प्रशासन की सुशासन : एक संक्षिप्त टिपण (प्रकाशित)
*प्रशासन की सुशासन : एक संक्षिप्त टिपण* (प्रकाशित) ------------------------------------------------------------------- ( Whether Administration or Governance?) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे ~~~~~~~~~~~~~ मी 1978 ते 2013 पर्यंत एकूण साडे चौतीस वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत [जिल्हा परिषदेच्या शिक्षण(शिक्षक) विभागात वर्ग 3 ते MPSC द्वारे निवड होऊन महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात वर्ग-2 ते वरीष्ठ वर्ग-1 (जिल्हा प्रमुख) पदांवर] यशस्वीपणे(?) कार्य केले असून, 2013 ला निवृत्त होऊन, वडिलोपार्जित शेती साांभाळण्यासाठी, माझ्या छोट्याशा (पैतृक) खेडेगावात स्थायिक झालो आहे. 'वस्तुतः प्रशासन-शास्त्राचे (किंवा मानव्य शाखेतील बहुतेक शास्त्रांचे सुद्धा) बहुतेक सिद्धांत हे अनेक/विविधांगी बाबी गृहीत धरून मांडलेले असतात, त्यामुळे बहुतांश वेळा ते व्यामिश्र वास्तवतेच्या जवळ जाणारे असतातच असे नाही. मात्र काही बाबी/सिद्धांत हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असल्याने ते वास्तवतेच्या तथा व्यावहारिकतेच्या जवळ असण...