काही स्वप्नवत(?) आठवणी-2
*काही स्वप्नवत(?) आठवणी-2* ~~~~~~~~~~~~~~~~~~ जूलै 1966 मधील घटना आहे. मी माझ्या गावच्याच जि.प. शाळेत सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होतो. अचानक एके दिवशी गुरूजींनी सांगितले की दिवाळीच्या सुट्टीनंतर आपल्या शाळेतील वर्ग 5 व 6 बंद होत असून सर्वांनी आपापली सोय पहावयाची आहे. माझे वडील काॅन्ग्रेसचे एक वरीष्ठ कार्यकर्ते(?) असल्याने त्यांची पंचायत समितीच्या सभापतीशी आणि जि.प. च्या अध्यक्षाशी चांगली ओळख व मैत्री सुद्धा होती. त्यांनी हा निर्णय बदलविण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. पण सर्व व्यर्थ. अखेर आमच्या गावाजवळील 3 किमी अंतरावरील जि.प. शाळा अंजोरा येथे आमची रवानगी झाली, काही विद्यार्थी 6 किमी वरील आमगांव या तत्कालीन ब्लाॅकस्तरीय मोठ्या गावातील शाळेत गेले. म्हणजे तत्कालीन तुकडी, वर्ग एक ते वर्ग साडेपाच पर्यंतचे माझे शिक्षण माझ्या गावातील जि.प.च्या शाळेतच झाले. इंग्रजी भाषेची व विषयाची पहिली ओळख पाचव्या वर्गात माझ्या गावातच झाली. मी गावापासून 3 किमी वर असलेल्या अंजोरा येथील शाळेत रोज पायी ये-जा...