Posts

Showing posts from September, 2024

डाॅ.गणेश देवी यांच्या संदर्भातील पत्रव्यवहार : कुमार केतकर यांना अवलोकनार्थ

अग्रिम क्षमाप्रार्थनापूर्वक।  🙏🙏🙏 •••••••••••••••••••••••••••••••••••••• दि.29.09.2024/बोरकन्हार-441902 ~~~~~~~~~~~~~~~~~~ द्वारा/मार्फत :- मा.श्री.विनोद शिरसाठ, संपादक, 'साधना' साप्ताहिक,  पुणे-411030. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~                      ||ॐ| ----------------------------------------------- प्रेषक :-  ॲड.लखनसिंह कटरे, (निवृत्त डीडीआर/यवतमाळ),  बोरकन्हार-441902,  ता.आमगांव, जि.गोंदिया. (झाडीपट्टी/पूर्व विदर्भ) ----------------------------------------------- दि.29 सप्टेंबर 2024 ----------------------------------------------- प्रति, मा.श्री.कुमार केतकर मुंबई  (साक्षेपी विचारवंत, संपादक) सस्नेह सादर नमस्कार.        दि.21 सप्टेंबर 2024 च्या 'साधना'च्या अंकात प्रकाशित आपला 'त्रिविधा : पाथब्रेकिंग कादंबरी' हा नवे पुस्तक सदरातील पुस्तक-परिचय लेख वाचला. मी आपला फॅन वाचक आहे. या लेखात प्रकट आपल्या विचारांशी मी सहमत आहे. या परिचय लेखाच्या शेवटी आपण डाॅ.गणेश देवी यांच्या बोलीभाषा वि...

कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!

*कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~       कविता म्हणजे काय? हा प्रश्न अजूनही निर्विवादपणे सोडविता आलेला नाही. आणि कदाचित त्यामुळेच आज जागतिक स्तरावरही सर्वत्रच "कवीं"चा भयंकर(!) सुळसुळाट आढळून येतो. स्पाॅन्टेनियस ओव्हरफ्लो..... हे आंशिक सत्य असले तरी व्हाॅट इज ओव्हरफ्लो आणि ओव्हरफ्लो ऑफ व्हाॅट, हे प्रश्न अजूनही एकवाक्यतेच्या प्रतिक्षेत तडफडतच आहेत.         मी जेव्हा "कावळा हागता, चिमणीला विटाळ..." अशा "प्रारंभा"ची एक कविता एका मान्यवर संपादकांकडे प्रकाशनार्थ पाठवतो तेव्हा मूळ ग्रामीण असलेली पण नोकरी-व्यवसायामुळे शहरी झालेली संपादकीय मानसिकता मला "आदेशात्मक सूरात" कळवते की, "हागता" हा शब्द जरा अश्लील वाटतो, तो वगळून त्याऐवजी "शिटता" हा शब्द वापरावा.        मी एक अप्रसिद्ध, पण मुळातच उजळ असलेली ग्रामीण मानसिकता जपून असलेला, खट्याळ तरी विवेकाधारित स्वभावाने भारलेला, झाडीपट्टीतील झाडप्या, व्यक्ती असल्याने, यावर मी जरा खडसावूनच लिहिले की,---  ## माझ्या बालपणी माझी आई महिन्यातील तीन-चार दिवस बाहेर बसा...

वडिलांचे नसणे : एक आकलन

*वडीलांचे नसणे : एक आकलन!* ~~~~~~~~~~~~~~~~~         दि.25 जानेवारी 2018, गुरूवारला दुपारी 01:32 वाजता माझे वडील श्री.मोहनभाऊ कटरे (1930-2018) हे वयाच्या 88व्या वर्षी वृद्धावस्थेमुळे हे जग सोडून गेले, निसर्गशरण झाले. माझे आजोबा श्री.उकनभाऊ पाटील ऑगस्ट 1948 मध्ये, एका तत्कालीन असाध्य अशा लागट रोगाच्या साथीत, अल्पवयातच वारले. तेव्हा माझ्या वडीलांचे वय फक्त 18 वर्षाचे होते. त्या वयातही त्यांनी कुटूंबाचा व सुमारे 60 एकर शेतीचा सारा कारभार व पसारा अगदी व्यवस्थितरीत्या सांभाळला.        त्यांच्या सोबतीला त्यावेळचे आमचे आवारी श्री.शिवलाल कुंभरे हे आदिवासी गोंड समाजातील स्वामीनिष्ठ व्यक्ती होते. शिवाय रावजीबाबा आंबेडारे, मोडकूकाका चव्हाण, मंगरूबडो चव्हाण, भैय्यालालभाऊ कुंभरे, उरकुडाबाबा शरणागत, छगनमामा शरणागत, कुकसीबडो भोयर, वळगूबाबा येल्ले, बाबूलालमामा शरणागत, चुन्नीलालभाऊ सर्राटी, कारूभाऊ मेंढे, लोंढू(रूपचंद)भाऊ मेंढे, डोकूभाऊ नेवारे, गोंडूभाऊ नेवारे, फंदूभाऊ भूमके, तुकारामभाऊ भूमके, दयारामभाऊ भूमके, चिंधूभाऊ भूमके, फंदूभाऊ भूमके, मयारामबडो गौतम, डोमाकाक...

झाडीबोली : प्राचीनतम भाषा, व्याकरण, गीत-संगीत आणि सांस्कृतिक भौतिकवाद : एक संक्षिप्त आकलन.

