वीर सावरकर : एका भाषिक क्लृप्तीचे बळी
*वीर सावरकर : एका भाषिक क्लृप्तीचे बळी* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सावरकरांनी त्यांच्या जन्मठेपेच्या कैदेतून सुटका होण्यासाठी इंग्रजांना माफीपत्र पाठवले होते, ह्या तथाकथित व सध्याच्या संकल्पनेत सांगायचे तर सत्योत्तर स्वरूपाच्या टीकेचे विश्लेषण करावयाचे तर पॅलेस्टिनी कवी व लेखक मौरिद बार्गोटी यांच्या एका सुप्रसिद्ध कथन/विधानाचा अर्थ जाणून घ्यावा लागेल. मौरिद बार्गोटी लिहितो की, "सत्यस्थिती धूसर करणे हे केवळ एका साध्याशा भाषिक क्लृप्तीच्या आधारे शक्य असते. 'दुसरे म्हणजे' या शब्दांनी कहाणी सुरू केली की झालं." अगदी याच धर्तीवर सावरकरांच्या तथाकथित माफीपत्रावर 'भाषिक क्लृप्ती'चा जाणीवपूर्वक वापर करून वस्तुस्थितीला/सत्यस्थितीला धूसर करून या धूसर शब्दांकित, सत्योत्तर वस्तुस्थितीची/सत्यस्थितीची कहाणी गढण्यात येत असल्याचे दिसून येते. आणि अशा या आरोपित कहाणीद्वारे वीर सावरकरांची मृत्यूपश्चात बदनामी करण्याची मोहीमच उघडली जाते. वस्तूतः वीर सावरकर हे महाभारतकालीन श्रीकृष्ण यांच्या कृष्णनीतीचा (तत्वहीन शत्रूच्या आक्रमकतेसमोर सद्गुणांची विकृती ...