◇नसणे : वडीलांचे ! ◇ एक स्मरण
◇नसणे : वडीलांचे ! ◇ एक स्मरण **************************** दि.25 जानेवारी 2018, गुरूवारला दुपारी 01:32 वाजता माझे वडील श्री.मोहनभाऊ कटरे हे वयाच्या 88व्या वर्षी वृद्धावस्थेमुळे हे जग सोडून गेले. माझे आजोबा श्री.उकनभाऊ पाटील ऑगस्ट 1948 मध्ये वारले, तेव्हा माझ्या वडीलांचे वय फक्त 18 वर्षाचे होते. त्या वयातही त्यांनी कुटूंबाचा सारा कारभार सांभाळला. सोबतीला त्यावेळचे आमचे आवारी श्री.शिवलाल कुंभरे हे आदिवासी समाजातील स्वामीनिष्ठ व्यक्ती होते. शिवाय मोडकूकाका चव्हाण, मंगरूबडो चव्हाण, भैय्यालालभाऊ कुंभरे, उरकुडाबाबा शरणागत, छगनमामा शरणागत, कुकसीबडो भोयर, इंदलबाबा भोयर, वळगूबाबा येल्ले, बाबूलालमामा शरणागत, चुन्नीलालभाऊ सर्राटी, रावजीबाबा आंबेडारे, कारूभाऊ मेंढे, लोंढू(रूपचंद)भाऊ मेंढे, डोकूभाऊ नेवारे, गोंडूभाऊ नेवारे, दयारामभाऊ भूमके, तुकारामभाऊ भूमके, चिंधूभाऊ भूमके, फंदूभाऊ भूमके, मयारामबडो गौतम, डोमाबडो सहारे, बेनीमामा गौतम, चिंधू(भसकी)बडो सर्राटी, यासारखे जीवाभावाचे स्वामीनिष्ठ व कौटुंबिक/परिवारसम सेवक(!) सोबत होते. या सर्वा...