Posts

Showing posts from October, 2022

'सजग' : जुलै-सप्टेंबर 2022 चा अंक वाचून...

बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,  जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र), दि. 29 ऑक्टोबर 2022. =========================== प्रति, सर्वश्री, सतीश तांबे (संपादक), अभिजीत रणदिवे,  गणेश कनाटे, इरावती कर्णिक, उत्पल व.बा. (सर्व कार्यकारी संपादक), अभिजित वैद्य, लोकेश शेवडे, हेमंत कर्णिक, हृषीकेश गुप्ते,  हृषीकेश रांगणेकर (सर्व संपादक मंडळ सदस्य), "सजग"  वॉटरमार्क पब्लिकेशन, 26 नवविनायक सोसायटी, महात्मा सोसायटीजवळ, गांधी भवन, कोथरूड, पुणे-411038. (मोबाईल : 9422016044) (ईमेल : watermarkpublication@gmail.com) सर्व मान्यवरांना सविनय सादर प्रणाम!  🙏🙏🙏 >> मी 'सजग'चा प्रथमांकापासूनचा लव्ह-हेट रिलेशनशीप असलेला वर्गणीदार-वाचक आहे.  >> सद्यस्थितीत मराठीत खरोखरच गंभीर विषयावर चर्चा घडवून आणणारी, वाचनीय, मननीय, संग्राह्य, ... अशी नियतकालिके एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकी सुक्ष्म-संख्या असलेली, आहेत. त्यात 'सजग', 'सर्वंकष', 'खेळ' आणि 'संपृक्त लिखाण' या चार नियत/अनियतकालिकांचा समावेश असून माझ्या सुदैवाने मी या चारहीचा वर्गणीदार-वाचक आहे.  >...

न्याय, अन्याय व नीति विषयक अपसमज व तद्जनित खतरनाक व्हायरस 'इगो'चा...! (एक संक्षिप्त आकलन)/प्रकाशित

*न्याय, अन्याय व नीति विषयक अपसमज व तद्जनित खतरनाक व्हायरस 'इगो'चा...! (एक संक्षिप्त आकलन)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ('आजचा सुधारक' च्या ऑक्टोबर 2022 च्या डिजिटल अंकात प्रकाशित) —------------------------------------------------------- >> पृथ्वीवरील मानवेतिहासातील आजवरचा सर्वात भयानक व खतरनाक असा कोरोनाचा व्हायरस नुकताच येऊन गेला आणि तो अजूनही आपले अस्तित्व अधूनमधून दाखवतच असतो. या कोरोना-व्हायरसने जगातील असंख्य मानवदेह नष्ट केले असून अजूनही त्याचा हा भयानक प्रकोप त्याने पूर्णरूपेण थांबवलेला नाही. अशा या कोरोना-व्हायरस पेक्षा सुद्धा कितीतरी पटीने भयानक व खतरनाक असा एक व्हायरस गेल्या शतकापासूनच मानवेतिहासात आपले अस्तित्व दर्ज करून हळूहळू हातपाय पसरू लागला आहे. एवढेच नव्हे तर तो व्हायरस रोजच्यारोज आणखीन खतरनाक होत जात आहे. दुर्दैवाने बहुतांश मानवजातीला याची अजूनही पुरेपूर जाणीव झाल्याचे दिसून येत नाही, हीच मानवजातीच्या विनाशाकडे वाटचालीची शोकांतिका आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. असा हा आजवरचा सर्वात भयानक व खतरनाक असा विकृतसम व्हायरस म्हणजे मानवातील *अपरिमित ...

स्वतंत्र विदर्भ राज्य : एक #कटू-वस्तुस्थिती

*स्वतंत्र विदर्भ राज्य : एक #कटू-वस्तुस्थिती* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        @ॲड.लखनसिंह कटरे. ---------------------------------------- >> मी ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, तार्किक, आर्थिक आणि तद्विषयक सयुक्तिक/साधार दृष्टिकोनातून कट्टर विदर्भवादी असून तद्विषयक तथ्यात्मक वस्तुस्थितीचे पुनरावलोकन करून करून उद्विग्न होत असतो. विदर्भ राज्य विषयक संदर्भीय असलेला 1953चा नागपूर करार आणि संविधानातील अनुच्छेद 371(2) मधील तरतुदींचा महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांनी केलेला विश्वासघात तथा तद्जनित बट्ट्याबोळासह संख्याशास्त्रीय संख्यात्मक आकडेवारी देऊन देऊन थकल्यावरही राज्यकर्त्यांच्याच नव्हे तर आम्हा तथाकथित वैदर्भीयांच्याही कानावर अजूनही जूं रेंगू शकलेली नाही ही #कटू-वस्तुस्थिती आहे. >> 1960 नंतरच्या गेल्या सुमारे 62 वर्षांत सर्वाधिक कालावधीसाठी विदर्भाकडेच मुख्यमंत्रीपद राहूनही मुंबई नावाच्या मेनका, रंभा, उर्वशींनी आपल्या विश्वामित्रीकरणाच्या जाळ्यातून आमच्या वैदर्भीय मुख्यमंत्र्यांचीही सुटका होऊ दिली नाही. त्यामुळेच कदाचित संपूर्ण भारतात एकमेव अपवाद अस...

