Posts

Showing posts from April, 2020

आदिम प्रकाशचित्रे (2004) आणि श्री.सुरेश द्वादशीवार

□"आदिम प्रकाशचित्रे" (ऑक्टोबर 2004), या माझ्या कवितासंग्रहाला आदरणीय मित्रश्रेष्ठ सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधक, पत्रकार श्री.सुरेश द्वादशीवार यांनी दिलेली प्रस्तावना : पुन्हा एकदा □          ◇आयुष्याचे अभिवचन◇          •••••••••••••••••••••••••••••       माझे मित्र श्री.लखनसिंह कटरे हे सहकार खात्यात जिल्हा उपनिबंधक पदावर असतानाही कविता करतात ही गोष्ट त्या खात्याविषयीचे गैरसमज दूर करायला जशी उपयोगी ठरावी, तशीच ती लखनभाईंच्या प्रतिभासामर्थ्याची आणि सहनशक्तीचीही निदर्शक व्हावी. गेली अनेक वर्षे ते कवितेची उपासना करीत आहेत. नियतकालिकांतून नियमितपणे प्रकाशित होणा-या त्यांच्या कविता मी पाहत आणि वाचत आहे. एका समारंभात त्यांनी त्यांच्या कवितांचे एक पुस्तक माझ्या हाती दिले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी असल्यामुळे इतर वक्त्यांची भाषणे होत असतानाच मी ते अख्खे वाचून काढले. आणि त्या कविता वाचत असताना मी समोरचा समारंभ विसरलो.         आपले मन उघड करीत असताना ते वाचकाला...

अल्पांश स्वगत

◇अल्पांश...स्वगत◇ ~~~~~~~~~~~~~~        मी कोणत्याही विचारसरणीचा वा विचारवादाचा (ism चा) ठाम समर्थक/शरणार्थी नाही किंवा ठाम विरोधक सुद्धा नाही. मग मी "दोगला" (बिन पेंदीचा लोटा) असावा काय? मला अजून "माझे अंतिम सत्य" गवसलेले नाही, मी त्या दिशेने प्रवासरत मात्र आहे. नरहर कुरुंदकर, मर्ढेकर, सुरेश द्वादशीवार, सदानंद मोरे, विलास सारंग, हरिश्चंद्र थोरात, रंगनाथ पाठारे, यांच्यासारखे मागच्या/आताच्या पिढीतील भारतीय(मराठी) विचारवंत/विचारक (लेखक/कवी) मला आदर्शवत वाटतात, पण मी त्यांचा भक्त/शिष्य मात्र होऊ शकत/शकलो नाही. मला त्यांचे स्वतंत्र, मूलगामी व विचारगर्भ लेखन/कथन/विचार माझ्या "या" प्रवासात जागोजागी व पदोपदी मदत करतात. त्यांच्या विचारांनी मी दिपून जात नसलो (कारण दिपल्याने डोळ्यापुढे अंधार साचतो) तरी माझ्या प्रवास-मार्गातील अंधार दूर करणा-या विजेरीची व पणतीचीही भूमिका "ते" ठामपणे निभावतात.          माझी भूमिका निश्चित करण्यात मला याची खूप खूप मदत होते. पण माझीच भूमिका "परम सत्य" असे मी मानत नाही, मानू शकत नाही. कारण मी तसे मानले/मानू लागलो तर म...

