Posts

Showing posts from September, 2021

पोवारी बोली/भाषा को पुनरुत्थान.

पोवारी बोली/भाषा को पुनरुत्थान.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~        साल 2014-15 को दरम्यान मी एक पोवारी बोली/भाषा की पोस्ट फेसबुक परा टाकेव होतो. वोको पह्यले मी फेसबुक परा पोवारी पोस्ट बाचेव वा देखेवच् नोहोतो. मोरो फेसबुक-मित्र परिवार मा करीब साडेतीन हजार मित्र सेती, अना मी करीब एक सौ व्हाॅट्सॲप ग्रूप मा सेव. पर कही भी मोरो साल 2014-15 को पोस्ट को पह्यले मी पोवारी पोस्ट ना देखेव होतो ना बाचेव ना आयकेव होतो.                  मंज्या 2014-15 को दरम्यान मी फेसबुक परा पोवारी बोली की पोस्ट टाकेव् त् पोवारी बोली/भाषा को पुनरुत्थान करनेवालो पह्यलो व्यक्ती  मीच् आव्, असो मी कव्हन् लगेव त् वू सोळा आणा गलत होये, मी आता रावण को अनुयायी होन् लगेव् असो वोको सीधो अर्थ होये. अना असो बेमतलबको अनुमान ला, मी आपली पाठ आपुनच् थपथपायस्यानी, सच कर रही सेव् असोच् वोको अर्थ समजे पाह्यजे, असो मोरो बिचार से.      पोवारी बोली/भाषा को पुनरुत्थान साठी आमरो पोवार समाज को बोहुत महानुभावईन्न बोहूत पह्यले पासून महत्त्वपूर्ण काम करी सेन्. ज...

एक आठवण (1987)

एक आठवण (1987) ~~~~~~~~~~~~~~ परीविक्षा कालावधी संपल्यानंतर मला बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे TARCS म्हणून पोस्टींग मिळाली. तेव्हा माझ्या फक्त सहा महिन्याचा असलेल्या मुलाचे हेमेनजोयमा चे (कान व गळा यामध्ये) मोठे ऑपरेशन (26 टाके लागले होते) नुकतेच नागपूरच्या शासकीय मेडीकल हाॅस्पिटल मध्ये झाले होते व दर पंधरा दिवसांनी फाॅलोअप साठी जाणे अनिवार्य होते. पण पादोद्यासारख्या 700-750 किमी अंतरावरून हे शक्य नसल्याने मी नागपूरच्या जवळपास कुठेही स्थानांतर व्हावे म्हणून विनंती केली होती. सुमारे सात महिन्यानंतर माझी विनंती मान्य(?) होऊन मला गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज(वडसा) येथील CBF येथे प्रतिनियुक्तीवर पोस्टींग देण्यात आली. पशूसंवर्धन विभागांतर्गत असलेले हे Cattle Breeding Farm सुमारे हजार एकरात पसरलेले(!) असून वडसावरून सहा -सात कि.मी.वर आहे. तेथे तत्कालीन मुख्यमंत्री श्री.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्वप्नातील ''दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम...." हा द्विवर्षीय डिप्लोमा कोर्स  चालविला(?) जात होता. (एकूण तीन ठिकाणी असे शासकीय कोर्स सुरू करण्यात आले होते, ...

कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!

*कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~        कविता म्हणजे काय? हा प्रश्न अजूनही निर्विवादपणे सोडविता आलेला नाही. आणि कदाचित त्यामुळेच आज जागतिक स्तरावरही सर्वत्रच "कवीं"चा भयंकर(!) सुळसुळाट आढळून येतो. स्पाॅन्टेनियस ओव्हरफ्लो..... हे आंशिक सत्य असले तरी व्हाॅट इज ओव्हरफ्लो आणि ओव्हरफ्लो ऑफ व्हाॅट, हे प्रश्न अजूनही एकवाक्यतेच्या प्रतिक्षेत तडफडतच आहेत.      मी जेव्हा "कावळा हागता  चिमणीला विटाळ..." अशा "प्रारंभा"ची कविता प्रकाशनार्थ पाठवतो तेव्हा मूळ ग्रामीण असलेली पण व्यवसायामुळे शहरी झालेली संपादकीय मानसिकता मला "आदेशात्मक सूरात" कळवते की, "हागता" हा शब्द वगळून त्याऐवजी "शिटता" हा शब्द वापरावा.      मी एक अप्रसिद्ध व उजळ ग्रामीण मानसिकता जपून असलेला, झाडीपट्टीतील झाडप्या, व्यक्ती असल्याने जरा खडसावूनच लिहिले की,  ## माझ्या बालपणी माझी आई महिन्यातील तीन-चार दिवस बाहेर बसायची व माझी आजी स्वैंपाक करायची. मी आईला याचे कारण विचारल्यावर ती मला सांगायची की, 'चिंचेच्या झाडाखालून परसाकडे जाताना माझ्या डोईव...

मी एक "हिंदू".........!(?)

मी एक "हिंदू".......!(?) ~~~~~~~~~~~~ 1)1979 मध्ये मी देवरी (तत्कालीन जि.भंडारा) येथे गणित शिक्षक म्हणून बदलून गेलो. देव गुरूजींच्या ब्राह्मण परिवाराशी असा काही जुळलो की, त्यांची कन्या माझी मानसकन्या झाली.(आम्ही आजही हे नाते निभावून आहोत.) देव वहिनी माझ्या मानसआई व देवगुरूजी माझे मानसभाऊ झालेत. त्यांच्या दोघांच्या शेवटपर्यंत हे नाते त्यांनी निभावले. त्यांच्या घरी कोणतेही सोवळे-ओवळे, जात-पात असा प्रकार कधीच पाळल्याचे मी किंवा कोणीही पाहिले नाही, अनुभवले नाही. देववहिनी म्हणजे मानवी-देवीच होत्या. त्यांच्या मित्रमंडळींपैकी कोणीही, केव्हाही त्यांच्या स्वैंपाक घरात "घूसून" जेवण करू शकत होता.  2)माझ्या पत्नीची गर्भाशय काढून घेण्याची शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी दुसरी मानसकन्या, जी पूर्वाश्रमी(?)ची महार समाजातील व सध्या बौद्ध धम्मीय, नोकरीतून महिनाभराची सुट्टी घेऊन माझ्या कडे राहिली व तिने संपूर्ण घर (माझ्या मुला-मुलींसह) सांभाळले. माझ्या पत्नीच्या वतीने ती "देवपूजा"ही करायची. तिच्या बौद्धधम्मीय विवाहात मी तिचे "कन्यादान"ही केले. आजही आमचे हे नाते कायम...

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि झाडीबोली व पोवारी बोली ... (2)

*झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि झाडीबोली व पोवारीबोली* *(कला, साहित्य, संस्कृती व परंपरा)* : *एक आकलन* ------------------------------------------------------------------- @ॲड.लखनसिंह कटरे  ----------------------------------------------- (1) झाडीपट्टी/झाडीमंडळ : ही एक ऐतिहासिक, भौगोलिक तथा सांस्कृतिक वस्तुस्थिती आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे संपूर्ण चार जिल्हे आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, भिवापूर, कुही, उमरेड हे तालुके (आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचाही काही भाग) असा हा झाडीपट्टीचा विस्तार आहे. या भागात सर्रास बोलली जाणारी ग्रामीण बोली ही झाडीबोली म्हणून संबोधिली/ओळखली जाते. झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी या भागातील दुसरी प्रमुख बोली म्हणजे पोवारीबोली होय. या भागातील वनाचे प्रमाण एकूण भूभागाच्या सरासरीने 60 ते 80% असून येथील वनात मौल्यवान सागवानापासून जवळपास सर्वच प्रजातीचे वृक्ष आहेत. येथील वृक्षराजी अत्यंत समृद्ध आहे.  सुप्रसिद्ध संस्कृत कवी/नाटककार भवभूति हे आमच्या झाडीपट्टीतील आमगांवजवळील पदमपूर येथील असल्याचे पुरातत्त्ववेत्ते महामहोपाध्य...

शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality

*शेतकरी आत्महत्या : एक #BitterReality* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~              'दासबोध' मध्ये रामदासांनी वर्णिलेल्या एका मुर्खपणाच्या लक्षणाचे अनुसरण करून सांगू इच्छितो की, शासकीय सेवेत ''कार्यक्षमता, कामाचे सर्वोत्कृष्ट, सकारात्मक, टिकाऊ परिणाम'' यांची कोणतीही सकारात्मक दखल घेतली जात नसली तरी अशा अधिकारी/कर्मचा-यांना गधा बनवून त्याच्यावर जास्तीत जास्त भार मात्र हमखास टाकला जातो, अशांपैकीच मी एक होतो.                मी TARCS असताना माझ्याकडे एका बिमार कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकल प्रशासकीय प्रभार सोपविण्यात आला होता. आठ-नऊ महिन्याच्या कालावधीतच मी ती बाजार समिती कायमस्वरूपी आर्थिक व प्रशासनिक स्थिरतेमध्ये आणू शकलो. शिवाय माझ्याकडे चार तालुक्यांचा अतिरिक्त प्रभार असतानाही मला अविभाजित भंडारा जिमस बँक,भंडारा या समस्याग्रस्त जिल्हा बँकेचा एकल प्रशासक व त्याच अविभाजित भंडारा जिल्ह्याचा DDR असे आणखी दोन महत्वाचे प्रभार सोपविण्यात आले होते. मी ते दोन्ही प्रभार कायमस्वरूपी प्रभावाचे ठरतील (ठरलेत!) अशा यशस्वीपणे "पार"ह...