Posts

Showing posts from November, 2024

माझी फूफीआजी : शिवलाबाई (एक अस्फुट स्मृतिचिन्ह) (3)

*माझी फूफीआजी : शिवलाबाई*   *(एक अस्फुट स्मृतिचिन्ह)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ माझा एक वडील भाऊ होता, शुकदेव त्याचे नाव  अडीच-तीन वर्षाचा झाल्यावर  त्याला लिव्हर-रोग जडला  माझ्या आई-वडीलांनी  खूप/विविध उपचार केले त्याच्यावर  तत्कालीन उपचार पद्धतीनुसार  पण त्याचा असाध्य लिव्हर-रोग  आला नाही आटोक्यात  अखेर साडेतीन वर्षाचा होऊन  अकालीच निसर्गशरण झाला तो. वडील भावाच्या अशा  अकाली निघून जाण्यानंतर  तीन-चार वर्षे मी यायचा थांबलो(?) होतो,  माझ्या आईच्या पोटी,  दुसरा पुत्र होऊन.  आईच्या मोठ्या नवसासायासाने  तिच्या जप-जाप व हवन-पूजनाने  द्रवित झाले निसर्ग आणि नियती, झाला म्हणतात मग माझा जन्म  अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी.  अर्थातच वाढलोय मी लाडाकोडात, क्वारंटाईन मध्ये ठेवल्यासारखा. माझ्या बालपणी,  मी रांगू लागलो तेव्हा एकदा  मी झोपलेल्या अंधाऱ्या खोलीत  मी झोपेतून उठून  खाटेवरच रडत असताना सरपटत घुसला  एक नाग साप त्या खोलीत. माझ्या **फूफीआजीला  दिसला तो साप घुसताना  म...

विचार केलाच तर!

*विचार केलाच तर!* ~~~~~~~~~~~~~          आज (दि.13.11.2017 ला) थोडेसे वेगळेच लिहावेसे वाटते. त्याला कारण/निमित्त झालेय, एका सुप्रसिद्ध व महत्वाच्या अशा मराठी वर्तमानपत्राच्या मालक/चेअरमन यांच्या एक सोमवासरीय स्तंभातील लिखाणाचे! हा स्तंभ माझा अतिशय आवडता आहे. मी हा स्तंभ कधीही चुकवत नाही. या स्तंभातून मांडण्यात येणारे/आलेले विचार व त्यावरील उपाययोजनाही मननीय, विचारणीय व आचरणीयही असतात. आजच्या स्तंभात त्यांनी किशोरवयीन बाल-गुन्हेगारांच्या समस्येविषयी अतिशय मुलभूत चिंतन मांडले आहे. (प्रत्येकाने ते अवश्य वाचावे असे मला वाटते.) त्यावरील माझा प्रतिसाद मी कोणत्याही टिपणी किंवा भाष्याशिवाय खालीलप्रमाणे काही उदाहरणांसह व्यक्त करीत आहे. एक:- मी बालपणी कदाचित खूप सुंदर(!) दिसत असावा(?). मी 4थी किंवा 5वीत असेन. गावांमध्ये आजही बहुतेक घरी लघवीसाठी जनावरांचा गोठाच राखीव असतो. आमच्या वाडीत बांधलेल्या गोठ्यात एका सकाळी मी लघवीला गेलो होतो. बसून लघवी करायची सवय होती. मी लघवी करीत असतांनाच कोणीतरी हळूच येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवले. अर्थातच मी दचकून मागे पाहिले. माझ्याच वयाची ए...

