Posts

Showing posts from November, 2022

काही महत्त्वाचे वेचे... (1), (2)

*काही महत्त्वाचे वेचे...* (1), (2) ~~~~~~~~~~~~~~~~~ (1) >> कला म्हणजे मानवी संवेदनेचे विविध अंगाने/प्रकाराने प्रकटीकरण असल्याने कलेत केवळ उदात्त, सुंदर, सकारात्मक/सुखद, मनोहरी, सुबोध/सुकर, ... तेवढेच असेल/असावे हे स्वतंत्र बुद्धीमत्तेला मान्य होईलच असे म्हणता येणार/येत नाही. पर्यायाने कलेत काही नकारार्थी, त्रासदायक, बोचणारे, भयानक, रौद्र, दुःखद, दुर्बोध/अमूर्त, ... वगैरे तथाकथित काळेबेरेही असणारच हा स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्यांचा दृष्टिकोण म्हणूनच अभ्यासकांचा अभ्यासविषय असतो/ठरतो. पूर्वपरंपरा आणि पूर्वसंस्कार हे सगळे बाजूला सारून, स्वतंत्र/निरपेक्ष/पूर्वग्रह-मुक्त बुद्धीने कला आणि तद्विषयक तत्त्वज्ञानाची चिकित्सा करणे, ही परिघाबाहेर विचार करू शकणाऱ्या तत्त्वज्ञ आणि तज्ज्ञांची खरी ओळख असते. आजच्या भाषेत सांगायचे तर ही 'ओळख' म्हणजे अशा तत्त्वज्ञ आणि तज्ज्ञांची जणू 'यूएसपी'च असते.  ----------------------------------------------------- (2) >> व्यक्तिवादी उपयुक्ततावादी आणि प्रच्छन्न बुद्धिवादाला बेगडी व भ्रामक अस्मितेच्या आवारात जबरीने कोंडून ठेवणारे तथाकथि...

पढतमूर्ख (Idiot Servants) : एक पॅरेडाइम (Paradigm)

*पढतमूर्ख (Idiot Servants) : एक पॅरेडाइम (Paradigm)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> समाजविकास व समाजविकासक यांच्यातील अन्योन्य आंतर्संबंध वेगळ्याने व्याख्यायित करण्याची आवश्यकता नसली तरी सद्यकालीन तथाकथित, स्वयंभू व स्वयंघोषित समाजविकासकांची बजबजपुरी विचारात घेता या विषयावर विवेकाधारित साधक-बाधक चर्चा व या विषयाचे सम्यक अवगाहन होणे आज परमावश्यक होऊन बसले आहे. त्यादृष्टीने विचार करू जाता सध्याच्या/स्वातंत्र्योत्तरकालीन आभासी व परावलंबित्वाधारित एकांगी, परजीवी व सम्भवतः विकृत शिक्षण प्रणालीतून तयार झालेल्या तथाकथित मान्यवर व मातब्बर समाजविषयक तज्ज्ञांचे पढतमूर्ख आचरण, व्यवहार व लिखाण तपासून त्यांचा यथोचित समाचार घेणे क्रमप्राप्त ठरते/ठरेल, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे.  >> त्यादृष्टीने विवेकाधारित सहअस्तित्वभावप्रणित विचारांच्या प्रकाशात पाहिले असता सध्याच्या द्वेषभाव व परमत-असहिष्णुतेच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या जागतिक माहोलात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक... आदि सर्वच क्षेत्र-विषयांत पढतमूर्खांचे वाढते प्रस्थ दिसून येते. आणि ही बाब विव...

माझा तथाकथित हृद्रोग आणि मी : एक स्वानुभव

*माझा तथाकथित हृद्रोग आणि मी : एक स्वानुभव* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> तीन वर्षात मिळवावयाची B.Sc.(PCM) ही पदवी मी पांच वर्षात मिळविली. (त्याला माझी तोळामासा तब्येत, गावठी कलह आदि बाबी कारणीभूत होत्या, असो.) जून-1977 मध्ये ही पदवी उत्तीर्ण झाल्या/केल्यानंतर त्यावेळच्या माझ्या एका भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाच्या कोत्या व नीचतम वृत्तीमुळे मला भौतिकशास्त्र विषयात फक्त एक मार्क/गुण कमी पडल्याने मला नागपूरच्या PGTD व हिस्लाॅप काॅलेज या दोन्ही ठिकाणी M.Sc.(PHY) साठी प्रवेश नाकारण्यात आला. निराश होऊन मी विज्ञान शाखेला रामराम ठोकला व गोंदिया येथील एन.एम.डी.काॅलेज मध्ये विधीशाखेत LL.B. मध्ये प्रवेश घेतला. दरम्यान मी MPSC/UPSC चा अभ्यास व तयारी करीत असल्याने मला मराठी वाङ्मय/साहित्येतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांचा सुद्धा अवांतर अभ्यास करता आला/करावा लागला. >> आमचे लाॅ काॅलेजचे वर्ग संध्याकाळी सहानंतर सुरू होत असत. रात्री नऊ वाजता काॅलेज सुटल्यावर रूमवर येऊन जेवण उरकेपर्यंत रात्रीचे दहा वाजले असत. त्यानंतर मी अभ्यासाला 'बसत' ...