इतिहास संशोधन/लेखनातील काही चकवे

*इतिहास संशोधन/लेखनातील काही चकवे* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> असे म्हणतात की, इतिहास आणि विज्ञान या विषयांत अंतिम सत्य असे काहीच नसते, तर या विषयांद्वारे अंतिम सत्याच्या शोधाची प्रक्रिया सतत/कायमस्वरूपी सुरू असते. म्हणूनच इतिहास आणि विज्ञानाने संशोधित/प्रतिपादित केलेले तथ्य व कथ्य कालांतराने बदलत/सुधारित होत असते, ही आपली नित्याचीच अभ्यासप्रक्रिया आहे. अशा या वस्तुस्थितीच्या प्रकाशात इतिहास संशोधन/लेखनात उद्भवू शकणारे/उद्भवणारे काही चकवे जाणून घेणे महत्वपूर्ण ठरेल, असे मला वाटते.  >> *थुसिडायडसचा सापळा (Thucydides Trap)* : ग्रीक इतिहासकार थुसिडायडस याच्या तद्विषयक विचारात या चकव्याची/सापळ्याची मांडणी आढळून येते. इतिहासाच्या संशोधन/लेखनात संबंधित संशोधक/इतिहासकार यांच्याकडून, कदाचित त्यांच्याही अजाणता, काही प्रमाद घडतात/घडू शकतात. आणि अशा प्रमादांच्या वशीभूत होऊन तशा संशोधक/इतिहासकारांकडून भ्रामक व/वा चुकीची मांडणी केली जाते. अशी मांडणी ही ज्या सापळ्यात सापडली/फसली असते त्या सापळ्यालाच थुसिडायडसचा सापळा (Thucydides Trap) अशी संज्ञा दिली जाते. कोणतीही घटना घडून गेल्यावर त...

एक खंत अशीही...

*एक खंत अशीही ...* ~~~~~~~~~~~      माझा जन्म झाडीपट्टीतील एका लहानशा गावात (बोरकन्हार: लोकसंख्या 2338) झाला. माझे आठवीपर्यंतचे शिक्षण सुद्धा या ग्रामीण भागातच झाले. तत्कालीन अकरावी (हायर मॅट्रीक) सुद्धा आमगांव या निम-ग्रामीण गावातूनच उत्तीर्ण झालो. पुढचे शिक्षण सुद्धा गोंदिया या निम-शहरी गावातच झाले. पहिली शिक्षकाची नोकरी सुद्धा तत्कालीन आदिवासी बहुल अशा देवरी येथेच "गेली." माझे सुमारे 90% विद्यार्थी आदिवासी समाजातीलच होते, ज्यांनी ट्रेन स्वप्नातही बघितली नव्हती. देवरी तालुक्यातील व गडचिरोली जिल्ह्यातील चिचगड, ककोडी, बेतकाटी, कोरची, कोटगुल, कुरखेडा, .....  सारख्या त्याकाळी अगदी रिमोट क्षेत्रातील रहिवासी असलेली ती मुले देवरी सारख्या गावालाही बुजडायची!      माझा हा जन्म-परिसर एकेकाळी गोंडवनाचा/दंडकारण्याचाच भाग राहिला असून बहुतेक काळ या भागावर गोंड राजांचेच अधिपत्य राहिले आहे. नंतरच्या कुणबी, पोवार यांच्या जमीनदारीखालील प्रशासना(?)त सुद्धा गोंडी-संस्कृतीचा प्रभाव कायमच होता/आहे. आजही गोंडी संस्कृतीचा प्रभाव येथील जनजीवनावर आढळून येतो. अशा या झाडीपट्टीचा...

