औरस-चौरस असेही......!
□औरस-चौरस : असेही□ ~~~~~~~~~~~~~~ आम्हाला स्वतंत्रता आणि स्वायत्तता यातील फरक अजूनही समजलेलाच नसावा, असे माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे. या पृथ्वीवर "मी" एकमेव/एकटा नसून माझ्यासारखेच दुसरा, तिसरा, चौथा,... , हजारावा, ....., लाखावा,......कोटीवा....., असेही आहेत. निसर्गसंमत घटकत्वाच्या सिद्धांता(System Theory)नुसार या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव, निर्जीव प्राणी, वस्तू, इत्यादी कुठल्यातरी समूहाचा/ची घटक आहे. या समूहाशिवाय कोणत्याही घटकाचे अस्तित्व स्वतंत्र नाही. आणि घटकत्वाच्या सिद्धांतानुसार सुक्ष्मतम ते महत्तम हे घटकानुक्रम डावलताच येत नाहीत. मी -> कुटुंब -> समाज -> ...राज्य -> राष्ट्र -> जग हा घटकानुक्रम डावलून "मी" स्वतःलाच कुटुंब, समाज, ...राज्य, राष्ट्र, जग समजू लागतो तेव्हा मी माझ्या निसर्गसंमत मनुष्यत्वाचा त्याग करून तथाकथित (अनैसर्गिक) व्यक्तीस्वातंत्र्याच्या भ्रामक भोव-यात सापडलेला असतो. मानवी मेंदूचा अभ्यास करणारे वैज्ञानिक सुद्धा मेंदूतील प्री-फ्रण्टल कोर्टेक्स चा अभ्यास मांडताना मनुष्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याऐवजी विवेकाध...