Posts

Showing posts from August, 2024

मी : एक वाचक

*मी : एक वाचक* ~~~~~~~~~~     1966-1968 या वर्षांत मी वर्ग 6 व 7 चा विद्यार्थी होतो. आमच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाचवी व सहावीचे वर्ग जिल्हा परिषदेने शैक्षणिक सत्राच्या मध्यातच बंद केल्याने मी या कालावधीत आमच्या गावापासून 3 किमी अंतरावरील अंजोरा येथील जिल्हा परिषद शाळेत गावून पायी जाणे-येणे करीत असे.        याच दरम्यान माझ्या आईला असह्य दातदुखी होऊ लागली. आमच्या गावाजवळील आमगांव व गोंदिया येथे त्याकाळी दंतवैद्यकांची सुयोग्य सुविधा नसल्याने उपचारासाठी आम्ही सहकुटुंब नागपूर येथील तत्कालीन किंग्स वे रस्त्यावरील डाॅ.गुमास्ता या सुप्रसिद्ध दंतवैद्य डाॅक्टरकडे गेलो होतो. माझ्या वडिलांचे आतेभाऊ नागपूर येथील पोलीस मुख्यालयात कार्यालय अधीक्षक होते व ते रविनगरात शासकीय निवासस्थानी सहकुटुंब राहत होते. आम्ही सहकुटुंब त्यांच्याकडेच थांबलो होतो. (आज हे किती हास्यास्पद व अशिष्ट वाटते.)        आम्ही ज्यांच्याकडे थांबलो होतो त्यांचा लहान मुलगा माझ्यापेक्षा चार-पाच वर्षाने मोठा असला तरी त्याच्यासोबत माझी गट्टी जमली. मी त्याच्यासोबत सायकलवर सी...

मै क्षमाप्रार्थी हूँ........!

*मै क्षमाप्रार्थी हूँ .........!* ---------------------------- >> अध्यात्म, धर्म और विज्ञान की त्रयी से निर्मित त्रिभुज बहुत ही गूढ तथा अनिर्णित मानसिक संघर्ष से लिप्त एक आदिम संकल्पना है। हमें हमेशा भ्रम में भ्रमित रखना और धर्म को अध्यात्म तथा अध्यात्म को ही विज्ञान समझने की प्रक्रिया में उलझाएं रखना, यह इस आदिम संकल्पना का अनादि-अनंत खेल रहा है। इसीलिए जब हम धर्मग्रंथों का पठन, मनन, अध्ययन करने लगते हैं, तब हम स्वयं को धार्मिक नहीं आध्यात्मिक पथ के पथिक समझने/मानने लगते हैं। और विज्ञान को अध्यात्म का ही मुखर/अनुगामी अंग भी समझने/मानने लगते हैं।  >> भारतीय संस्कृति में पुरुषार्थ के जो चार आयाम(?) बताये जाते हैं, वे धर्म, अर्थ, काम और मोक्ष Absolute नहीं होते, बल्कि ये चारों मानव-जीवन के चार आश्रमों (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास) के भी संपूरक तथा वाहक भी माने जाते हैं। समय, प्रकृति, अवकाश आदि कभी भी स्थिर नहीं होते बल्कि यह सभी हमेशा परिवर्तन-शील ही होते हैं। अतः उपरोक्त दोनों 'चतुष्ट्म्य'(!) का भी परिवर्तन-शील होना बिलकुल स्वाभाविक, प्राकृतिक तथा लाजिमी भ...

इ.स.2030 मधील एका वाॅचमनच्या डायरीतील काही पाने...