बदल/परिवर्तन : एक कोलाज

*बदल/परिवर्तन : एक कोलाज* ~~~~~~~~~~~~~~~~ >> कोणत्याही परिवर्तन/बदलाबद्दल नकारात्मक बोलणारे बहुधा वास्तव नाकारून केवळ स्वतःची गृहीतके -- स्वतःचे पूर्वग्रह, दामटतात. अर्थात केव्हाही/कधीही, कोणालाही एखादा मोठा बदल/परिवर्तन घडवायचा/चे असेल तर त्याला 'आचरट स्थितीवादा'चा सामना करावाच लागतो. अशा तथाकथित 'वाद'ग्रस्ततेला सामोरे जाताना बदल/परिवर्तन-विरोधकांचे या वादातील तथाकथित मुद्दे हे स्थितीवादी, म्हणजे आहे ते तसेच ठेवण्याच्या बाजूने, तर असतातच, पण आपण कशाची भलावण करतो आहोत, का करतो आहोत, जो बदल आपण सपशेल नाकारतो आहोत त्याबद्दल काहीएक सखोल व तर्कशुद्ध विचार आपण केला आहे का, हे प्रश्नच त्यांना पडत नाहीत. आणि आपल्या त्याच त्या वरकरणी निरागस सुरात ते विचारत असतात की, 'आत्ताच्या 'व्यवस्थे'त वाईट काय आहे?' बदलाचा मुद्दाच कळला नाही, किंवा बदलाचा मुद्दा कळून घ्यायचाच नाही, तर मग असे प्रश्न येतातच. बदल/परिवर्तन समर्थकांच्या तथाकथित, भ्रामक व काल्पनिक अशा 'छुप्या हेतूं'बद्दल चर्वितचर्वण करून मुद्दा भरकटवण्यात असे बदल/परिवर्तनाचे द्वेषमूलक विरोधक पटाईत अस...

¤साहित्य का देश-काल¤ (हिंदी//संकलन/उद्घृत)

*साहित्य का देश-काल*  (हिंदी - संकलन/उद्घृत) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (>> मेरे भी साहित्य-लेखन तथा साहित्य-अध्ययन के कुछ पहलू (बिंदु) निम्नानुसार ही है।) @ॲड.लखनसिंह कटरे  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> वस्तुतः देश-काल की अवधारणा मूलतः साहित्य की नहीं है। वह दर्शन, विज्ञान और इतिहास (समाजशास्त्र) से सम्बद्ध है। दिलचस्प बात यह है कि दर्शन, विज्ञान और समाजशास्त्र में देश-काल की धारणा एक जैसी नहीं है। उनमें काफी भिन्नताएँ हैं। साहित्य के देश-काल पर बात करने का अर्थ है ज्ञान के इन अनुशासनों के आलोक में साहित्य को देखना। स्वभावतः यह अंतर्ज्ञानानुशासनात्मक (Interdisciplinary) विषय है। उसके विस्तार, उसके आयाम, उसकी जटिलता का संबंध इसी बात से है कि वह दर्शन-विज्ञान-इतिहास जैसी बिलकुल भिन्न और स्वतंत्र ज्ञान शाखाओं के संदर्भ में साहित्य पर विचार करने की अनिवार्यता उत्पन्न करता है।  >> जिसे हम देश-काल कहते हैं, वह हमारे दृष्टिकोण (Stand-point) का निर्धारण करता है। हम चाहकर भी इस दृष्टिकोण से निरपेक्ष नहीं हो सकते, भले उसके प्रति सजग हों या न हों। कालिदास बहुत मह...

जुने मिथक : नवा अन्वयार्थ (एक प्रार्थना)

□जुने मिथक : नवा अन्वयार्थ□(एक प्रार्थना!)□ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      एका(?) महाभारतातील एका मिथक(!)कथेनुसार असे सांगितले आहे की,      एका कोणत्यातरी यज्ञसमारंभात श्रीकृष्ण, युधिष्ठीर व दुर्योधन(सुयोधन!) एकत्र आले असता दुर्योधनाने श्रीकृष्णाला विचारले की, तो(दुर्योधन) आणि युधिष्ठीर हे दोघेही श्रीकृष्णाशी सारखेच संबंधित असतानाही श्रीकृष्णाचा कल युधिष्ठीराकडे नेहमीच झुकलेला का असतो. श्रीकृष्णाला मी(दुर्योधन) वाईट आणि युधिष्ठीर चांगला वाटतो, असा पक्षपात कां?       त्यावर दुर्योधन ला एका बाजूला नेऊन श्रीकृष्णाने त्याला सांगितले की, या यज्ञसमारंभात उपस्थितांपैकी चांगले, सुष्ट व्यक्ती कोणते, हे शोधून काढ! दुर्योधन निघाला शोधमोहीमेवर! सर्वत्र शोध घेऊन तो श्रीकृष्णाजवळ पोचला व सांगितले की, या यज्ञसमारंभात एकही चांगला, सुष्ट व्यक्ती त्याला आढळून आला नाही.        नंतर श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला सुद्धा बाजूला नेऊन सांगितले की, या यज्ञसमारंभात उपस्थितांपैकी वाईट, दुष्ट व्यक्ती कोणते, ते शोधून काढ! युधिष्ठीरही निघाला शोधमोहीमे...