उत्सव आत्ममग्नतेचा : एक प्रातिभ आजार

*उत्सव आत्ममग्नतेचा : एक प्रातिभ आजार* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~           अभिजन असल्याचा भाव जपणे (आव आणणे?) आणि अशा अभिजनात्मक विशेषाधिकाराच्या आत्मगौरवात आत्ममग्न असणे हा एक प्रकारचा प्रातिभ-आजारच असतो. अशाप्रकारे स्वपोषित व स्वयंघोषित स्वरूपाच्या तथाकथित विशेषाधिकारात आत्ममग्न असणारी छद्म/प्रच्छन्न प्रतिभा धारण करणाऱ्या व्यक्तींना कोठेही व कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलत असल्यासारखे भासवण्याची गरज भासत असते. हा एक अकादमिक-आजाराचाही प्रकार असतो. वस्तूतः अधिकारवाणीने बोलण्याऐवजी ढोबळमानाने ठाम विधान करण्याची सूक्ष्म इच्छा राखणे/ठेवणे हे यथार्थ प्रतिभेचे एक व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. (संदर्भ : 'परिवर्तनाचा वाटसरु' या पाक्षिकाच्या दिवाळी अंक 2024 मध्ये प्रकाशित अवधूत डोंगरे यांच्या 'राम-रुकुनची पुस्तकी कहाणी' ह्या लेखातील रुकुन अडवाणी यांच्या एका वाक्याचा ओझरता उल्लेख)             कोणतेही संशोधन/आरेखन/संकल्पन हे अंतिम होण्यापूर्वी त्याला विविध अशा कठीणतम व कठोरतम चाचण्यांमधून यशस्वीरीत्या पार व्हावे लागते. म्हणूनच कोणत...

ललित मासिक : सप्टें 2024 अंकावरील प्रतिक्रिया.

 बोरकन्हार-441902, दि.24.09.2024 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ मा.संपादक 'ललित' मासिक  गिरगाव, मुंबई-400004, सस्नेह सादर नमस्कार.        मी 'ललित' चा जुना वर्गणीदार-वाचक आहे. सप्टेंबर 2024 चा अंक खूप विलंबाने आज दि.24.09.2024 ला प्राप्त झाला. या अंकातील शर्मिला फडके यांचा ग्रंथओळख लेख खूप खूप आवडला. त्या लेखा-संदर्भातील माझ्या विस्मृत स्मृतीच्या अनुषंगाने कळवू इच्छितो की,       इंग्रज कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड (इंग्रजी उच्चार सेन्ट्रल प्राॅव्हिन्स एण्ड बेरार/सी.पी.एण्ड बेरार) चा अविभाज्य भाग राहिलेल्या ज्या झाडीपट्टीचा (पूर्व विदर्भ + दक्षिण-पश्चिम मध्यप्रदेश + पूर्व-उत्तर छत्तीसगढ) मी जन्मापासूनचा रहिवासी आहे त्या झाडीपट्टीतील दोन महान विभूती म्हणजे मध्ययुगीन कालावधीतील संस्कृत कवी, नाटककार भवभूति व दुसरे आमच्या गोंदियाच्या शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून अल्पकालिक कारकीर्द सुरू करून जगप्रसिद्ध झालेले समकालीन सुप्रसिद्ध प्रतिभावंत चित्रकार सैयद हैदर रझा. कान्हा-किसली, नागझिरा, नवेगावबांध, पेंच सारख्या राखीव वन्यबहुल प्रदेशाच्या अंतरंगात वसलेली ...

धर्मनिरपेक्षता : एक वदतोव्याघात संज्ञा(?)

*धर्मनिरपेक्षता : एक वदतोव्याघात संज्ञा(?)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~      भारतीय संस्कृतीद्वारे परिभाषित 'धर्मा'च्या संकल्पनेनुसार कोणीही, कधीही, कुठेही 'धर्मनिरपेक्ष' राहूच शकत नाही.             पाश्चात्य व/वा इतर अ-भारतीय रिलीजन्सच्या दृष्टिकोनातून कदाचित कोणी रिलीजननिरपेक्ष असूही शकेल, पण धर्मनिरपेक्ष हा शब्द, भारतीय संस्कृतीतील धर्म या संज्ञा-संकल्पनेच्या परिघात, संपूर्णतः वदतोव्याघातच ठरत असून, धर्म या भारतीय संस्कृतीतील संज्ञा-संकल्पनेबद्दलच्या अज्ञानाची री ओढण्याचे द्योतकच आहे.         भारतीय संस्कृतीतील धर्माच्या संज्ञा-संकल्पनेच्या प्रकाशात कट्टर नास्तिक व्यक्ती सुद्धा धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही/नसतोच. कारण भारतीय संस्कृतीद्वारे परिभाषित धर्माच्या आचरणाशिवाय कोणतीही व्यक्ती जिवंतच राहू शकत नाही. मृत्यूनंतरच मेलेल्याचे शव धर्मनिरपेक्ष राहू शकेल/शकते. जिवंत असेपर्यंत कोणालाच धर्माचरण/धर्मपालन चुकत नाही.         भारतीयच नव्हे तर पाश्चिमात्य तत्त्वज्ञ, विचारवंत, काही शास्त्रज्ञ यांनी स...