 *इ.स.2030 मधील एका वाॅचमनच्या डायरीतील काही पाने...* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        @ॲड.लखनसिंह कटरे     --------------------------------        मी एका अपार्टमेंटचा वाॅचमन. शरद पवार ज्या शहराला मिनी मुंबई म्हणून एकेकाळी नावाजायचे, त्या पूर्व विदर्भातील झाडीपट्टीतील एका बहुभाषिक व बहुसांस्कृतिक अशा गोंदिया शहरातील विश्वकर्मा अपार्टमेंटचा मी वाॅचमन. आमच्या या अपार्टमेंटमध्ये एकूण 106 फ्लॅट्स आहेत. गोंदिया शहरातील हा सर्वात मोठा अपार्टमेंट असावा. त्यामुळेच आम्ही एकूण सहा वाॅचमन आहोत. प्रत्येकी दोन-दोन वाॅचमन्सची आठ-आठ तासाची ड्युटी असते. मी जाणूनबुजून रात्रीची ड्युटी मागून घेतो. माझा दुसरा सहकारी नेहमी बदलत असतो पण मी मात्र नियमित रात्रपाळीचीच ड्युटी मागून घेतो. आणि विशेष हे की रात्रपाळीतील माझा सहकारी झोपतो पण मी मात्र रात्रभर जागाच असतो. कारण रात्रीची मजा काही औरच असते. रात्रीच्या बारा वाजल्यापासून ते पहाटेच्या चार-पाच वाजेपर्यंत अपाईंटमेंटमधून कोण-कोण, कसे बाहेर पडतात व कोण-कोण कसे आत येतात हा एक मजेदार कादंबरीचाच विषय म्हणता ...

एक आनंद यात्रा : बुलडाणा, दि.24.08.2019

बुलडाणा/दि.24.08.2019 ~~~~~~~~~~~~~~ □एक आनंद यात्रा□ ~~~~~~~~~~~~~      2003 ते 2006 दरम्यान मी चंद्रपूर येथे DDR असताना बहुतेक वेळा मला बसने/एस्टीने चंद्रपूर ते नागपूर असा प्रवास करावा लागत असे . तो माझा आजवरचा शेवटचा बस/एस्टी प्रवास होता. अशा बस/एस्टी प्रवासाची एक वेगळीच मजा असते, पण ती मजा मी हरवून बसलो होतो. माझ्या कित्येक कविता आणि काही कथा/लेख याचे मूळ माझ्या अशा बस/एस्टी प्रवासाच्या अनुभवात ग्रथित(!) आहेत. बस/एस्टी च्या प्रवासात भेटणारे सहप्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यातील संवाद, संभाषण मला नेहमी स्फूर्ती देत आले आहेत.      परंतु माझ्या काही अपरिहार्य कारणांमुळे मला 2006 नंतर आजपर्यंत बस/एस्टी चा प्रवास करण्याची संधी उपभोगता आली नव्हती. (एका अपघातात मी काहीसा दिव्यांग झाल्याने व त्यानंतरच्या कँसरमैत्रीच्या कालावधीतील विविध शस्त्रक्रिया (एकूण आठ शस्त्रक्रिया) यामुळे मी बस/एस्टी ने प्रवास करण्याची संधी नाकारत होतो.)       पण यावेळी ही संधी उपभोगावीच या इराद्याने श्री.नरेंद्र लांजेवार यांच्याद्वारे आयोजित राज्यस्तरीय महिला साहित...

प्रशासन की सुशासन : एक पॅरेडाइम (Paradigm)

*प्रशासन की सुशासन : एक पॅरेडाइम (Paradigm)*  (पूर्वप्रकाशित : सध्या गाजत असलेल्या तत्सम प्रकरणांच्या निमित्ताने पुनश्च) 😇😇😇 ------------------------------------------------------ (Whether Administration or Governance : A Paradigm)  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे  ~~~~~~~~~~~~~~~~       मी 1978 ते 2013 पर्यंत एकूण साडे चौतीस वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत [जिल्हा परिषदेच्या शिक्षण(शिक्षक) विभागात वर्ग-3 (10/1978 ते 04/1984) व त्यानंतर MPSC द्वारे निवड होऊन महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात वर्ग-2 ते वरीष्ठ वर्ग-1 (जिल्हा प्रमुख) पदांवर (05/1984 ते 02/2013) यशस्वीपणे(?) कार्य केले असून, 2013 ला निवृत्त होऊन, वडिलोपार्जित शेती साांभाळण्यासाठी, माझ्या छोट्याशा (पैतृक) खेडेगावात स्थायिक झालो आहे.           'वस्तुतः प्रशासन-शास्त्राचे (किंवा मानव्य शाखेतील बहुतेक शास्त्रांचे सुद्धा) बहुतेक सिद्धांत हे अनेकांगी/विविधांगी बाबी/सिद्धांत/गृहिकते गृहीत धरून मांडलेले असतात, त्यामुळे बहुतांश वेळा ते व्...

आमरो गाव का दुय अभिनयसम्राट

□*आमरो गाव का दुय अभिनयसम्राट!*□    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~              सच्ची बात सांगसू भाऊ, मोला एक्टींग को बारामा काहीच समजत नही रहे, असो लगं से मोला. अज 14 अगस्त से भाऊ, पापीस्तान को जलमदिवस, मी अज बिलकुलबी झुट नही बोलू.        मी मोरो लहानपनापासना दिलीपकुमार का बोहुत सारा सिलिमा देखी सेव. लीडर,कोहिनूर, मुगले आझम, राम और श्याम, गोपी, केत्त्तातरी. पर मोला कोनतोच सिलिमा मा वनं सिलिमा को पात्र ढुंडेवपरभी नही मिलेव. मला वोनं सप्पाई सिलिमा मा सिरफ दिलीपकुमारच भेटेव. आखिर मा मी हर सिलिमा मा सिरफ दिलीपकुमारलाच देखदेखस्यार परेस्यान भय गयेव होतो.         तसोच भाऊ मोला शाहरूख खान को हरेक सिलिमा मा सिरफ शाहरूख खानच भेटत गयेव. कोनतोच पात्र रवन देव, भेटसे सिरफ शाहरूख खानच. सब पात्रईनकी एक्टींग मोला समानच् दिसू पड़ से. वोनं सप्पा जवान टुरूपोटूईनला बिगळाय टाकीस भाऊ! सब आता वोकीच् नक्कल करन् लग्या.       असो येनं दुयी जन ला तथाकथित अभिनयसम्राट मुहून प्रसिद्ध करनो मा आयी से. पर मोला उनको हर सिलिमा ...

पोवार : एक श्रेष्ठतम, प्राचीनतम ऐतिहासिक समाज

*पोवार : एक श्रेष्ठतम, प्राचीनतम ऐतिहासिक समाज* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> पोवार समाज के मूलपूरुष-नारी की उत्पत्ति का साधार एवं सर्वमान्य ऐतिहासिक संशोधन होना अब अनिवार्य जान पड़ता है। पौर, प्रवर, परमार, प्रमार, प्रमर, पोवार, पँवार, पवार यह सभी शब्द-विशेष तथा संकल्पनाएँ अपने मूल स्वरूप को खोजने हेतु हर पोवार बंधु-भगिनी को उद्युक्त करते है। ज्ञात इतिहास को देखा जाए तो हर पोवार व्यक्ति महाराजाधिराज भोज को अपना पूर्वज तथा आदर्श मानते है। किंतु महाराजाधिराज भोज को अपना पूर्वज और आदर्श मान लेने मात्र से हम सच्चे पोवार तथा भोज के वास्तविक समाज-वंशज कहलाने में समर्थ या सक्षम नहीं हो जाते। उसके लिए हमें राजा भोज द्वारा विभिन्न विषयोंको घेरते हुए रचित 84 ग्रंथों में वर्णित ज्ञानसागर को तथा उनके सभी युद्धों में सदा अजेय होने के वास्तविक रहस्य को जान/समझ लेना भी अत्यावश्यक रूप से अनिवार्य हो जाता है। उसीतरह विक्रमादित्य और पुरू(पोरस) इन ऐतिहासिक पुरुषोंका पोवार होने, हमारे समाज-पूर्वज होने के बारेमें पाश्चात्य संशोधक तथा इतिहासकारों के ग्रंथो एवं खोज की खोज भी हमारे समाज के साहसी एवं सज...

मी : एक वैयक्तिक वर्गणीदार-वाचक........

*मी : एक वैयक्तिक वर्गणीदार-वाचक (असलेल्या/राहिलेल्या) : (मराठी, हिंदी, इंग्रजी) नियत/अनियतकालिकांची ताजी यादी.* *(माझ्या अल्पबुद्धि-आकलनाचे भागीदार)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *मराठी* 1)भाषा आणि जीवन (त्रैमासिक/आजीव सभासद) 2)ललित (मासिक) 3)साधना (साप्ताहिक) 4)शब्द रुची (मासिक) 5)सर्वधारा (त्रैमासिक) 6)कविता-रती (द्वैमासिक/आजीव सभासद) 7)काव्याग्रह (अनियतकालिक/आजीव सभासद) 8)पुणे पोस्ट (पाक्षिक) 9)आपले वाङमय वृत्त (मासिक/सध्या अनियमित?) 10)नव अनुष्टुभ (द्वैमासिक/सध्या अनियमित?) 11)प्रज्ञालोक (त्रैमासिक/आजीव सभासद) 12)परिवर्तनाचा वाटसरु (पाक्षिक) 13)शिवपथ (मासिक)  14)पंचधारा (त्रैमासिक/आजीव सभासद) 15)महाराष्ट्र साहित्य पत्रिका (त्रैमासिक/आजीव सभासद/सध्या अनुपलब्ध?) 16)युगवाणी (त्रैमासिक/आजीव सभासद) 17)योगप्रकाश (मासिक/आजीव सभासद) 18)खेळ (अनियतकालिक/आजीव सभासद) 19)साहित्य (त्रैमासिक) 20)साहित्य चपराक (मासिक/सध्या अनियमित?) 21)समांतर भाग्य (त्रैमासिक/सध्या अनियमित?) 22)सजग (त्रैमासिक) 23)आंदोलन (मासिक) 24)आकलन (त्रैमासिक/सध्या अनियमित?) 25)फडकी (मासिक) 26)मुराळी (मासिक) 27)सत्याग्रही वि...

मैत्रीण(?) : एक न उलगडलेले कोडे

*मैत्रीण(?) : एक न उमगलेले कोडे* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~            मैत्रीण हा माझ्यासाठी एखादा शब्द नसून ती एक अनबुझ/अनाकलनीय(?) अशी व्यामिश्रतम संकल्पना आहे. सुमारे चाळीस वर्षे होत आहेत, माझ्या मैत्रीणीसोबत अखेरची भेट झाल्याला! तरी अजूनही "ती माझी मैत्रीण" ही संकल्पना मला आकळताच येत नाही. "मैत्रीण" या संकल्पनेची व्याख्याही मला व्याख्यायित करता येत नाही. जाणवते सर्व पण ती व्यक्त/शब्दांकित करण्यासाठी माझी आकलनशक्ती व प्रकटनशक्ती माझ्या मदतीला धावून येत नाही. अव्यक्तातील व्यक्त मला खेटून जात असला तरी मला तो गवसत नाही.         अशी ती माझी मैत्रीण! तिची माझी पहिली भेट झाली 1979 साली. पहिले सहा-सात महिने मला आमच्या मैत्रीचे गुपित(?) कळले/आकळलेच नव्हते. एके दिवशी अचानक माझा एक मित्र मला विचारता झाला, की ती तुझ्याकडे जरा वेगळ्याच दृष्टीने का देखत/निरखत असते? तोवर मला खरोखरच तसे काही जाणवले नसले तरी ती मला अनायासेच आवडायची, हे मात्र मला नाकारता येणार नाहीच. या आवडण्याला मी बळी न गेल्याने त्यातील गम्य व गोम मला तोवर आकळलीच नव्हती. आजच्या या उ...