होती एक पुष्पा (लघुकथा)

*होती एक पुष्पा* (एक लघुकथा) ~~~~~~~~~~~~~~~~~~ >> आम्ही भंडारा जिल्ह्यातील वाकोडी नामक गावातील एका नावाजलेल्या खाजगी सोसायटीच्या शाळेत तत्कालीन हायर मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आमच्या त्यावेळेस नवव्या वर्गापासूनच आपापला विषय-संच/अभ्यासक्रम निवडावा लागे. आमच्या त्या शाळेत गणित-विज्ञान, बाॅयोलाॅजी, कृषी, काॅमर्स व आर्ट असे पाच विषय-संच/अभ्यासक्रम होते. बाॅयोलाॅजी हा विषय-संच/अभ्यासक्रम लोअर मॅट्रीक (वर्ग 9 व 10 पुरता) म्हणून ओळखला जात होता व दहाव्या वर्गाची परीक्षा तत्कालीन बोर्डाद्वारे घेतली जात होती. लोअर मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्या त्रिवर्षीय स्नातकाच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळविण्यासाठी प्रि-युनि. नामक एक वर्ष काॅलेज मध्ये घालवून विद्यापीठाची ती परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागायची, त्यानंतरच स्नातकच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळायचा. उलट गणित-विज्ञान, कृषी, काॅमर्स, आर्ट चे विषय-संच/अभ्यासक्रम हायर मॅट्रीक म्हणून ओळखले जायचे आणि बोर्डाची हायर मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्याला त्रिवर्षीय स्नातकाच्या प्रथम वर्षात डायरेक्ट प्रवेश मिळायचा. मी गणित-विज्ञान या विषय...

वाघ नदीच्या डोहाजवळील ते उंबराचे झाड (असला औदुंबर) : प्रकाशित

*वाघ नदीच्या डोहाजवळील ते उंबरा*चे झाड* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ('असला औदुंबर' या शीर्षकाने "वाघूर : दिवाळी विशेषांक 2022 मधून प्रकाशित)      @ॲड.लखनसिंह कटरे. --------------------------------------------------- >> महाराष्ट्राच्या अगदी पूर्वटोकावरील विविध वृक्षराजींच्या समृद्धीने नटलेल्या झाडीपट्टीतील गोंदिया जिल्हा आणि लागूनच असलेल्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा, या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचीच नव्हे तर येथील एकूणच जनसमूहाची जीवनदायिनी नदी म्हणून, अनादि काळापासून आपले अमूल्य योगदान सतत देणारी, नदी म्हणजे आमची वाघ नदी. या वाघ नदीचा उगम गोंदिया जिल्ह्यातील वन्यबहुल व नक्षलप्रभावित अशा देवरी तालुक्यातील चिचगड भागातील वांढरा (डोंगरगाव) येथील टेकड्यांतून होतो. ही नदी आपल्या उगमस्थानातून पुढे जात शिरपूर, कालीसराड व पुजारीटोला अशा तीन विशाल शासननिर्मित जलाशयांद्वारे "बांधसंपन्न" होऊन मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रजेगाव या महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील गावाजवळ कोरनी घाट येथे वैनगंगा नदीत जाऊन आपले अस्तित्व तेथेच रिचवून टाकते.  >> माझे गाव म...