*झाडीबोली : प्राचीनतम भाषा, व्याकरण, गीत-संगीत आणि सांस्कृतिक भौतिकवाद : एक संक्षिप्त आकलन*  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 1) प्राचीनतम बोली/भाषेतून अत्याधुनिक/अद्ययावत संकल्पनांची मांडणी... ~~~~~~~~~~~~ ●झाडीबोलीच्या प्राचीनतम वारशाने आम्हाला भूतकाळाचे बंदीवान न होता भविष्यकाळासाठी झाडीबोलीचे भाषा-प्रवर्तक व्हावे लागेल.  ●जुन्या संकल्पना, जुनी प्रतीके, जुने भाषिक प्रयोग यातून "प्रेरणा" घेऊन त्याद्वारे अत्याधुनिक/अद्ययावत संकल्पना, प्रतीके, भाषिक प्रयोग यांचा यथायोग्य वापर करून झाडीबोलीला "समयानुकूल" करावे लागेल. ●झाडीबोलीतील प्राचीनतम ते अद्ययावत शब्दांचा वापर आजच्या उजाखा* आणि सत्योत्तर युगाची संवेदना प्रकट करण्यासाठी सुद्धा करता येणे आवश्यक. फक्त बंसी वाजवत राहणे म्हणजे कूपमंडूक (कोठे-बंदिस्त) होणेच ठरेल. ●आज सर्वांनाच इंग्रजी हवी आहे. अशा विपरीत स्थितीत आपली झाडीबोली टिकविण्यासाठी आपापसातले सवतेसुभे टाळून व लकीर के फकीर ही वृत्ती टाळून बदलत्या काळाशी सुसंगत भाषिक-वृत्ती स्वीकारावी लागेल. ●झाडीबोलीच्या उत्थानासाठी अन्य कोणत्याही बोली/भाषेचा जरासाही विरोध वा दुस्व...

ते तीन कावळे : एक अनुभव (प्रकाशित)

 □ ते तीन कावळे : एक अनुभव□ ~~~~~~~~~~~~~~~~~~      काही काही अद्भुत, अनाकलनीय, ... अनुभव तर्क आणि बुद्धीला अर्थनिर्णयनासाठी आव्हानित करतात तेव्हा निसर्ग, प्रसरणशील विज्ञान आणि योगायोग यांची तात्पुरती का होईना मदत होते, पण पूर्ण समाधान मात्र होत नाही. माझा असाच एक अनुभव मी येथे नमूद करीत आहे.      कावळ्यांनाही माणसाळवता येते, असे कदाचित मारुती चितमपल्ली यांच्या लिखाणातून किंवा एखाद्या टीव्ही कार्यक्रमातून वाचल्या/पाहिल्याचे अंधुकसे स्मरते. निश्चित आठवत नसले तरी "कावळा" हा पक्षी माझ्यादृष्टीने एक गूढ पक्षी ठरत असल्याने वरीलप्रमाणे वाचन/दर्शनाची पुसटशी आठवण जागृत आहे. याच पुसट आठवणीच्या बळावर मी एक प्रयोग करण्याचे ठरविले होते व त्यासाठी निवृत्तीची प्रतीक्षा करीत होतो. दि.28 फेब्रुवारी 2013 ला निवृत्त झाल्यावर मी माझ्या छोट्याशा खेडेगावी (बोरकन्हार/झाडीपट्टी, ता.आमगांव, जि.गोंदिया, पूर्व विदर्भाचे अंतिम टोक) स्थायी झालो आणि कावळे माणसाळवण्याच्या प्रयोगाकडे वळलो.       माझ्या वाडवडीलांच्या सुमारे 150-200 वर्षे जुन्या वाड्याच्या अंगणात एक...

एक स्मरणरंजन असेही...!

*एक स्मरणरंजन असेही...!* ~~~~~~~~~~~~~~~~ >> ब्रिटिश आमदानीत इ.स.1930 साली डेप्युटी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, छत्तीसगढ रिजन या वरीष्ठतम पदावरून निवृत्त होऊन स्वातंत्र्योत्तर काळात इ.स.1960 साली निसर्गशरण झालेले व रायबहादूर पदवीने सन्मानित करण्यात आलेले, पोवार समाजातील एकमेव ठरलेले, टुंडीलाल पोवार (तुरकर) हे माझे आजेसासरे.  >> त्यांच्या दोन पुत्रांपैकी वडील पुत्र श्री यदुराजसिंह यांनी नागपूर येथील तत्कालीन हिस्लाॅप काॅलेज येथून गणित व विज्ञानाचे पदवी-शिक्षण अर्धवट सोडून, वडीलांच्या इच्छेखातर, वडीलांनी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात कमावलेली शेती करण्या/सांभाळण्यास सुरुवात केली. पायलट म्हणून प्रशिक्षणाची चालून आलेली संधी सोडून मध्यप्रदेशातील एका आडवळणावरील छोट्याशा खेडेगावात शेती करून/सांभाळून एक मोठी (सुमारे 40-50 एकरात) आमराई उभारण्यात सुद्धा यशस्वी ठरले.  >> कनिष्ठ पुत्र ॲड.श्री रामकुमार यांनी वकीलीची परीक्षा उत्तीर्ण करून वकीली-कम-शेतीऔजार (ट्रॅक्टरादि) व्यवसायात आपला जम बसवत मध्यप्रदेशातीलच जिल्हास्थळ असलेल्या बालाघाट या शहरात आपला स्थायी निवास कायम केला....