काही सनदी अधिकारी : माझाही एक अनुभव
*काही सनदी अधिकारी : माझाही एक अनुभव* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> दि.07.09.2016 च्या 'लोकमत' मध्ये रामचंद्र गुहा यांचा एक लेख प्रकाशित झालेला होता. त्यात त्यांनी विधान केले होते की, IAS अधिका-यांमध्ये 'अल्पमतिधारकांची' संख्याच जास्त आहे. त्यांनी काही उदाहरणे सुद्धा दिल्याचे स्मरते. तसेच त्यांनी त्यावरील काही उपाययोजना सुद्धा सुचविल्या होत्या. त्यांनी त्या लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी बहूतेक भुक्तभोगी भारतीय सहमत सुद्धा असतील. तरी या सनदी सेवेत काही सन्माननीय अपवाद सुद्धा आहेत हे नाकारता येणार नाही. >> माझ्या 30 वर्षाच्या महाराष्ट्रातील प्रशासकीय/राजपत्रित पदावरील सेवेचा अनुभव जमेस घेता मला सर्वश्री संजीव जयस्वाल, डाॅ. हर्षदीप कांबळे, संजय देशमुख, निरंजनकुमार सुधांशु, श्रावण हर्डीकर, अश्वनी मुद्गल, सुधीर ठाकरे, हर्षवर्धन गजभिये, डाॅ. विजय सूर्यवंशी, पृथ्वीराजसिंह बायस, विजय माथनकर, फिलीप, सुश्री आभा शुक्ला, यांच्यासारखे सन्माननीय अपवाद (मला) अनुभवता आले. सर्वश्री किरण गीत्ते, श्रीकांत यांच्या सुखद अनुभवाचे किस्से वाचता आले. >> तथापि गडचिरोली येथे ...