राक्षस आणि मी (एक लघुकथा)
*राक्षस आणि मी* (एक लघुकथा)
~~~~~~~~~~~~~~~~~~
¤ रोजच्या सारखाच आजही माॅर्निंग वाॅक ला गेल्तो. येतांना रस्त्यात एक "राक्षस" भेट्ला. मला आडवा झाला, मी नाईलाजाने थांब्लो.
¤ राक्षस म्हण्ला- "खूप भूक लागलीय, तुला खातो आता."
¤ मी थोडासा गांगर्लो...सावर्लो... म्हणालो, नाही म्हटलं तरी तू ऐकणारेस थोडाच, खा मग मला...!
¤ तो माझ्या आसपास फिर्ला, मला न्याहाळू लाग्ला, माझा वासही घेत्ला व वेडेवाकडे तोंड करून म्हणाला..."जा तू, तू मला पचणार नाहीस. आजही आता उपवासच..."
¤ त्याला पुनर्विचाराची संधी न देता मी तेथून लगेच सटक्लो, म्हणून तुम्हाला हे सांगू तरी शक्लो. हुश्श...!
¤
@खिलीराम भाऊ.(ॲड.लखनसिंह कटरे)
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(06/02/2018)
Comments
Post a Comment