल. वस्तूतः भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामाधारित कृषी-अर्थव्यवस्था आहे. (संदर्भ : महात्मा गांधी, विनोबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार तथा नुकताच संपूर्ण मानवजातीला धडा शिकवून गेलेला कोरोना-काळ). अशा या ग्रामाधारित कृषी-अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत, शाश्वत व टिकाऊ असल्या/झाल्याशिवाय एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेचे सुदृढ असे कायम वाढीचे चिरंजीवी मंदिर उभेच राहू शकणार नाही. पाया मजबूत असेल तर आणि फक्त तरच इमारत व शिखरही मजबूत होऊ शकतो, हा निसर्गाचा अकाट्य नियमच आहे! (अशी ही वस्तुस्थिती असली तरी, एखाद्याला दिवसाढवळ्या सूर्याकडे तोंड करून...