दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, नागपूर, दि.19.12.2021 (संमेलनाध्यक्षांचे भाषण)
*दुसरे अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलन, दि.19 डिसेंबर 2021*, *(पवार विद्यार्थी भवन, कुकडे लेआऊट, एन.आय.टी. गार्डन च्या समोर, नागपूर)* ---------------------------------------------------------------------- *संमेलनाध्यक्षाचे भाषण* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *पोवार समाज, पोवारी बोली-साहित्य आणि पोवारी संस्कृती : एक आकलन* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार, ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> आम्ही पोवार आहोत आणि पोवार समाजाची उत्पत्ती अग्निकुण्ड मधून झाल्यामुळे आम्हाला अग्निवंशी क्षत्रिय म्हणतात. पण हळूहळू, भिन्न भिन्न कारणांमुळे संपूर्ण पोवार समाज अखंड भारतात पसरला असल्याने आमच्या समाजाच्या संस्कृतीत एकाच वेळी साम्य, समन्वय आणि एकसारखेपणाचे सोबतच विविधता, बहुसांस्कृतिकता, बहुविधता पण दिसते. आणि म्हणूनच "आपली संस्कृती टिकविण्या सोबतच विभिन्न क्षेत्रात बसलेल्या आमच्या पोवार समाजाच्या आंतरिक संस्कृतीचा पण आम्ही आदर केला पाहिजे...