मित्रवर्य देवराव जीभकाटे, मी आणि माझा कँसर
*मित्रवर्य देवराव जीभकाटे, मी आणि माझा कँसर* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मी, यवतमाळ येथे दि.15 मे 2006 ते 01जून 2008, त्यानंतर गडचिरोली येथे दि.02 जून 2008 ते 24 जून 2010 आणि तदनंतर पुन्हा दि.25 जून 2010 ते 28 फेब्रुवारी 2013 पर्यंत यवतमाळ येथेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हाप्रमुख म्हणून डीडीआर या पदावर कार्यरत होतो. 28 फेब्रुवारी 2013 ला मी यवतमाळ येथूनच निवृत्त झालो व माझे जन्मगाव असलेल्या बोरकन्हार (ता.आमगांव, जि.गोंदिया, झाडीपट्टी) येथे पुनर्स्थायी झालो. म्हणजेच मी एकंदरीत सुमारे पाच वर्षे (दोन कार्यकाल) यवतमाळ येथील सपरिवार रहिवासी होतो. >> माझ्या या यवतमाळ येथील दोन्ही कार्यकाळाची तुलना करता माझ्या एकूणच व्यक्तिमत्त्वात व प्रकृतीस्वास्थ्यात जमीन-आसमानाचा फरक पडलेला(?) होता, हे मला दोन्ही कालावधीत जाणणाऱ्या/पाहणाऱ्यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. याचे कारण म्हणजे मी गडचिरोली येथे बदलून गेल्यावर 26 सप्टेंबर 2008 ला माझा एक अपघात होऊन त्यात माझा डावा गुडघा तुटल्याने मला चालताना काठीचा आधार घ्यावा लागत असे. लगेचच 18 जानेवारी 200...