हिंसा आणि अहिंसा : एक चक्रव्यूह (प्रकाशित)

*हिंसा आणि अहिंसा : एक चक्रव्यूह*  (संपृक्त लिखाण, दिवाळी विशेषांक 2022 मधून प्रकाशित) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (@ॲड.लखनसिंह कटरे) ---------------------------------------------- >> हिंसा म्हणजे काय? हा साधासोपा वाटणारा प्रश्न प्रत्यक्षात मात्र तसा साधासोपा/सरळसोट नसून हिंसा ही व्यामिश्रतम अशी संकल्पना/संज्ञा असून तिला व्याख्यायित करणे मला अतिशय कठीण वाटते. शारीरिक व दृश्यमान हिंसा ही कदाचित सहजतेने व्याख्यायित करता येईलही, पण हिंसेचे अन्य विविधांगी, अदृश्य व गहन प्रकार व्याख्यायित करण्याच्या प्रयत्नात मात्र ते 'दशांगुळे उरण्याची'च परिणती अधिक असण्याची शक्यता असेल. म्हणूनच मी माझ्या अल्पबुद्धि-आकलनानुसार हिंसा ही संकल्पना/संज्ञा म्हणजे एक चक्रव्यूहच म्हणतो/समजतो.  >> अशा या चक्रव्यूहात्मक हिंसा नामक संकल्पना/संज्ञेला व्याख्यायित करण्याच्या असफल ठरू पाहणाऱ्या प्रयत्नांचा मागोवा घेताना कठोपनिषदाच्या इंग्रजी भाष्यात मिरज चे श्री.दिलीप वासुदेव आपटे यांनी व्यक्त केलेले व्याख्याविषयक विचार मी येथे उद्घृत करू इच्छितो. श्री.आपटे लिहितात, "That which is indefinable ...

समाजपुरुष : एक संक्षिप्त आकलन

*समाजपुरुष : एक संक्षिप्त आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~     >> सौम्य, समंजस, एकात्मभाव आणि सहकार्य प्रणित विचारांच्या प्रवाहात द्वेष, परात्मभाव, अलगाववाद, तीव्र जातीय तेढ आणि चुकीच्या माहितीचा ओघ कोणत्याही परिस्थितीत मिसळू 'न' देणे, हे आजचे अतिशय महत्त्वपूर्ण असे समाजकार्य होऊन बसले आहे. त्यादृष्टीने प्रत्येक समंजस, सुजाण व सजग समाजपुरुषाने डोळ्यात तेल घालून जागृत राहणे व त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे, आजच्या उजाखा*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय/समाजमाध्यमीय युगात परमावश्यकरित्या क्रमप्राप्त ठरत आहे.  >> कोणताही समाज एकसंध राहूनच सद्यकालीन व्यामिश्रतम अशा परिस्थितीला सामोरे जाऊन टिकून राहू शकतो. त्यासाठी संकीर्ण जात, धर्म किंवा भावनिक मुद्द्यांचा विचार न करता समाजापुढील विविधांगी अशा आधुनिक आव्हानांचा विचार करूनच सामाजिक नेतृत्व निवडणे गरजेचे ठरत आहे.  >> समाजपुरुषाचा संथ झालेला प्रवाह, आलेली तथाकथित शिथिलता, समाजविकासात पडलेला/पडत असलेला खंड, समाजातील तरुणांचे भविष्य या सर्व बाबींचा साधक-बाधक विचार करूनच आजच्या सुजाण, समंजस व सजग समाजपुरुषाला पुढील...

यवनिका (वैज्ञानिक दृष्टिकोण : एक संक्षिप्त आकलन)

                    *यवनिका*                  ---------------------- > कहा और माना जाता है कि, किताबी ज्ञान से व्यक्ति विविध तंत्रों में तंत्रकुशल तो अवश्य हो सकता है, किन्तु वह विवेकसंपन्न विचारों से प्रगल्भ भी होता ही है, यह नहीं कहा जा सकता। शिक्षाका सभ्यता, औचित्य तथा सुसंस्कारों से सीधा संबंध होता ही है, यह भी नहीं कहा जा सकता।  > शिक्षित व्यक्ति यदि तथाकथित(?) अंधश्रद्ध समाजिक परिवेश से आता हो, तब उसके व्यक्तित्व में बचपन से ही कर्मकांडात्मक कुलाचार, अलौकिक शक्ति का काल्पनिक भय, अंधश्रद्धात्मक धारणाएँ, आदि संस्कार संचित होने और रहने की सम्भावना को पूरी तरह नकारा नहीं जा सकता। जबतक वह व्यक्ति पूर्वग्रह-मुक्त, विवेकसंपन्न विचारों की ढाल से खुद ही खुद से लढ़कर अपने कालविसंगत तथा अवैज्ञानिक विचारों और धारणाओं में बदलाव लाने का प्रयास नहीं करता तबतक वह व्यक्ति प्रवाहपतित जीवन जीने के लिए ही बाध्य रहता है, यह एक #कटूसत्य है। अनिष्ट वृत्ती तथा अनिष्ट प्रथाओं का विवेकसंपन्न त्याग करने...