जाणिवेतील कर्कदंश, कविता संग्रह, 02.10.2000

*कवी लखनसिंह कटरे यांचा प्रभावी कविता संग्रह, "जाणिवेतील कर्कदंश"*(02.10.2000) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *डाॅ.प्रभाकर चौधरी,* जळगांव, (02.06.2001) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> कवी लखनसिंह कटरे हे सहकार आणि प्रशासन क्षेत्रात असूनही सृजनशील असे गृहस्थ आहेत. कविता हा वाङ्मय पकार लेखनास अत्यंत अवघड असा असतो. अंतःस्फूर्ती आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर काव्यनिर्मिती होते. लखनसिंह कटरे यांना याची पूर्ण जाणीव आहे. आपल्या अबोध मनात जे संचित साचलेले असते त्याचा आविष्कार त्यांनी आपल्या काव्यात अत्यंत प्रभावी(पणे) केला आहे. आपले विचार, कल्पना आणि भावना त्यांनी काव्यातून समर्थ शब्दांत आविष्कृत केल्या आहेत.  >> कवी लखनसिंह कटरे यांची कविता बहुआयामी आहे. त्यांच्या कवितेचे विषय नानाविध आहे(त). वारा, पाऊस, घरटे, पक्षी, वडाचे झाड, शेतकरी, गाय, आंधळा अशा नव्या नव्या प्रतिमा ते उपयोजितात. अंधार ओसरी सारखी छान कविता वाचकाला सुखावते. एका गावाचेच, उध्वस्त गावाचेच चित्र कवी त्यातून रेखाटतात.      दाटला अंधार अल्याड पल्याड       पडक्या घराची ओसरी ओसाड || >> ढग, वृक्ष,...

सहकार क्षेत्र : काही समज, काही गैरसमज

*सहकार क्षेत्र : काही समज, काही गैरसमज* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ (विनंती :- पूर्ण पोस्ट वाचूनच काॅमेंट करावी.) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~           सहकार क्षेत्राबद्दल भल्याभल्यांचे बरेच गैरसमज तथा अपसमजही आहेत. विशेषतः बहुतेक IAS ब्यूरोक्रॅट्स चे तर खूपच गैर/अपसमज आढळून येतात. सर्वश्री संजीव जयस्वाल, डाॅ.हर्षदीप कांबळे, संजय देशमुख, निरंजनकुमार सुधांशु, श्रावण हर्डीकर, अश्वनी मुद्गल, सुश्री आभा शुक्ला सारखे सहकाराला व्यवस्थितपणे समजून/समजावून घेणारे IAS मात्र विरळाच.             त्यातही वरीष्ठ पदावरील श्रेष्ठींना (सहकार आयुक्त व सहकार सचिव सारख्या श्रेष्ठीं(?)ना) सहकार क्षेत्र हे जणू गिनीपिगच वाटत असावे ! येणारा प्रत्येक श्रेष्ठीं येथे आपली वेगळीच 'प्रयोगशाळा' उभारतो व सहकार कायदा, नियम, - बाजार समितीचा कायदा, नियम - सावकारी कायदा, नियम - आदि विहित कायदे-नियम यांना सोयीस्करपणे डावलून आपल्या मनोराज्यातील तुघलकी कल्पनेनुसार मनमानी "प्रयोग" राबवत बसतो व सर्व यंत्रणेला त्यासाठी जूंपून घेतो. त्यानंतर येणारा दुसरा श्रेष्ठी हे पूूूूर्वी...

नोकरशाही : काही (कु)विचार (!)

नोकरशाही: काही (कु)विचार ~~~~~~~~~~~~~~~     >> मी 30 1/2 वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात राजपत्रित अधिकारी (नोकरशाह?) होतो. माझी निवड विदर्भ द्वेषी MPSC च्या माध्ममातूनच, पण एका  इमानदार अशा बॅरी.पी.जी.पाटील या पश्चिम महाराष्ट्रातील सुवर्णविचाराच्या विद्वानामुळे, होऊ शकली होती. माझी पहिली पदोन्नति माझ्या 19 वर्षांच्या निष्कलंक व समाजस्नेही लोक-सेवेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री श्री सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रशासनिक क्षमतेमुळेच होऊ शकली. या 19 वर्षात 10 वर्षे माझा C.R हा OUTSTANDING/सर्वोत्कृष्ट होता. उर्वरीत 7 वर्षे उत्कृष्ट व एके वर्षी चांगला होता. मला त्यापोटी 3 अग्रिम वेतनवाढी सुद्धा मिळाल्यात, परंतु 1996 च्या वेतन आयोगाच्या मंजूरीनंतर त्या वेतनवाढी Pay Fixation दरम्यान निरर्थक ठरल्यात. तर एकंदरीत मला पहिल्या पदोन्नतिचे 'दर्शन' व्हायला 19 वर्षे व मा. शिंदे सरांची कृपा यांची प्रतिक्षा करावी लागली.  >> या कालावधीत माझ्या नियत कामाव्यतिरिक्त कितीतरी अतिरिक्त कामे, कोणत्याही अतिरिक्त मोबदल्याशिवाय, माझ्याकडून करवून घेण्यात आली. त...

