कवीवर्य कुसुमाग्रज आणि त्यांची कविता : एक स्वानुभव
*कवीवर्य कुसुमाग्रज आणि त्यांची कविता : एक स्वानुभव* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> दोनेक वर्षांपूर्वीची घटना असावी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भवभूती महाविद्यालय आमगांव येथे मला बोलावे लागले. बोललो सुद्धा काही बाही. प्राचार्य श्री भुस्कुटे यांनी कुसूमाग्रजांच्या कवितांचं सुंदर असं "प्रदर्शन" सुद्धा भिंती भिंतीवर "लावलं" होतं. एका कवितेसमोर मी थोडासा थबकलो. मला 2009 मधील एक अप्रिय प्रसंग आठवला. ती कविता म्हणजे "- ...पाठीवर हात ठेवा....."! (कणा) >> झालं असं की, जानेवारी-2009 मधील माझ्या अपघातानंतर डावा हात पूर्णतः आणि डावाच पाय अंशतः दिव्यांग होऊन मी सहा महिने उपचार घेऊन नुकताच रूजू झालो होतो. या दरम्यान जुने जिल्हाधिकारी बदलून नवीन जिल्हाधिकारी सुद्धा रुजू झाले होते. त्यामुळे प्रोटोकॉलच्या दृष्टीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी काठीच्या साहाय्याने लंगडत लंगडत (डावा हात बॅन्डेज मध्येच लटकवलेला) त्यांना भेटायला गेलो. साहेबांना आल्याचा निरोप धाडला. 1/1.5 तासा(?)नंतर साहेबांनी चेम्बरमध्ये बोलावलं. गेलो. माझ्या प्रोटोकॉल पाळण्याच्या सवयीप्...