'सजग' : जुलै-सप्टेंबर 2022 चा अंक वाचून...
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र),
दि. 29 ऑक्टोबर 2022.
===========================
प्रति,
सर्वश्री,
सतीश तांबे (संपादक),
अभिजीत रणदिवे,
गणेश कनाटे,
इरावती कर्णिक,
उत्पल व.बा. (सर्व कार्यकारी संपादक),
अभिजित वैद्य,
लोकेश शेवडे,
हेमंत कर्णिक,
हृषीकेश गुप्ते,
हृषीकेश रांगणेकर (सर्व संपादक मंडळ सदस्य),
"सजग"
वॉटरमार्क पब्लिकेशन, 26 नवविनायक सोसायटी,
महात्मा सोसायटीजवळ, गांधी भवन, कोथरूड,
पुणे-411038.
(मोबाईल : 9422016044)
(ईमेल : watermarkpublication@gmail.com)
सर्व मान्यवरांना सविनय सादर प्रणाम!
🙏🙏🙏
>> मी 'सजग'चा प्रथमांकापासूनचा लव्ह-हेट रिलेशनशीप असलेला वर्गणीदार-वाचक आहे.
>> सद्यस्थितीत मराठीत खरोखरच गंभीर विषयावर चर्चा घडवून आणणारी, वाचनीय, मननीय, संग्राह्य, ... अशी नियतकालिके एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकी सुक्ष्म-संख्या असलेली, आहेत. त्यात 'सजग', 'सर्वंकष', 'खेळ' आणि 'संपृक्त लिखाण' या चार नियत/अनियतकालिकांचा समावेश असून माझ्या सुदैवाने मी या चारहीचा वर्गणीदार-वाचक आहे.
>> 'सजग'चा पाचवा (जुलै-सप्टेंबर 2022) अंक दि.15.10.2022 ला माझ्याकडे पोचला आणि मी नेहमीप्रमाणेच त्याच्यावर तुटून(?) पडलो. साक्षेपी(?) वाचकांची वाचनभूक भागवून त्याला विचारप्रवृत्त करणाऱ्या लिखाणाने समृद्ध अशी या 'सजग'ची आजवरची ओळख या अंकाने मात्र पूर्णतः सांभाळली(?) नाही, असे या अंकाच्या वाचनानंतर माझे अल्पबुद्धि-आकलन झाले आहे.
>> हृषीकेश गुप्ते, शैलेन भांडारे, हेमंत कर्णिक, राहुल बनसोडे, अरुंधती देवस्थळे, प्रदीप चंपानेरकर, अभिजीत रणदिवे आणि निरुता भाटवडेकर यांचे लिखाण खरोखरच नावीन्यपूर्ण, विचारप्रवर्तक तथा साक्षेपी वाचकाची वाचनभूक तृप्त करणारे आहे (असे माझे नम्र आकलन आहे.) एकूणच लैंगिकता आणि तद्विषयक/तत्संबंधित 'क्वीअरिंग' या संज्ञा/संकल्पना आणि आजचे वास्तव स्पष्ट करणारे हृषीकेश गुप्ते आणि शैलेन भांडारे यांचे लेख मला समृद्ध करून गेले. हेमंत कर्णिक यांची '...सामाजिक समीक्षा' माझ्यासारख्या एका अल्पस्वल्प/क्षुद्र सामाजिक चळवळ्याला अजून एक दिशा दाखवून गेली व माझ्याकडून 'सामाजिक चळवळी' या विषयावर एक संक्षिप्त टिपण सुद्धा प्रसवून गेली. एकूणच मराठी ग्रंथव्यवहाराबद्दलचे माझे प्राथमिक स्व-आकलन चुकीचे नव्हते/नाही याचा सक्षम दुजोरा देणारे अरुंधती देवस्थळे, अभिजीत रणदिवे व प्रदीप चंपानेरकर यांचे लिखाण माझी पाठ थोपटून गेले. निरुता भाटवडेकर यांचा लेख तीन वेळा वाचला, अभिराम अंतरकर या युवा प्रकाशकाचे विचार जाणून सुद्धा मी समृद्ध झालो.
>> परंतु माझे अतिशय आवडते लेखक, ज्यांच्या प्रत्येक लिखाणाचा मी फॅन-वाचक असून ज्यांच्याशी माझी वैयक्तिक ओळख सुद्धा आहे, अशा मित्रश्रेष्ठ संजय भास्कर जोशी यांचा अनावश्यक रित्या भरकटलेला, पसरट व वाचनदुष्ट लेख (मिलिंद बोकील यांच्या लेखनातील स्त्री-पुरुष संबंध) मात्र स्वतःवर बळजबरी करूनच वाचावा(?) लागला. या लेखातून सुद्धा काही मोती अवश्य वेचता(?) आले. पण ते मोती वेचण्यासाठी घ्यावे लागलेले कष्ट तुलनात्मक दृष्ट्या खूपच महागात(?) पडले. तसेच महेंद्र दामले यांचा प्रतिसादात्मक लेख वाचून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे माझ्या अल्पबुद्धि-आकलनाला आकळू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. श्रीपाद हळबे यांचे 'खटकणारे विचार' खरोखरच प्रत्येक शेतकऱ्याला/गावकऱ्याला, शेतकरी-पुत्राला "खटकणारे(?)"च आहेत. पण त्या लेखात काहीतरी न्यून राहिले, जे मलाही नेमके सांगता येणार नाही, ते खटकले. असो.
>> एकंदरीत माझ्यासारख्या तथाकथित साक्षेपी(?) वाचनवेड्याची वाचनभूक भागवण्यात हा अंक कमोबेसी प्रमाणात सफल झाला, हे माझ्या दृष्टीने माझे नशीबच!
>>धन्यवाद आणि आभार!
>> कळावे, कळवावे ही सविनय विनंती.
¤आपला, एक वर्गणीदार-वाचक
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, ता.आमगांव,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
मोबाईल : 8208557164//7066968350
ईमेल : lskatre55@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment