माझी आई : कमलाबाई.
माझी आई : कमलाबाई -------------------------- १६ मार्च १९३१ ते ३० जानेवारी २०१४ हा माझ्या आईचा, पूर्वाश्रमीच्या कमलाबाई रूपराम/रामरूप रहांंगडाले व लग्नानंतरच्या सौ.कमलाबाई मोहनलाल कटरे यांचा दीर्घ जीवनपट! माझ्या आईचे शिक्षण तत्कालीन वर्ग चार पर्यंतचेच. पण मराठी भाषा आणि गणित (विशेषतः अंकगणित व बीजगणित) या विषयातील तिचे प्रावीण्य अद्भूतच म्हणावे असे होते. मी आणि माझे तत्कालीन वर्गमित्र यांना आमच्या आठव्या वर्गापर्यंतचे कोणतेही अडलेले गणित समजावून, सोडवून देणे हा तिचा जणू हातचा खेळ. पुढे नवव्या वर्गापासून आम्हाला इंग्रजी माध्यमातील New Maths सुरू(?) झाले आणि माझ्या आईमागे लागलेला "गणित समजावून दे" हा आमचा लकडा थांबला. मी माझ्या आईवडिलांची दुसरी संतान. माझा एक मोठा भाऊ, शुकदेव हा तीन वर्षाचा होऊन लिव्हरच्या तत्कालीन असाध्य बिमारीने गेला. तो गेल्यानंतर दोनेक वर्षे मुलबाळ न झाल्याने माझ्या आजीने माझ्या वडिलांच्या दुस-या लग्नाचा प्रयत्नही केलेला. पण वडील माझ्या आई सोबत ठामपणे उभे राहिले. माझ्या आईने...