हलके फुलके पण गंभीर सुद्धा...!
हलके फुलके पण गंभीर सुद्धा...! ~~~~~~~~~~~~~~~~~~ नोव्हेंबर (2018) मध्ये मी राजन खान प्रणित अक्षर मानव द्वारा आयोजित "चित्रपट कार्यशाळा" करिता मुर्टी (ता.बारामती, जि.सातारा) येथे गेलो होतो. पण तब्येतीच्या कारणांमुळे मला ती कार्यशाळा अर्ध्यावर सोडावी लागली. पण पुण्याला परत येऊन दोन आठवडे पुण्यातच थांबलो. दरम्यान मी "साधना" साप्ताहिकाचे संपादक श्री.विनोद शिरसाठ यांची भेट घेतली असता त्यांनी मला प्रभाकर पाध्ये यांचे 'असेही विद्वान' व शिरसाठ यांचे 'सम्यक सकारात्मक' ही पुस्तके भेट दिली. पैकी 'असेही विद्वान' हे मजेदार व गंभीर असे पुस्तक मी पुण्यात असतानाच वाचून काढले. त्याच पुुुुस्त्तकातील काही उतारे "साधना" साप्ताहिकाच्या दि.15 डिसेंबर 2018 च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहेत. (हे पुस्तक प्रत्येक विचारी मराठी वाचकाने अवश्य अवश्य वाचावेच असे माझे मत आहे.) त्या उता-यांतील अनंत काणेकर यांच्या संबंधीची आठवण वाचतांना मला माझ्या जीवनातील एक समांतर घटना आठवते. त्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक राहील. 1971-72 दरम्...