वणवा (एक लघुकथा)

*वणवा* (एक लघुकथा)
---------------------------------
>> तो धावत धावतच शेतात पोचला. तोवर वणव्याने त्याच्या शेताला वेढून टाकले होते. वन विभागाची टीम वणवा विझवण्यात मग्न होती. 
>> उन्हाळ्याचे दिवस आणि वाहता वारा यामुळे वणवा आटोक्यात येत नव्हता. क्षणार्धात वणव्याने त्याच्या शेतात शिरकाव केला. 
>> त्याच्या डोळ्यादेखत त्याचे शेत पेटू लागले. तो आरडाओरडीशिवाय काहीच करू शकत नव्हता. 
>> वन विभागाच्या टीम ने जंगलातील वणवा कसाबसा आटोक्यात आणला व टीम आपले काम आटोपून निघून गेली. 
>> त्याचे शेत पेटतच राहिले व तो नाईलाज होऊन पेटत्या/जळत्या शेताकडे फक्त एकटक पाहत बसला.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(11/02/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन