ओनामासी ढमऽऽऽ.........
*"ओनामासी ढमऽऽऽ........"* ~~~~~~~~~~~~~~~~ □आमच्या झाडीपट्टीमंधी मच्छीमार/कोळी समाजालं ढीवर समाज मुहून ओरखतंत. तं झाला असा, आमच्या लहानपनी आमच्याकर फंदूभाऊ भूमके नावाचा एक ढीवर समाजाचा अतिशय हसमुख, मेहनती, इमानदार व मजाकी नवकर होता. मी पैली-दुसरीत असीन, तवाची बात होय. फंदूभाऊना मालं सितकारामंधी धगाळी सेकावाच्या भारी सकारीसकारीच इचारलंन का, ''तुमालं इस्कोलात का सिकवतंत?'' मी मनलू ''अ, आ, इ, ई, अना १, २, ३, ४,... सिकवतंत.'' तं फंदूभाऊ मने, ''तुमालं "ओनामासी ढमऽऽऽ, नवरा बायको होऊऽऽऽन" असा नाही सिकवत का? माझा घर इस्कोलाजवरच आहे तं मी गुरूजीलं असा सिकवताना आयकलूहू..." माझी हसता हसता पूरेवाटच झाली. फंदूभाऊ बी हासू लागला. आता फंदूभाऊ नसे, वयोमानाना गेला बिचारा कहीचाच! पर माझ्या डोसक्यातना "ओनामासी....." काही निंघतच नोहोता. माझ्या ९वी, १०वी, ११वी मंधी, आदर्श विद्यालय आमगांवात एक नवाच इषय, संस्कृत, आमालं त...