एमपीएससी : एक अविस्मरणीय अनुभव
*एमपीएससी : एक अविस्मरणीय स्वानुभव* ----------------------------------------------------- >> ग्रॅज्युएशन नंतर प्रथम प्रयत्नाच्या, 1977-78 च्या, एमपीएससी च्या नागरी सेवेसाठीच्या परीक्षांत मी (लेखी - 61% व मुलाखत - 40%) उत्तीर्ण झालो असलो तरी बीडीओ ची पोस्ट मला पसंत न पडल्याने मी रुजू झालोच नाही. (बीडीओ या पदासंबंधाने माझ्या नापसंतीची कारणे मी येथे लिहू शकत नाही, क्षमस्व.) >> 1978-79 च्या परीक्षांत सुद्धा मला लेखी परीक्षेत 62.5% मार्क्स पडले असले तरी तत्कालीन Rural Weightage संबंधीच्या मा.उच्चन्यायालयाच्या अंतरिम निर्णयाचा "सोयीचा" अर्थ लावून त्याचा गैरफायदा घेत एमपीएससीच्या तत्कालीन "चालकां"नी Rural Weightage चा लाभ वगळून एकत्रित Merit चा विचार न करता, Weightage चा लाभ-पात्र अशा सर्वांना सरसकट वगळून, उर्वरितांची Merit List करून, जाहिरातीत नमूद एकूण पदांच्या सुमारे 80-85% पदे निवडण्या/भरण्याची विहित कार्यवाही उरकली. मा.न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर Weightage शिवाय सुद्धा Merit मध्ये असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा फार्स करून उर्वरित सुमारे 15-20% पदे भ...