Posts

Showing posts from November, 2019

केलाच विचार तर...!

□विचार केलाच तर! ~~~~~~~~~~~          आज थोडेसे वेगळेच लिहावेसे वाटते. त्याला कारण झालेय, एका सुप्रसिद्ध व महत्वाच्या वर्तमानपत्राच्या मालक/चेअरमन यांच्या एक सोमवासरीय स्तंभातील लिखाणाचे! हा स्तंभ माझा अतिशय आवडता आहे. मी हा स्तंभ कधीही चुकवत नाही. या स्तंभातून मांडण्यात येणारे/आलेले विचार व त्यावरील उपाययोजनाही मननीय, विचारणीय व आचरणीयही असतात. आजच्या स्तंभात त्यांनी किशोरवयीन गुन्हेगारांच्या समस्येविषयी अतिशय मुलभूत चिंतन मांडले आहे. (प्रत्येकाने ते अवश्य वाचावे असे मला वाटते.) त्यावरील माझा प्रतिसाद मी कोणत्याही टिपणी किंवा भाष्याशिवाय व्यक्त करीत आहे. एक:-मी बालपणी कदाचित खूप सुंदर दिसत असावा(?). मी 4थी किंवा 5वीत असेन. गावांमध्ये आजही बहुतेक घरी लघवीसाठी जनावरांचा गोठाच राखीव असतो. आमच्या वाडीत बांधलेल्या गोठ्यात एका सकाळी मी लघवीला गेलो होतो. बसून लघवी करायची सवय होती. मी लघवी करीत असतांनाच कोणीतरी हळूच येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवले. अर्थातच मी दचकून मागे पाहिले. माझ्याच वयाची एका *****ची मुलगी होती ती! तिने केलेली "मागणी" ऐकूनच मी तेथून पळालो व थेट आईकड...

माझ्या कवितेमागची माझी एक (एकमेव नव्हे!) भूमिका

माझ्या कवितेमागची माझी एक (एकमेव नव्हे!) भूमिका. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       (19 मे 2017)       मी माझ्या कवितेतून वैश्विक सत्य सांगत नाही/नसावा. माझ्या पूर्वीच्या कवींनी म्हणे ते सांगितलेच आहे, म्हणून मी पुनरावृत्ती करीत नाही. माझ्या कवितेतून मला जे मांडायचे असते ते वाचकाला इतिहास, वर्तमान व भविष्याचे कालभान देते/द्यावे अशी माझी धारणा/ भूमिका आहे. "तुमचे आमचे सेम असते"- हे निसर्गाधारित नाही, तुमचे आमचे सेम "करावे" लागते. तुमचे आमचे सेम झाल्यावरच जीवनाची खरी गंमत उपभोगता येते, जीवनाची गोडी कळते. त्यासाठी प्रयत्न मात्र करावे लागतात. हे "प्रयत्न" व्यक्तीला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्वही देतात आणि आपल्या व्यक्तित्वाचे समष्टीत विलीनीकरण कसे करावे हे सुद्धा शिकवतात. घटकत्वाच्या सिद्धांतानुसार हे पूर्णतः निसर्गाधारित आणि निसर्गसंमत असते.          एखादे गणित सोडविण्याची एकच एक रीत मला माहित असेल तर मी "वैविध्य" या निसर्गाच्या चमत्काराची मजा चाखू शकत नाही/शकणार नाही. गणित सोडविण्याच्या एकाहून अधिक रिती असतात आणि सगळ्या रितींनी उत्तर "एक...