माझा अपघात : एक स्मरणगाथा
माझा अपघात : एक स्मरणगाथा... ~~~~~~~~~~~~~~~~~~ दि.18 जानेवारी 2009, रविवार. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा दिवस. मी जिल्हा सहकार निबंधक या नात्याने जिल्हा निवडणूक अधिकारी. मी नेमलेला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे तालुका सहकार निबंधक प्रशांत धोटे. तसा धोटे हा डेअर-डॅशिंग आणि कायदा-नियमानेही प्रशासन-सुदृढ अधिकारी असला तरी चामोर्शी तालुक्यातील राजकारणाची जवळून ओळख असलेला माझ्या जिल्हा कार्यालयातील माझा कनिष्ठ सहकारी, सहाय्यक निबंधक मोरेश्वर गणवीर म्हणाला की, या निवडणुकीच्या मतदानप्रसंगी मी स्वतः मतदान केंद्रांवर उपस्थित राहून देखरेख करणे अनिवार्य राहील. कारण पूर्वेतिहास खूपच कठीण प्रसंगांनी डागाळलेला होता. माझ्या स्वच्छ पारदर्शी कारभाराने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे व अपक्ष सुद्धा नेते/कार्यकर्ते मला "मानत" असल्याने निवडणूक/मतदान प्रसंगी एखादा अप्रत्याशित प्रसंग उद्भवल्यास मी तेथे हजर असलो तर तो प्रसंग सुद्धा सहज निस्तरता येईल, असे गणवीर चे आकलन होते. गणवीर यांचे हे "आकलन" मला "सुखावणारे"च असल्याने म्...