Posts

Showing posts from December, 2019

झापड, घोडा आणि घोडागाडी : एक आठवण

◇◇"झापड", घोडागाडी आणि एक आठवण!◇◇ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ◇◇माझे वडील दि.25 जानेवारी 2018 ला वयाच्या 88व्या वर्षी वयोमानाने थकून निसर्गसामील झाले. ते हाडाचे शेतकरी होते. गायी, म्हशी, बैलजोड्या, हेल्यांच्या जोड्या, बक-या, मेंढ्या, बदका(तिन्ही प्रकारच्या), कोंबड्या, पांढरे ससे, पांढरे उंदीर, कुत्रे, इत्यादींचा आमच्या बालपणी आमच्या घरी अक्षरशः खंडीने जमघटच असायचा. माझ्या वडिलांनी जीवनात कधीही सायकल, बाईक, चारचाकी चालवली नाही, त्यांना ही वाहने हाकताही येत नव्हती तथा क्षमता असूनही त्यांनी ते घेण्याचा वा शिकण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. त्यांचे आवागमनाचे एकमेव खात्रीचे साधन म्हणजे घोडागाडी!!! 40-50 किमी पर्यंत घोडागाडीनेच जाऊन त्याच दिवशी रात्रीपर्यंत घरी परतणे, हा माझ्या वडीलांच्या हातचा मळच जणू! ते जीवनात कधीही रात्रीला घराबाहेर थांबल्याचे मला आठवत नाही. कितीही उशीर झाला तरी रात्री-बेरात्री सुद्धा ते घरी परतायचेच.              त्यांनी वयाच्या 80-82व्या वर्षापर्यंत घोडे पाळणे थांबवले नव्हते, जरी घोडागाडी कालबाह्य ठरली होती तरी. त्यांनी दोन जोड्या घोडे...

छू लेने दो......

*छू लेने दो......* -----------------------        १९६९-७० मधील एक घटना आठवते तशी सांगण्याचा प्रयत्न करतोय.         तर झाले काय की, आमच्या गावातील जि.प.पूर्व माध्यमिक शाळेत एक शिक्षक बदलून आले. त्यावेळी शिक्षक मंडळी शाळेच्या गावातच सपरिवार निवास करीत व त्यांच्या पुष्कळशा गरजा तो-तो गाव निशुल्क पूर्ण करीत असे. त्या शिक्षकांनी आमच्या वाड्यात राहण्याची इच्छा व्यक्त केली. आमच्या वाड्यात तोवर कधीही कोणाही व्यक्ती किंवा परिवाराला राहण्याची परवानगी माझ्या वडीलांनी दिली नव्हती. पण या शिक्षकांचा स्वभाव, त्यांची शिकविण्याची शैली यांनी प्रभावित होऊन वडिलांनी त्यांना आमच्या वाड्यातील एक खोली (कोणत्याही भाड्याशिवाय) रहायला दिली. त्या शिक्षकांच्या धर्मपत्नीलाही लवकरच आमच्या गावच्या शाळेतच शिक्षिकेची नोकरी मिळाली. त्या शिक्षकांनी त्यांच्या एका लहान बंधूला सुद्धा शिक्षणासाठी सोबत ठेवले होते. हा लहान बंधू आठव्या वर्गात होता. आमच्या गावात आठवी नसल्याने तो लहान बंधू जवळच्याच अंजोरा या तीन किमी वरील गावातील शाळेत जाऊ लागला. मी त्यावेळी नवव्या वर्गात होतो व आदर्श ...