विदर्भ : एक दुर्लक्षित विभाग : प्रति, लोकसत्ता
बोरकन्हार-441902, दि.31.10.2024 =========================== प्रति, मा.संपादक, "लोकसत्ता", सस्नेह सादर नमस्कार. आज दि.31ऑक्टोबर 2024 च्या 'लोकसत्ता'मधील आमचे मित्रश्रेष्ठ श्रीनिवास खांदेवाले यांचा 'विदर्भ : निवडणुकीतील एक विस्मृत प्रदेश' हा कटूतम तथ्याधारित लेख वाचला. विदर्भाकडे नैसर्गिक सौंदर्य व संपत्ती, जल संपत्ती, विविध धान्य उपजाऊ सुपीक जमीन, वनसंपत्ती, खनिजसंपत्ती, पीकपाणी यांची अक्षरशः लयलूट असूनही विदर्भ उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मागास/अप्रगत, गरीब व शेतकरी आत्महत्याग्रस्त असा बदहाल का असावा? या प्रश्नाच्या यथोचित उत्तराच्या दृष्टिकोनातून त्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असलेल्या कारणमीमांसेचे काहीसे संक्षिप्त व त्रोटक तरी स्फोटक असेच विवरण श्री.खांदेवाले यांनी या लेखात केले आहे. वस्तुतः यापेक्षा कितीतरी भयंकर व भयानक अशा, शासनप्रणित अन्यायच नव्हे तर धडधडीत अत्याचाराने सुद्धा आमचा विदर्भ पिडीत आहे. याचा जाब विचारण्यासाठी व वर नमूद विदर्भ-विकासातील अडथळ्यांचे घटक दूर करण्याच्या कामासाठी येथील जनतेने निवडून पाठविलेले लोकप्रतिनिधी, यासाठ...