याला काय म्हणावे? (लाखांदूर एपिसोड)
*याला काय म्हणावे?* ~~~~~~~~~~~~~ पुष्कळदा वर्तमानपत्रातून वगैरे प्रसिद्धी माध्यमातून समजते की, अमूक-तमूक मंत्री/नेता/अधिकारी/कर्मचारी भ्रष्टाचारा(?)त प्रवीण(?) असून त्याच्या/त्यांच्या विरूध्द पूरावे सुद्धा उपलब्ध आहेत. पण पुढे काही दिवस/महिने/वर्षानंतर "त्या"चे काय झाले हे आपण विसरून गेलेलो असतो. मला त्या प्रामाणिक(!) पूराव्यादारांना नम्रपणे(?) सांगायचे आहे की, 'त्या पुराव्यांचा काही उपयोग होईल असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत नाही.' माझा यासंदर्भातील एक छोटासा अनुभव सांगतो... 1996-97 मधील सत्य घटना आहे ही. तत्कालीन भंडारा जिल्ह्यातील एक तालुका सहाय्यक निबंधक (सहकार,पणन,...) सेवानिवृत्त झाल्याने त्या तालुक्याचा प्रभार कोणाला द्यावा यासाठी जिऊनि कार्यालयात खूप मोठे(?) खलबत(!) झाल्यावर कोणीही तेथील प्रभार घ्यायला तयार(?) नसल्याने मला न विचारताच तो अतिरिक्त प्रभार मला सोपविण्यात...