गडचिरोली : माझ्या जीवनातील एक घटनासंपृक्त गाव

गडचिरोली : माझ्या जीवनातील एक घटनासंपृक्त गाव ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> मी 10 मार्च-2003 ते 12 मे-2006 पर्यंत चंद्रपूर येथे डीडीआर असतानाच्या कालावधीतच जुलै-2004 ते मे-2006 दरम्यान माझ्याकडे गडचिरोली येथील डीडीआर पदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आलेला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सहकार व पणन विभागाच्या कामकाजाची इत्यंभूत माहिती मला होती. >> म्हणूनच मी 15 मे 2006 ते 31 मे 2008 या कालावधीतील यवतमाळ येथील सफल डीडीआर पदानंतर (तेथील एका राजनेत्याशी खटकल्याने) मी स्वखर्चाने व विनंतीने गडचिरोली येथे बदलून गेलो. आणि दि.02 जून 2008 ला गडचिरोली येथील डीडीआर पदाचा प्रभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. >> तेव्हा माझ्याकडे डेव्हिल नावाचा लेब्राडाॅर प्रजातीचा आज्ञाधारक, सुंदर प्रशिक्षित कुत्रा होता. आम्ही पती पत्नी दोघे व हा डेव्हिल असे तिघेही आम्ही गडचिरोली येथील शासकीय निवासस्थानी राहायचो. (मुलीचे लग्न झाल्याने ती सासरी गेली होती व मुलगा नागपूर ला शिकत होता.) >> आमच्या त्या शासकीय निवासस्थानात चार फ्लॅट होते. त्यापैकी खालच्या एका फ्लॅटमध्ये माझा निवास होता. ...

प्रमेय : कविता संग्रह-1996 : एक आस्वाद

*प्रमेय* - कविता संग्रह  (जानेवारी- 1996) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> माझा पहिला-वहिला कविता संग्रह, "प्रमेय" हा खूप सा-या अडचणी, अडथळे पार करीत जानेवारी-1996 मध्ये (माझ्या वयाच्या 41 व्या वर्षी) ब्रह्मपूरी (जि.चंद्रपूर) येथील एका लग्नपत्रिका छापणा-या छापखान्यात छापून कसाबसा प्रकाशित करावा लागला होता. (मुखपृष्ठ माझेच आहे.) >> माझ्या या कविता संग्रहाला सुप्रसिद्ध कवी, समीक्षक व विचारक प्रा.श्री.कृष्णा चौधरी यांनी सविस्तर प्रस्तावना दिली होती.  >> ती दीर्घ प्रस्तावना जराशी संपादित करून खाली देत आहे. (प्रा.कृष्णा चौधरी आज हयात नाहीत, हे माझे दुर्दैवच!) ¤¤¤ 👇👇👇 *प्रमेय : एक आस्वाद* ~~~~~~~~~~~~ प्रा.श्री.कृष्णा चौधरी  ~~~~~~~~~~~~ >> प्रमेय हा लखनसिंह कटरे यांचा पहिलाच काव्यसंग्रह. माझी उमेदीची पंचवीस वर्षे गोंदिया, भंडारा, साकोली, लाखनी या (तत्कालीन) भंडारा जिल्ह्यातील परिसरात साहित्यसंस्थांची निर्मिती व विस्तार करण्यात खर्च झाली. कटरे याच परिसरातील आमगांवजवळील बोरकन्हार या गावचे. (भवभूति चे गाव पदमपूर येथून तीन किमी वर.) सध्या(1995) ते सहायक निबंधक...